चतुर्थ पटल - विपरीतकरणीमुद्राकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
( दोन्ही हातांची बोटे एकमेकात अडकवून ४५ अंशाच्या काटकोनात भूमीवर अंथरलेल्या जाडसर व लांबरुंद आसनावर हात ठेवून ) साधकाने आपले डोके जमिनीवर ( आसनावर ठेविलेल्या हातांच्या बोटांमध्ये ) टेकवावे आणि दोन्ही पाय वर आकाशात स्थिर करावेत. याला विपरीतकरणीमुद्रा म्हणतात. ही मुद्रा सर्व तंत्रात गुप्त आहे म्हणजे ती प्रकट करणे योग्य नाही.
या प्रकाराने जो साधक या मुद्रचा दररोज तीन तासपर्यंत निरन्तर अभ्यास करील तो निश्चितपणे मृत्यूला जिंकील व प्रलयात त्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत. ॥७०॥
जो साधक शरीरात विद्यमान असलेल्या अमृताचे पान करतो त्याला सिद्धांचे साम्य प्राप्त होते म्हणजे तो साधक स्वत: सिद्ध होतो. जो साधक हा मुद्राबंध करतो ( व सिद्ध होतो ) तो सर्व लोकांमध्ये पूज्य होतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP