राग - पहाडी
चाल : लोचनी देखता

हाताने काम करीत जावे ॥
मुखाने हरीनाम घ्यावे ॥धृ॥
जरी करीता कामधाम ॥
नित्य असावे मुखी राम ॥१॥
श्वासोच्छ्रवासी नाम घ्यावे ॥
हृदयी हरीरुप पाहवे ॥२॥
नित्य नेमे घेता नाम ॥
इंद्रिया लागे मग वळण ॥३॥
मग अंतरी बाहेरी हरी ॥
दासीला हरी न वाटे दुरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP