अभंग ८
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
नित्य गात रहावे हरी गुण गान ॥
त्यांत सदा लुब्ध होय माझे मन ॥धृ॥
सहस्र मुखी शेष गुण वर्णीता श्रमले ॥
नारद गंधर्वादी अखंड नाम गात राहिले ॥१॥
थोर या संतांनीं तुझे नामे अभंग रचिले ॥
तेची गात सकल जग त्यांत रमले ॥२॥
अज्ञमती दासीने कवन तुझे रचील ॥
प्रेमानंदे नित्य गाता मन रंगले ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP