अभंग ४
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - तीलक कामोद
चाल : सुरवात साधारण ‘ चित्त रमले हरी पदी ’
पाहिला पाहिला मी विठूराज ॥
कर ठेऊनी कटी उभा भक्तकाज ॥धृ॥
जेव्हा संकटे येतील हरीभक्ता ॥
समयी ये धाऊनी भक्त रक्षिता ॥१॥
ऐसा दयाळू हरीभक्त दाता ॥
त्याचे पदयुगल न सोडी कदा ॥२॥
नित्य घेई जे हरीनाम गोड ॥
भक्त संकल्प येऊ न दे आड ॥३॥
ऐसा श्रीहरीअसता पाठीराखा ॥
दासीने जोडिला श्रीकृष्ण सखा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP