अभंग ७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांडपहाडी
श्रीज्ञानेश्वरा काय तुझा महिमा ॥
माऊली तूं आमुची अससी पुरुषोत्तमा ॥धृ॥
दर्शन घेऊनी झाले मी पुनीत ॥
प्रेमादरे हृदयीं झाले हर्षभरीत ॥१॥
सुस्वर भजन ऐकुनी बहुत ॥
आनंद समाधान झाले चित्त ॥२॥
आनंदी आनंद माऊली दरबारी ॥
माऊलीची कृपादृष्टी असो दासीवरी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP