राग - मांड
चाल : सुरवात साधारण
मजा देते है क्या

करी धरुनी बासरी ॥ वेणु लावी अपुल्या अधरी ॥धृ॥
वाजवितो शाम मुरारी ॥
काढी आलाप स्वर माधुरी ॥
बन्सी नादे गेले मोहुनी ॥
सारे विश्व त्यांत गुंगुनी ॥१॥
शाम सखा गेला रंगुनी ॥
डोलु लागे नाद स्वरांनीं ॥
एका पायाने ताल धरुनी ॥
पैंजणाचा नाद मिळवुनी ॥२॥
स्वर गेला गगन भेदुनी ॥
पुष्पवृष्टि होई वरुनी ॥
आनंद झाला मग भुवनी
दासी प्रेमे गली रंगुनी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP