अभंग १३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - खमाज
नाही आनंद नसे समाधान ॥
कृष्णसखया तुझ्या भेटीविण ॥धृ॥
जिवासी आधार दुजा न तुजविण ॥
तुझे चरणी अर्पिले तन मन धन ॥१॥
तूची देवा माझा सर्व सुखनिधान ॥
तुझे रुपीच सदा जडले नयन ॥२॥
तुझ्या चिंतनी सुखशांती दिनंदिन ॥
हेच मज दिनेसी द्यावे कृपादान ॥३॥
आपुली म्हणवूनी धरा अभिमान ॥
दासीचा जिवलग कृष्ण भगवान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP