अभंग ६
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - तिलक कामोद
( चाल : श्री पांडुरंगारे )
विनविता तुजला शिणले देवा ॥
का अजुनी तुज येईना दया ॥धृ॥
नाही का सरले भोग जिवाचे या ॥
सोसवेना आतां कष्ट देहाचे या ॥१॥
घडेना नित्य तुमची सेवा ॥
म्हणोनी न ऐकसी माझा धावा ॥२॥
अंतरसाक्षी तुं जाणसी देवा ॥
तुझ्या नामाविण दुजे न देवा ॥३॥
कांहीं गोड न लागे मम जिवा ॥
दासीचा सर्वस्वी तुंची कृष्ण देवा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP