अभंग ७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - आरब्बी
चाल : राखो लाज
विनवु किती तुजला विठ्ठला ॥
आळवुनी गाऊनी कंठ शोषला ॥धृ॥
अजुनी तुजला नये का दया ॥
भेट झणी यदुराया ॥विठ्ठला॥१॥
माया मोहाचा असे पसारा ॥
यांतुनी सोडवा आता त्वरा ॥२॥
पुरे आता या रंगभुमीवरी ॥
खेळ झालासे पुरा विठ्ठला ॥३॥
आपली म्हणवा या दासीला ।
मग भेदभाव नुरला विठ्ठला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP