अभंग ८
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - ललत
किती विनवू तज पंढरीनाथा ॥
शोष्ला कंठ तुज आळविता ॥धृ॥
शक्ती न उरली देही आतां ॥
मनासी आली दुर्बलता ॥१॥
ऐसी झाली मम गत आता ॥
तुजविण देवा कोण दुजा त्राता ॥२॥
तुझ्या चरणी वाहिला देह आतां ॥
तूची दासीचा असे माता पिता ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP