अभंग १
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांडपहाडी
चाल : लोळत कच मुखावरी
विनंती एक देवराया ॥
दीन दुबळी झाली काया ॥धृ॥
जडलें मन तुझ्या पायां ॥
तव कृपेची आस मनीं या ॥१॥
रात्रंदिन मनीं असो या ॥
वास्तव्य तुझें प्रभुराया ॥२॥
ध्यानींमनीं सतत सखया ॥
चिंतन तुझे विठुराया ॥३॥
कल्पना न शिवो चित्तीं या ॥
दृढ तरी करी मनासी या ॥४॥
विनंती हीच पंढरिराया ॥
पदीं ठाव दे दासीला या ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP