अभंग ३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - बागेश्री
चाल : साधारण ‘ शरण गतकी लाज ’
बहु कष्टाने झाले तुझे दर्शन ॥
विठोबा फिटले नयनाचे पारणे ॥धृ॥
प्रफुल्लीत झाला देह आणि मन ॥
मिळाले जन्माचे साधन ॥विठोबा॥१॥
आनंद झाला अती जिवा ॥
पाहुनी तव श्रीमुख देवा ॥२॥
वाटे झाले सार्थक जन्माचे ॥
एकदा होता दर्शन तुमचे ॥३॥
वृद्धपणाने थकली दासी
नित्य स्मरण तव चरणासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP