राग - तिलककामोद
चाल : नाद घुमे हृदयात

तुजविण कोण दुजा त्राता ॥धृ॥
वेळोवेळी संकटकाळी ॥
येसी धाऊनी देवा ॥हरी रे॥१॥
अडनड माझी निवारुनी ॥
मुक्ती करीसी समयाला ॥हरी रे॥२॥
दिनंदिन येता मज क्षीणता ॥
उच्छ्वास ही हो मन नाम घेता ॥३॥
मग उल्हासीत होऊनी जीव हा ॥
प्रेमादरे लागे तव सेवेला ॥हरी रे॥४॥
दासी म्हणे अज्ञ मी ॥
कैसी होऊ उतराई ॥हरी रे॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP