चाल : प्रभु मेरे दिलमें सदा याद

श्रीपांडुरंग, मायबाप जिवाचा त्राता ॥
जिवलग सखा माझा कृपाळु दाता ॥धृ॥
भक्तांच्यासाठीं कष्टविले कोमल देहा ॥
दुबळे जन आम्ही गुंतलो मायामोहा ॥१॥
घालसी पोटी अनंत अपराध आमुचा ॥
संकटी धाव घेसी भक्तांच्या काजा ॥२॥
मीराबाईसाठीं विष प्यालासी ॥
जनी संगे दळु, कांडु देवा लागलासी ॥३॥
चोख्याची ढोरे ओढु लागलासी ॥
दामाची करीता महार बनलासी ॥४॥
ऐसा तुझा महिमा किती वर्णुं देवा ॥
अज्ञमती दासी किती वर्णेल महिमा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP