अभंग १
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मिश्र पहाडी
( चाल : हरी नाम अती )
गुरुदेव माझे आले हो ॥
आनंदीत मन हें झाले हो ॥धृ॥
बोधामृत आम्हां पाजीले ॥
आनंदी जीवन हे केले हो ॥१॥
कष्टविती अपुल्या देहासी हो ॥
आम्हां अज्ञजना उद्धरण्यासी ॥२॥
किती वर्णु या उपकृतीसी ॥
दीन दासी नमित गुरु चरणांसी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP