अभंग ३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - हमीर
( चाल : लौकिकापुरती )
श्रीगुरुसहवासे अती समाधान ॥
आनंदमय वाटते मग जीवन ॥धृ॥
संतबोधाची ऐकुनी वचन ॥
निर्मल होतसे काया - वाच - मन ॥१॥
संतबोध हा उजळे अंतरीं ज्योत ॥
वासनामय काजळी झडून जात ॥२॥
मग प्रकाशे अंतरीं दिव्य ज्योत ॥
तेजोमय रूप दिसे हृदयांत ॥३॥
तिथे वृत्ती हो मग तटस्थ ॥
दासी भक्तीभावें त्या नमित ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP