अभंग ४
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - दरबारी कानडा
नित्य नियमित देव पूजन ॥
नित्य करीता नामसंकीर्तन ॥धृ॥
नित्य वैष्णव संत भोजन ॥
धन्य इहलोकी ते पावन ॥१॥
ऐसे जयांचे असे वर्तन ॥
पवित्र त्यांचे सुखी जीवन ॥२॥
मानीती त्या देवासमान ॥
अशांची कीर्ती गाती जन ॥३॥
ऐशा पुरुषोत्तमासी वंदन ॥
दासीचे विठ्ठलपायीं नमन ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP