अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - सारंग
ब्रह्मरंध्रा ठाई मन झाले लीन ॥
देखिले ते सुंदर रूप नंदनंदन ॥धृ॥
जीवशिव दोनी झाले एकाकार ॥
गुरूकृपे मज लाभले ज्ञानसार ॥१॥
अंतरी सोहं शब्दाचा घुमे नाद ॥
तेणे रोमरोमी उमटे ध्वनी गोवींद ॥२॥
रिता ठाव देही नसे हरिविण ॥
दासी करूनी नमन जाइ गुरूपदी शरण ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP