मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
अकरावे दिवसाची क्रिया

अकरावे दिवसाची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


अकराव्या दिवशी सकाळी उठून घर सावरावें व सूतकांत उपयोगांत घेतलेलीं मातीची भांडी टाकून द्यावीं. सर्व सपिंडांनी सचैल स्नान करून सूतकांतील वस्त्रें धुवावीं. स्नान केल्यावर पंचगव्य प्राशन करावें.
कर्त्यानें आचमन व प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा. व सूतकांत झालेल्या माझ्या अशुचित्वादिक सर्व दोषांच्या परिहारासाठीं तसेच वृषोत्सर्गादि कृत्यें करण्यास अधिकार प्राप्त होण्यासाठीं मी पंचगव्य प्राशन करितो. ’ असें म्हणावें. मग पंचगव्य प्रणवमंत्रानें यथाविधि तयार करून प्रणवमंत्रानें तें प्राशन करावें.
धनिष्ठापंचक, त्रिपाद नक्षत्रें, त्रिपुष्कर इत्यादिक मरणसमयीं आली असल्यास, त्यांबद्दलची शांति सूतक संपल्याबरोबर प्रथम करावी. नंतर वृषोत्सर्गादि कर्में करावीं.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP