पंचगोदानें
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
१ पापधेनु,
२ उत्क्रांतिधेनु,
३ वैतरणीधेनु,
४ ऋणधेनु,
५ मोक्षधेनु,
याप्रमाणें पांच धेनूंची दानें वर लिहिलेल्या विधीनें करतात.
१ पापधेनुदान :- मृताचे कायिक, वाचिक व मानसिक पापांचे क्षालनासाठीं करितात.
२ उत्क्रांतिधेनुदान :- मृताचें प्राणोत्क्रमण सुखानें व्हावें म्हणून करितात.
३ वैतरणीधेनुदान :- यमद्वारी वैतरणी नांवाची घोर नदी आहे असें मानिलें आहे, ती तरून जाण्यासाठीं करतात. कापसाचे ढिगावर तांब्याचें भांडे ठेवून त्यांत रेड्यावर बसलेल्या यमाची डाव्या हातांत लोहदंड, अशी मूर्ति ठेवून त्या मूर्तीसमोर उसाचीं नौका लालवस्त्रानें बांधलेली ठेवावी; व त्या होडीवर गाईस उभें करून दान करावें.
४ ऋणधेनुदान :- मृताचे हातून इहलोकीं व परलोकी सात जन्मांत जें ऋण झालें असेल तें नाहींसें होण्यासाठीं म्हणून देतात.
५ मोक्षधेनुदान :- संसारापासून मृताची सुटका व्हावी व मोक्ष मिळावा म्हणून करतात.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP