दुसरे पाथेयश्राद्ध
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
हें श्राद्ध बारावे किंवा तेरावे दिवशीं करावयाचें असतें. पहिल्या दिवशी एक पाथेयश्राद्ध करण्याबद्दल वर लिहिलें आहे, तें मृताचा जीव मनुष्यलोकांतून प्रेतलोकास जातांना जो प्रवास करावयाचा त्यासाठी एकोद्दिष्टविधीनें करावें लागतें. व हें पाथेयश्राद्ध प्रेतलोकापासून पितृलोकाला सुखानें जाण्यासाठीं पार्वणविधीनें करावयाचें असतें.
हें श्राध शिजविलेल्या अन्नानें अगर आमान्नानें करावें. यांत अग्नौकरण हातावर तांदळांनीं करावें. यांत ‘ यथा सुखं जषध्वं, ’ ( म्हण० सुखानें जेवा. ) म्हणावयाचें नाही कारण की, मार्गांत पुढें उपयोगी पडण्यासाठी देण्याचें आहे. तेव्हां आपोशन, प्राणाहुति व तृप्तिप्रश्न वगैरे भोजन संबंधीं विधि या कृत्यांत करावयाचा नसतो.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP