वसुगण श्राद्ध
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
तसेंच प्रेताला वसुरूप प्राप्त व्हावें म्हणूण वसुगण श्राद्ध करितात. रुद्रदेवतांप्रमाणें वसुदेवतांची नांवें निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळी दिली आहेत. हें श्राद्ध कोणी करतात, कोणी करीत नाहीत.
वसू आठ आहेत. त्यांचीं नावें :-
१ ध्रुव
२ अध्वर
३ सोम
४ आप
५ अनिल
६ अनल
७ प्रत्यूष व
८ प्रभास.
रुद्राचे नांवानें अकरा व वसूंचे नांवाचें आठ ब्राह्मण जेवूं घालावे, अगर तितकीं आमान्नें द्यावी. शक्ति नसल्यास एक एक ब्राह्मण जेवूं घालावा अगर आमान्न द्यावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP