मासिकश्राद्धें
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
वास्तविक पाहतां अपकर्ष करून मासिक श्राद्धें सपिंडी पूर्वीं केली असल्यामुळें पुन्हा करावयाची आवश्यकता राहत नाहीं. तथापि तीं पुनः करण्याचा प्रघात पडला आहे. इतकेंच नव्हे तर ती पुनः वेगळ्या वेळीं न करितां तंत्रानें ( एकदमच ) तेरावे, सोळावे अगर दुसर्या सोईच्या दिवशीं करितात. पुनः करावयाची झालीच तर निदान ज्या त्या योग्य वेळीं तरी करणें ठीक झालें असतें. पुनः एकदमच करण्यांत कांहीं अर्थ दिसत नाहीं. तसेंच मासिक श्राद्धें मृतास एकट्यास उद्देशून करावयाची असतां, सपिंडीं झाल्यामुळें एकोद्दिष्ट विधीनें न करितां पार्वण विधीनें करितात. सपिंडी वास्तविकरीत्या वर्षाचे अखेरीस करावयाची तिच्या सवडीसाठी अपकर्ष करून बारावे दिवशींच करण्याचें शास्त्रकारांनीं ठरविलें, त्याबरोबर ह्या फेरफेरास अनुसरून दुसरें पाथेयश्राद्ध, उद कुंभ श्राद्धें, मासिक श्राद्धें वगैरे इतर कृत्यांविषयीं योग्य ते फेरफार करून स्पष्टता केली असती तर ही अडचण आली नसती.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP