अध्याय ४१ वा - श्लोक ४६ ते ५२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भगन्तौ किल विश्वस्य जगतः कारणं परम् । अवतीर्णाविहांशेन क्षेमाय च भवाय च ॥४६॥

उत्कृष्ट जगाचें कारण । स्वयें जे कां अकारण । ते हे तुम्ही दोघे जण । रामकृष्ण अवतरलां ॥६१॥
अचिंत्यैश्वरशक्तीकरून । करावया अखिल कल्याण । जगत्प्रवृत्तिप्रवर्धन । संस्थापन धर्माचें ॥६२॥
इत्यादि कार्यांकारणें । तुमचें येथ अवतार धरणें । लोकदृष्टी शंका मनें । न लगे करणें यदर्थीं ॥६३॥
तेच शंका म्हणाल कैसी । क्षोभें मारिलें रजकासी । कृपा केली वायकासी । हे भासे मूर्खांसि विषमता ॥६४॥
ते तुमच्या ठायीं नसे । म्हणोनि सुदामा विनवीतसे । तें व्याख्यान कुरुनरेशें । स्वस्थमानसें परिसावें ॥३६५॥

न हि वां विषमा दृष्टिः सुहृदोर्जगदात्मनोः । समयोः सर्वभूतेषु भजन्तं भजतोरपि ॥४७॥

विषम दृष्टि तुमच्या ठायीं । नाहीं ऐसें म्हणणें कायी । तुमए सत्तेची नवायी । समुच्चयीं भूतांच्या ॥६६॥
विषम होतांचि नये तुम्हां । तुम्ही सर्वांचा एकात्मा । सर्वगतत्वें सुहृत्प्रेमा । अधमोत्तमा माजिवडा ॥६७॥
जो जो भजे जे जे भावें । तेणें तैसेंचि फळ पावावें । रजकक्षोभें प्रक्षोभावें । साधु सद्भावें वायका ॥६८॥
भाग्यें माझिया सदनाप्रति । तुम्ही आलेति कृपामूर्ति । भृत्यांमाजी मी नीचवृत्ति । सेवेसि विनति परिसावी ॥६९॥

तांवाज्ञापयतं भृत्यं किमहं करवाणि वाम् । पुंसोऽत्यनुग्रहो ह्येष भवद्भिर्यन्नियुज्यते ॥४८॥

दास्य काय म्यां करावें । ऐसें भृत्यातें आज्ञापावें । तुमच्या दास्यें श्लाघ्य आघवें । जिणें होय पुरुषाचें ॥३७०॥
तुम्ही कार्यार्थ जैं नियोजा । तैं तो अनुग्रहो बरवे वोजा । पुरुषासि झाला सहजीं सहजा । निजसायुज्या तैं लाभे ॥७१॥

श्रीशुक उवाच - इत्यभिप्रेत्य राजेन्द्र सुदामा प्रीतमानसः ।
शस्तैः सुगन्धैः कुसुमैर्मालां विरचितां ददौ ॥४९॥

कौरवकैरवप्रबोधका । शुक म्हणे गा प्रतापअर्का । ऐकें परीक्षितिसंज्ञका । निष्कलंका राजर्षे ॥७२॥
निष्काम अनन्य मी किंकर । तुम्ही निश्चयेंसि जगदीश्वर । तुमची आज्ञा तो अनुग्रह थोर । अभिप्राय समग्र सुचविला ॥७३॥
ऐसी विज्ञापना करून । साष्टांग वंदिले रामकृष्ण । सर्वां देऊनि आलिंगन । कर जोडून ठाकला ॥७४॥
सप्रेममानसें सुदामा । निवडोनि दिव्य सुमनोत्तमा । माळा निर्मूनि पूर्णकामा । देऊनि परमात्मा तोषविला ॥३७५॥
प्रशस्तें म्हणिजे संकोचरहितें । ऐसीं निवडोनि विशुद्ध चित्तें । कोमळ सप्रेम सुगंधभरितें । सुमनें ग्रथितें हरिमाळे ॥७६॥

ताभिः स्वलंकृतौ प्रीतौ कृष्णरामौ सहानुगौ । प्रणताय प्रपन्नाय ददतुर्वरदौ वरान् ॥५०॥

ऐसिया माळा समर्पून । सानुग पूजिले रामकृष्ण । सालंकृत शोभायमान । तोषें वरदान घे म्हणती ॥७७॥
अनन्यभावें शरणागत । परमविनीत पादप्रणत । त्याचें जाणोनि मनोगत । वर ओपीत ते काळीं ॥७८॥

सोऽपि वव्रेऽचलां भक्तिं तस्मिन्नेवाखिलात्मनि । तद्भक्तेषु च सौहार्दं भूतेषु च दयां पराम् ॥५१॥

तोही निष्काम पूर्णभक्त । न मगे ऐश्वर्य नाशिवंत । अखिलात्मक श्रीभगवंत । अचला याचित तद्भक्ति ॥७९॥
जें कां अखिल चराचर । अभेद अवघाचि श्रीधर । जाणोनि भजन अव्यभिचार । मागे साचार सद्भावें ॥३८०॥
सर्वभूतीं निर्वैरता । तेही याचिली न याचितां । सर्वभूतीं एकात्मता । आली हाता अनायासें ॥८१॥
सर्वात्मक जैं श्रीभगवंत । तैं निंदेची हरली मात । अनिंदकता चढली हात । अकस्मात या योगें ॥८२॥
तयें मागेंचि भूतदया । न प्रार्थितां आली हृदया । ठाव नसेचि क्षोभावया । म्हणोनियां अक्षोभता ॥८३॥
जेथ क्षोभकता निमाली । तेथें शान्ति सहजेंचि आली । ऐसी पूर्णश्री याचिली । अभेदभजनें श्रीदामें ॥८४॥
भगवद्भक्तांचें सौजन्य । भूतमात्रीं दयाळुपण । हेंही प्रार्थिलें म्हणोन । न लगे भिन्न सांगावें ॥३८५॥
जाणोनि याचें मनोगत । सर्वज्ञ सर्वग श्रीभगवंत । अनन्यभावाचें अंकित । गौरवीत वरदानें ॥८६॥

इति तस्मै वरं दत्वा श्रियं चान्वयवर्धिनीम् । बलमायुर्यशः कांतिं निर्जगाम सहाग्रजः ॥५२॥

ऐसे वर जे याचिले तेणें । तेही देऊनि जनार्दनें । न मागतां करुणापूर्णें । कृपावरदानें गौरविला ॥८७॥
पुत्रपौत्रांची संतति । चंद्रसूर्य गमनीं भ्रमती । तंववरी ऐश्वर्यसंपत्ति । भगवद्भक्तिविराजित ॥८८॥
तव तनूपासोनि जे संतति । ममानुग्रहें तयांप्रति । बळप्रताप दिव्यकांति । विजय कीर्ति पूर्ण असो ॥८९॥
श्रियादिन मागे सुदामा । परि तो कळवळा मेघश्यामा । निष्काम भजतां पादपद्मां । ओपी जगदात्मा सर्वस्वें ॥३९०॥
विसरोनि आपुली ऐश्वर्यथोरी । अनन्याची सेवा करी । गर्भासमान वाहे उदरीं । कां कडियेवरी मातृवत् ॥९१॥
ऐसा स्वभक्तकरुणाकर । न मनी दासाचा जोजार । सुदाम्यास तो देऊनि वर । साग्रज सानुचर निघाला ॥९२॥
रजक प्रार्थिला बरवे रीती । परंतु तयाची दुर्मति । मरण पावला कृष्णहस्तीं । तेणें सद्गति तो लाहे ॥९३॥
शिंपी शरण अनन्यभावें । म्हणोनि वर त्या दिधले देवें । मालाकाराचिया दैवें । भक्तिगौरवें गौरवी ॥९४॥
यावरी पुढें वक्ष्यमाण । कुब्जा करील गंधार्पण । तिसी देऊनि तनुलावण्य । धनुर्भजन - हरि करील ॥३९५॥
आणि धनुरक्षकांचा वध । कंस अरिष्टें देखेल विविध । रंगोत्सवादि कथा विशद । शुक कोविद कथील ॥९६॥
तया श्रवणाचे अधिकारी । तेहीं अवधानसामग्री । करोनि परीक्षितीबरोबरी । पंक्तिकार होइजे ॥९७॥
अखिलब्रह्मांडचक्रवर्ती । श्रीएकनाथ पुराणकीर्ति । चिदानंदाची संपत्ति । स्वानंदभरित सर्वत्र ॥९८॥
गोविंदनामाचा गौरव । चराचरीं सप्रेम द्राव । तेणें भरला दयार्णव । ते टीका अपूर्व हरिवरदा ॥९९॥
श्रीमद्भागवतोत्तम । महापुराण भगवत्कर्म । अठरा सहस्र संख्या परम । पारमहंसी संहिता ॥४००॥
त्यामाजील दशम स्कंध । शुकप्रीक्षितिसंवाद । मथुराप्रवेश रजकवध । अध्याय प्रसिद्ध एकेचाळिसावा ॥४०१॥
श्रीमद्भागवत दशम स्कंध । टीका हरिवरद वगाध । दयार्णवकृत परमविशुद्ध । अध्याय प्रसिद्ध एकेचाळिस ॥४०२॥
इतिश्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमह्म्स्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संत्वादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां रजवकधवायकमाल्यकारवरो नामैकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५२॥ टीका ओव्या ॥४०२॥ एवं संख्या ॥४५४॥ ( चाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १८९७७ )

एकेचाळिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP