मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५८ वा| आरंभ अध्याय ५८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ५८ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीमत्पंढरपुरवासिने नमः । परमपूज्या पूज्यतमा । परमपुरुषा श्रीपरमात्मा । गुणगणगरिमा अगम्य निगमा । गोविंदनामा गोमंता ॥१॥तव वराच्या प्रतापतेजें । सत्तावन्नाध्याय वोजे । वाखाणीले ते परिसोनि सहजें । सत्समाजें गौरविलें ॥२॥आतां अठ्ठावन्नाविया । सज्जन सादर परिसावया । तो तव कृपेच्या वराश्रया । लाहूनि अन्वया वाखाणीं ॥३॥शुक म्हणे गा कुरुनररत्ना । तुवां न करितांही प्रश्ना । सादर श्रवणीं देखोनि तृष्णा । उल्लास कृष्णान्वयकथनीं ॥४॥क्षुधित भोक्ता भोजनपात्रीं । रुचि आस्वादक पदार्थमात्रीं । परिवेषक तें देखूनि नेत्रीं । अर्पी स्वकरीं न याचितां ॥५॥तेंवि तव श्रवणास्थेच्या तोषें । कथनीं ममान्तर उल्लासें । यालागीं सादर होऊनि परिसें । निःश्रेयसदें हरिचरितें ॥६॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP