वेदस्तुति - श्लोक ३
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
सैषा ह्युपनिषद्ब्राह्मी पूर्वेषां पूर्वजैर्धुता ॥
श्रध्दया धारयेद्यस्तां क्षेमं गच्छेदकिंचन: ॥३॥
॥टीका॥ ते हे ब्राह्मी उपनिषत् पहिली ॥ पूर्वजीं वडिलांचिये वडिलीं ॥
निष्ठा धरुनि अनुष्ठिली ॥ जे तुज कथिली जात असे ॥१३॥
पूर्वपक्षें चित्तशुध्दि ॥ सिध्दान्तबोधें मोक्षसिध्दि ॥
यथोक्तालंबना यथाविधि ॥ बोधें ब्रह्मपदीं समरसवी ॥१४॥
यालागीं ब्राह्मी ब्रह्मपरा ॥ श्रध्दापूर्वक प्रिय ज्या नरा ॥
वितंडा तर्क न शिवोनी गिरा ॥ विवरीत गुरुरांपासीं जो ॥१५॥
श्रध्दापूर्वक श्रवणादर ॥ करुनि मननें धारणापर ॥
व्यतिरेक- बोधें साक्षात्कार ॥ लाहूनि चिन्मात्रमय निवडे ॥१६॥
तोचि अकिंचन अधिकारी ॥ देहादि उपाधि निरसूनि पुरी ॥
लाहे ब्रह्मस्थिति निर्धारीं ॥ सत्य वैखरी हे माझी ॥१७॥
इये उपनिषत्कथनीं पाहीं ॥ प्राचीन गाथा तुज मी कांहीं ॥
संदर्भार्थ कथितों तेहीं श्रवणालयीं सांठविजे ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 21, 2017
TOP