वेदस्तुति - श्लोक ४३
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
इत्यशेषसमाम्रायपुराणोपनिषद्रस: ॥
समुद्धृत: पूर्वजातैर्व्योमयानैमहात्मभि: ॥४३॥
॥ टीका ॥
जे सॄष्टीहूनि पूर्वीं झाले ॥
विधिमनापासूनि जन्मले ॥
अंतरिक्षगामी भले ॥
म्हणोनि विशेषिले व्योमयान ॥६७॥
कीं व्योमचि ज्यांचे वहन ॥
ऎसे महात्मे विधिनंदन ॥
सनकादि ब्रहानिष्ठ पूर्ण ॥
ज्यां सहज ज्ञान उपलब्ध ॥६८॥
तिहीं या प्रकारें संपूर्ण वेद ॥
पुराणें आणि उपनिषद ॥
यांचा सारांशरस हा शुध्द ॥
सम्यक् प्रसिध्द काढिला ॥६९॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP