वेदस्तुति - श्लोक ४९
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
इत्येतद्वर्णितं राजन्यन्न: प्रश्न: कॄतस्त्वया ॥
यथा ब्रह्यण्यनिर्देश्ये निर्गुणेऽपि मनश्चरेत् ॥४९॥
॥ टीका ॥
जैसा प्रश्न तां परिक्षिति ॥
आशंकोनि केला मजप्रति ॥
की साक्षान्निर्गुणीं ब्रह्यीं श्रुति ॥
कवणे रीती प्रवर्तती ॥११॥
तें यथातथ्य निरुपण ॥
अनिर्देश्य ब्रह्य निर्गुण ॥
तेथ प्रवर्ते जैसें मन ॥
तें श्रुतिव्याख्याअन तुज कथिलें ॥१२॥
मनाचिया उपलक्षणें ॥
वृत्तिरुप श्रुति जाणणें ॥
यांचें जेंवि प्रवर्तणें ॥
ब्रह्यीं होय तें निरुपिलें ॥१३॥
असो आतां इतुक्यावरी ॥
तव शंकेची शर्वरी ॥
न दिसे कीं प्रबोर्धतमारी ॥
उदेला अंतरीं ह्नद्रगनीं ॥१४॥
ऎसें वोलिनो मुनिपुड्रव ॥
तथापि दॄढीकरणास्तव ॥
फ़ळितार्थ वेदस्तुतीचा सर्व ॥
संक्षेपें वास्तव नॄपा कथी ॥१५॥
तो अभिप्राय यथामति ॥
वाखाणिजेल व्याख्यानरीती ॥
भाविक साकांक्ष आत्माहितीं ॥
तहीं सादर श्रवणार्थीं असावें ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP