वेदस्तुति - श्लोक ४८
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
सभाजितो भगवता कॄतासनपरिगृह: ॥
तस्मै तद्वर्णयामास नारायणमुखाच्छ्रुतम् ॥४८॥
॥ टीका ॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न ॥
केवळ भगवान द्वैपायन ॥
जेणें नारदा देखोन ॥
अभ्युत्त्थान दीघलें ॥७॥
पवित्रासनीं बैसविला ॥
स्वागप्रश्नें तोषविला ॥
गुरुत्वें यथोक्त पूजिला ॥
अभिवंदिला सभ्दावें ॥८॥
मग तो देवर्षि अतिसंतुष्ट ॥
त्या व्यासाकारणें परम श्रेष्ठ ॥
कथिता झाला जें ऎकिलें स्पष्ट ॥
नारायणाच्या मुखांहूनि ॥९॥
तें पित्यापासूनि सहजें सहज ॥
श्रुत झालें यथार्थ मज ॥
जें हें इतुकें कथिलें तुज ॥
तव प्रश्नपैज दखोनी ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP