मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३०

वेदस्तुति - श्लोक ३०

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


अपरिमिताध्रुवास्तनुभृतो यदि सर्वगतास्तर्हि न शास्यतेति नियमो ध्रुवनेतरथा ॥
अजनि च यन्मयं तदविमुच्य नियंतृ भवेत्सममनुजानतां यदमतं मतदुष्टतया ॥३०॥ (१७)

॥ टीका ॥
श्रुति म्हणे वास्तव ध्रुव अनंत ॥
तेणेंचि रुपें सर्वग नित्य ॥
जीव मानाल जरी तनुभॄत ॥
तैं त्या समता ईशेंसी ॥५७॥
समता असतां न घडे शासन ॥
याहूनि जीव जरी विलक्षण ॥
तरी त्यांसी घडेल नियमन ॥
ईश्वरापासून निश्चयें ॥५८॥
जीवेश्चरांचें समत्व जयीं ॥
शासनशास्तॄत्व न घडे तयीं ॥
झणें पडाल या संशयीं ॥
म्हणोनि निश्चयीं श्रुति बोले ॥५९॥
यन्मय म्हणिजे जत्रा ऎसें ॥
उपाधिस्तव विकृत दिसे ॥
कारणत्वें त्याअ कार्यदशे ॥
घडे अपैसें नियंतृत्व ॥ ।६०॥
कारणत्वें न टाकून ॥
ओतप्रोत स्वबोधें पूर्ण ॥
म्हणाल तें जरी किंल्लक्षण ॥
तरी जें समान अनुस्यूत ॥६१॥
यन्मय शब्दें म्हणिजे काये ॥
हें अमुकें ते कथिजे सोये ॥
तज्ज्ञामविषयीं जैसें ज्ञेय ॥
तैसें नोही अद्वैत ॥६२॥
येथ वस्तु जो ज्ञानें जाणें ॥
तो उरे साक्षी वेगळेपणे ॥
तैं तें जाणणेंचि नेणणें ॥
वृथा मिरविणें ज्ञातॄत्वा ॥६३॥
जो साक्षित्वें विरोनि जाये ॥
तो जाणावया उरेल काये ॥
न जाणोनि तो सर्वज्ञ आहे ॥
या अभिप्रायें श्रुति वदती ॥६४॥
जेणें शर्करा भक्षिली ॥
तेणें गोडी सांगितली ॥
केवळ शर्करा होवोनि ठेली ॥
तैं ते गोडी वेगळी न वदे कीं ॥६५॥
कळलें ज्या त्या न कळे कांहीं ॥
कळे तें तो विनाशी पाहीं ॥
न कळे ज्यासी त्या कळलें ह्नदयीं ॥
अभेदबोधें आत्मत्वें ॥६६॥
तस्मात् यत्तच्छ्ब्दाप्रति ॥
अतर्क्य वस्तु म्हणती श्रुति ॥
अनुस्यूतत्वें नियंतृत्वें स्थिति ॥
सर्वाप्रति जयाची ॥६७॥
नभ न होनि कुसरी ॥
अनुस्यूतत्वें नादान्तरीं ॥
कारत्वें शासन करी ॥
भेद अंबरीं न शिवोनि ॥६८॥
तस्मात् परेश सर्व शास्ता ॥
अनुस्यूतत्वें साक्षी न होतां ॥
अभेदबोधें स्वसंवेत्ता ॥
प्रकृतीपरता परमात्मा ॥६९॥
हें ऎकानि सनंदन-वाणी ॥
प्रश्न केला ब्रह्यनंदनीं ॥
ती परिसावया श्रोतॄजनीं ॥
सावध श्रवणीं बैसावें ॥७०॥
विधसुत म्हणती भो वक्तया ॥
जीव जरी होती परमात्मया- ॥
पासूनि तरी मग नियम्यां तयां ॥
नियंतॄत्व घडे ईशा ॥७१॥
ऎसें म्हणतां दोष विविध ॥
तो ही ऎकावा सावध ॥
जें प्रतिदिनीं कॄतकर्माचा बाध ॥
अकृत-संबंध भोकतॄत्वा ॥७२॥
अहरहर सत्कर्म जीव करिती ॥
तत्फ़ळ इहामुत्रीं भोगिती ॥
अनित्यत्व जैं जीवाप्रति ॥
तैं फ़ळभोगप्राप्ती कवणातें ॥७३॥
ईशापासूनि जीवकोटी ॥
नूतन जन्मती ऎसी गोठी ॥
तैं न करितां कर्मराहटी ॥
घडें कीं सॄष्टि भोक्तॄत्व ॥७४॥
कर्म न करितां भोगणें पडे ॥
सम विषम तैं केंवि घडे ॥
एक नॄपासनीं सुरवाडे ॥
एक काबाडें वाहताती ॥७५॥
एक सचिंत एक रुग्ण ॥
एक निरामय निश्चिन्त पूर्ण ॥
दु: खशोकार्णवीं एक मग्न ॥
एक निमग्न अष्टभोगीं ॥७६॥
अकृताभ्यागम प्रसंगी ॥
ऎसी विषमता केंवि भोगीं ॥
तैं मग मोक्ष जीवांलागीं ॥
स्वरुप हानिमात्रक ॥७७॥
भस्मीभूत होतां देह ॥
जन्ममरणाचा अभाव ॥
तैं चार्वाक मत त्वयमेव ॥
सिध्द झालें या बोधें ॥७८॥
यास्तव बोलणें हें अयुक्त ॥
आत्मा स्वप्रकाशानंद सत्य ॥
तेथ उपाधि अविद्याकॄत ॥
नाना अनर्थ उपपादी ॥७९॥
अविद्याकृतानर्थनिवृत्ति ॥
इतुकेनि मोक्ष जीवांप्रति ॥
देहीं सहसा न घडे युक्ति ॥
कोणे रीति तें ऎका ॥८०॥
जीवांसि वास्तव जन्मचि नाहीं ॥
उपाधि जन्में जन्मती पाहीं ॥
जेंवि कां घटमठादिकांच्या ठायीं ॥
न जन्मोनियां नभ जन्मे ॥८१॥
ऎसा सिध्दान्त्त प्रतिपादनीं ॥
जे श्रुति वदला सनंदनमुनि ॥
ते परिसावी श्रोतृजनीं ॥
सावध होवोनि क्षण एक ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP