मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
५६ ते ६०

स्फ़ुट पदें व अभंग - ५६ ते ६०

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


५६ ॥ अभंग ९॥
गोविंदा तूं जळ मी तेथें कल्लोळ । असों सर्व काळ ऐक्य सुखें ॥१॥
तूं बिंब मी तेज तूं हेतु मी काज । व्यापक तूं पूज्य पूजक मी ॥२॥
*अणूचा वियोग नसे तुम्हां आम्हां । आजी मेघ:शामा सांडूं नको ॥३॥
तूं रस मी गोडी तूं वॄक्ष मी वाढी । तूं शक्ति मी प्रौढी सामर्थ्याची ॥४॥
दयार्णवस्वामी मी तुझा सेवक । वियोगाचें दु:ख साहों नेणें ॥५॥

५९ ॥ अभंग १० ॥
सोंवळें ओवळें जनामाजि दावी । कामत्र्कोध जीवीं वागवितो ॥१॥
त्याचें शुध्दपण पिकलें वॄंदावन । जैसे भले गुण शिंदळीचे ॥२॥
व्रतें उपवास करी बारा मास । आल्या अतीतास पाठी लागे ॥३॥
प्रदक्षिणा फ़ार घाली नमस्कार । जनासी निष्ठुर यमाहुनि ॥४॥
पुराणश्रवण आपण नाठवी । लोकां बोला ठेवी अधर्माचा ॥५॥
दयार्णवीं ऐसे न तरे पाषाण । अपानशोधन आचरती ॥६॥

६० ॥ हनुमानस्तुति ॥
जयजय मारुतऔरस भो जय । दाशरथेप्रिय भक्तविभो ॥धृ०॥
सीताशोधन-शील खलारे । कौणपपुरपति-मत्तबलारे ॥१॥
सौमित्रा-सुत-जीवन हेतो । राम-विजय-सुख्क-वर्धन-केतो ॥२॥
विघ्न-समूह-विनाशकॄशानु । राम दयार्णव पंकजमानु ॥३॥

६१ ॥ आरती परब्रह्याची ॥
पहुडावें पहुडावें देवा ब्रह्यांदशेजे । ज्ञानाज्ञानसहित जाणिव जें ठायीं लाजे ॥धॄ०॥
पिंडीं सकळहि इंद्रियवृंद शोभला मेळा । ब्रह्यरंध्रीं सुखें निद्रा करा गोपाळा ॥१॥
त्रिकुट-श्रीहाट गोल्हाटादि सांडुनियां कोठें ॥
औटपीठ लंघुनी ब्रह्यगिरी चोहटे ॥२॥
भ्रमर गुफ़ां टाकुनि पुनरपि चला सदनासी । जे ठायीं विश्रांति होत पूर्ण मदनासी ॥३॥
दयार्णवस्वामी ऐसे सदनीं पहुडावें । स्वसुखाच्या डोहीं पुनरपि येणें बुडवावें ॥४॥

६२ ॥ पद ॥
हरि हा आपणचि जग झाल । आपणचि जग झाला ॥धॄ०॥
अपणाचि देव भक्तहि होऊनि । पूजित अपणाला ॥१॥
उत्तम अधम योनी जितक्या । जीवरुपें भरला ॥२॥
सर्वं खलु इति कॄष्णदयार्णव । श्रुति वदती त्याला ॥३॥

६३ श्रीकॄष्णस्तवन
गोवर्ध्दनसम साधन गिरिवर उद्धरिला । नीर्जरवरपदगर्व सर्वहि परिहरिला । मदमच्छररजनीचर आन्वय संहरिला । देहत्रय अभिमान कंसासुर हरिला ॥१॥
जय जय घोषें मंगळ करिती व्रजबाळा । कॄष्णलीला स्तविती निगमागमाळ ॥धॄ०॥
नीर्मळ धर्म स्थापुनि भूमंडळ केलें । लीला जलधी जठरें निज नगरा नेले । भेद-मागध वधिला भवभय मग गेलें । अभेद संपतिनायक सज्जन हरिखेले ॥२॥
विकल्प दंडुनि वरिली रुक्मिणि निजशांती । लीलाचरणें केली विबुधा विश्रांती । पामरजन उद्धरती जपतां पद अंतीं । कॄष्णदयार्णव वरदे निरसी भवभ्रांती ॥३॥
जय०॥
श्रीहरि ॥

६४ एकनाथांची आरती
निर्गुण प्रतिष्ठाणीं आद्वय अवतारी । श्रुत्यर्थे जड बोधुनि भवसागर तारी । नीर्मळ शांती गोदातट उत्तरवारी । भाणुकुलोभ्दव भगवभ्दजनी व्यापारी । जयदेव० जय एकनाथा । तवसच्चित्सद‍युगुलीं मम मानस माथा ॥धॄ०॥
विश्वीं व्यापक विद्वद्वरविश्वामित्री । सत्कर्मास्तव स्थापुनि सर्वहि तव मित्री । द्विजभजनाचा महिमा प्रगटुनि सत्क्षत्रिं । जडजीव तरतीं तव ॥
गुणनामामॄत-मंत्रीं ज०॥२॥
लोकत्रय-चूडामणि हरि करि परिचर्या । तूं तो जगदोद्वारक अद्वय आचार्या । वर दे छेदुनि भेदासह मानसचर्या । कृष्णदयार्णव शवक व नर्णित आश्चर्या ॥३॥

६५ सद्‍गुरुची आरती
व्यापक भुवना जीवना दहना पवनातें । व्यापक गगणा सघना व्यापक शून्यातें । व्यापक रजतम सत्त्वा आद्वय तत्त्वातें । अपरापर व्यापक तुआ नादीमाय ते ॥१॥
जयदेव० जयजीए गुरुदेवा । अचळा अढळा अमळा निजगुज सुख-ठेवा ॥धॄ०॥
माया श्रमली पावे जेथें विश्रांति । तो तूं चिदॄप शाश्वत चिन्मय सुखमूर्ती । तव रुप पहातां होती तन्मय निजवृत्ती । शाश्वत न गमे कांहीं तुजविण मग चिन्नीं । सर्वहि करण चाळक लाउनि रसधंदा । यास्तव नामें सगुणा भजती गोविंदा । उभ्दव संभव निरसुनि छेदुनि भवबंधा । कृष्णदयार्णव केलें नरहरि मतिमंदा ॥३॥

॥श्रीकॄष्णदयार्णवकॄत सफ़ुट कविता समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP