-
पु. १ ( बंदूक , तोफ , दारुकाम यांचा ) आवाज ; स्फोट ; धडधडाट ; ( सामा ) मोठा कडाक्याचा आवाज ; कडकडाट . २ ( सामा . ) आवेश , झपाटा व गडबड यांनी युक्त असे कोणतेहि दृश्य . जसेः - काम इ० करण्याचा सपाटा , तडाखा , चपळाई , झपाटा ; वादळ इ० कांचा जोर , क्षोभ , तडाखा ; ( सांथ , रोग इ० कानी मांडलेला ) सपाटा ; सप्पा ; धुमाकूळ ; जोराचा उपद्रव ; ( लढाई इ० कांतील ) धुमश्चक्री ; खणका ; दणदणाट ; धूमधडाका ; कल्लोळ . ( क्रि० मांडणे ; मारणे ). इतर उदाहरणांकरिता तडाका शब्द सर्वसाधारण अर्थी व अनेक रुढ अर्थी एकमेकाशी जुळतात हे खरे असले तरी त्या उभयातांत एक सूक्ष्म फरक आहे तो असा की तडाका शब्दांत जोर , आवेश यांचा वाढता प्रकर्ष ध्वनित होत असतो त्र धडाका शब्दांत मोठ्या आवाजाने सहित असा जोर , आवेश , सपाटा इ० अर्थ अभिप्रेत असतो . [ हिं . धडका ] - केबाज फुलबाजी - स्त्री . ( शोभेचे दारुकाम ) इंग्रजी फुलबाजीचा एक प्रकार .
-
ना. झपाटा , तडाखा , सप्पा , सपाटा ( कामाचा );
-
m An explosion; crash. The ravages of an epidemic. The raging of a tempest. The din and roar of a battle.
-
ना. कडकडाट , खणखणाट , धडधडाट , धूमढडाका , धुमाकूळ .
Site Search
Input language: