॥प्रसंग॥ १०२

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (धाटी-राजीवनयन०) रुप रामरायाचें देखिलें वो । त्याचे चरणीं मानव माझे रंगले वो । चित्त हें विव्हळ रामें वेहिलें वो ॥१॥
जीवीचा जिव्हाळा आत्मरामरावो । जाणतो सकळ माझा अंतर्भावो । त्यासी तुह्मी येक वेळ भेटवावो ॥ध्रु०॥ कोंवसा असतां माझ्या शिरावरी । संसारी गांजिले येणें दुराचारी । आतां मज कंठवेना क्षणभरी । शरयुतीरी स्वामी माझा नांदताहे । हणुमंत सेवक त्याचे घरी आहे । निरोप सांगा रामदास वाट पाहे ॥३॥

॥वोवी॥ धन्य रामदास सिद्ध प्रसिद्ध । अनुभवीक हें त्यांचें पद । करुनि घ्या होतो भावार्थ विशद । प्रेम अगाध जयाचें ॥१॥
स्वरुप देखिलें तें चि देखावया । संतुष्टपणाला सपुष्ट व्हावया । गाईलें चि पुन: पुन्हागावया । नावरता उल्हासु उसळलासे ॥२॥
विलोका प्रेम तें पदपादबंदीं । श्रीरामजिव्हाळा वानिला दयाब्धीं । टिपण कराया नसे अवघीं । सद्महिमावर्णन तूर्त असे ॥३॥

॥अभंग॥ रंगले श्रीरामीं जयाचें मानस । चित्त जाले पिसें रुप पाहूं ॥१॥
श्रीरामावांचूनि नेणती अन्यथा । सांगती ते कथा श्रीरामाची ॥२॥
श्रीराम तारक जयाला भर्वसा । संसारु सहसा नावडे चि ॥३॥
कर्मेना जयाला अन्य सोस कर्मी । अहंभावऊर्मी जिरलीसे ॥४॥
आत्मारामसखा जयाचा निश्चय । आलेति तन्मय निजीनिज ॥५॥

॥वोवी॥ होऊन यापरी भक्तसज्ञानी । आत्मारामा विलोकूं धणी । विनविलें हो नम्रतावचनीं । रामोपासक भाळाया ॥४॥
श्रीरामगडी ते रामीं रमती । राम चि सबाह्ये होऊन वागती । भाळणें जयाचें श्रीरामप्राप्ति । शरण्या करिती आपणासी ॥५॥
प्रसन्न जाले हो तेणें वैष्णव । अखंड भेटला श्रीरामराव । भेदाभेदाचा पुसोनि ठाव । महानुभाव सुखावले ॥६॥
आराध्यमूर्ति श्रीरामचंद्र । ज्याचा दयाळु करुणासमुद्र । वंदिती जयाला हरु ब्रह्मेंद्र । पुण्यदाय थोर नाम ज्याचे ॥७॥
रामचंद्राचा स्मरणप्रभाव । वानिलें ऐका हो पावाल वैभव । धन्य चिंतनेची फळदाय थोरीव । सफळ होतसे विश्वासिका ॥८॥

॥श्लोक॥ अश्वमेध घडले शत ज्याला । सोमयाग गणना न हि त्याला । कोटिवेळ मलिकार्जुन केला । रामचंद्र वंदना जरि आला ॥१॥
जन्मजन्मकृत कोटि अघात । मारिले स्वजन विप्र अघातें । सर्व दोष निर्सोनि च गेला ॥रा० ॥ पूर्वजासि आपुलें क्षणकाळें । मोक्षसूखपदवीप्रति नेलें । पूर्वपुण्य घडलें चि तयाला ॥राम० ॥४॥

॥वोवी॥ वानीत स्मरणाचा महिमा यापरी । सज्जनगडीं राहिले भवारि । सौख्य सद्‍वृंदा वाटलें अंतरीं । चरित्र ऐका हो आदरें ॥९॥
तंव अनुमानलें श्रोतयामानसीं । स्मरण हें असतां सुकृतरासी । जपती बहुतांनीं अहिर्शिसीं । फळत्कारी सर्वत्रा कां होईना ॥१०॥
वक्ता ह्मणे हो ऐका सद्भावें । येऊनि स्थिराया रामचंद्रनांव । पुण्यवंत वदन तें स्थान असावें । माईक माव ते कामा नये ॥११॥

॥अभंग॥ धन्य तो चि नर निर्मळ होठेला । परमार्थासी जाला योग्य बहु ॥१॥
येरवीं लोकांचे कापटय करणें । व्यर्थ क्रियेवीण चावळती ॥२॥
रामचंद्र आधीं ठावा नसे ज्याला । त्याचे वदनाला येतो कैसा ॥३॥
सन्निपातरोगी नामज्ञान बरळे । वेडा बीदीं लोळे योगी काये ॥४॥
कुपथ्य करितां मात्रा नेदी गुण । माती नव्हे सोनें परिसाचेनि ॥५॥
आत्मारामनाम करील पवित्र । वदन पुण्यपात्र ज्याचें असे ॥६॥

॥श्लोक॥आ०॥ श्रीरामचंद्र वदनाप्रति ये फळते । लीळा अखंड वदनीं परि गाय सत्य । तेणें गुणें विषयवर्जित होय वृत्ति । खेळे सबाह्य भरुनि परमार्थमूर्ति ॥१॥

॥वोवी॥ ऐसें असे हो हें महिमान । सुकृतवंताचें जें कां बोलणें । फळसौख्यभोग ते पुण्यवंत जाणे । असो अवधारा कथा पुढें ॥१२॥
कृपावंत जाले श्रीरामगडी । संतर्पण होतसे सज्जनगडीं । चाखवीत सर्वत्रा कथामृतगोडी । सत्पुरुषमेळा मिळाला ॥१३॥
स्वस्थळाप्रति जाऊं इच्छिलें ॥१४॥
तों कारकून सांगती नृपाजवळी । संतर्पणाची संख्या जे धरिली । सवा लक्षाची गणित जाली । ब्राह्मणाची च आज्ञावत ॥१५॥
न यता च आतां नूतन द्विजवर । आहे ते आठविती दारापुत्र । कार्यभागाचा पुढील विचार । आज्ञाप्रमाणें होईल ॥१६॥
कोणसमयीं काय काय साहित्य । लागेल कीं तें असावें श्रुत्‍ । आइतें असेल तें आणऊं येथें । विळंबावरी पडेल ॥१७॥
नराधिप वदे कळला वृत्तांत । विचारुनियां कळवीन तुह्मातें । तैसें संपादिजे कार्यभागातें । येरुं तथास्तु ह्मणतिलें ॥१८॥
सद्गुरुपासी येउनि नृपाळ । नमोन कळवितां वर्तमान सकळ । तुष्टोन पुसती दीनदयाळ । मनोरथ तुझा रे पुरला कीं ॥१९॥
धनें भूषणें वसनें सुवाक्यें । जेणें धरामरा वाटेल हरिख । बोळवीं जाऊं दे स्वस्थळा सुखें । मग हरिजना हि देऊं निरोप ॥२०॥

मग वंदोन राजा तो गेलियावरी । मनोदय कळविती सत्सिष्या भवारि । सयंपाकरचनेची सांगोन कुसरी । याप्रकारें ह्मणतिलें आजि करवा ॥२१॥
मुरडकानवले शर्कराभरित । दहिभात बुत्ती केशरीभात खीर सेवयाची थिजलें घृत । सायदुग्धमट्ठा कोरवडे ॥२२॥
कोसिंबर्‍या चटण्या लवणशाखा । तिळपूट लाविली ते मिसळशाखा । संतोष वाटेल भूमिजानायका । तैसें करवावें निर्मळ मनें ॥२३॥
ते वंदोन साहित्य कराया गेले । सत्पुरुष भोंवतीं होते मिळाले । इक्षोन दासांनीं तयांस बोलिले । कृपा केली हो बहुत चि ॥२४॥
तुमचेनि साजलें हें सज्जनगडनाम । संतोष पावला देव श्रीराम । बहुकाळ ऐसा व्हावा संभ्रम । होता संकल्पु पुरवला ॥२५॥
संसारिक ते दुर्बळ लोक । नसे सुटाया उसंत क्षणेक । दाविलें तयांला कीर्तनसौख्य । बळें चि दर्शन देऊनि ॥२६॥
उत्तीर्ण नव्हे मी उपकारासी । उपचार नव्हे हा जे आर्त मानसीं । सर्वज्ञराउळे विदित तुह्मांसी । आतां जें उचित तें करा ॥२७॥
रामदासांचे ऐकोन बोलणें । उत्तर न देववे केलें नमन । ह्मणती सांगींचे अवेवा स्तवन । काम करितां हि न लगे चि ॥२८॥
विजय पावाया हे जगामध्यें । थोरपणाचा हा आसिरवाद । गुरुदेवा तुह्मा नसे चि भेद । सांभाळ करित असावें ॥२९॥
प्रत्येकीं प्रत्येक येकेक भक्तें । श्रीराम सेवका वानिलें बहुत । विस्तारें सांगतां तें वाढेल ग्रंथ । मुख्य येकमय असती हो ॥३०॥
तयांप्रति सांगती दास मोक्षदानी । टिपर्‍या घालाव्या आजिच्या कीतनीं । येरु सेवा हे घ्या सिकऊनि । ह्मणोनि हांसिले विनोदिती ॥३१॥
येक संत बोले दास सज्ञानी । सर्व कार्यकळा असती ध्यानी । गुरुख्यासवें खेळले रानीं । बाल्यदशा जैं स्वीकारिली ॥३२॥
येक ह्मणे हो जाणती तयांनीं । घालितां पाहूं स्वस्थ बैसोनि । येक ह्मणे हो ज्ञानेश्वरांनीं । सिकवोन बहुतांला खेळले ॥३३॥
विदित नामदेवा टिपरीखेळ । पंढरपुरवासी जाणती सकळ । येविषईं दासोपंत कुशल । दासदयाळा हि ठाऊक ॥३४॥
दास तो चि हो कपिनायक । खेळतां गोपाळीं वनीं हरिखें । पाहिलें तरी आतां असे ठाऊक । दास तो चि हो कपिनायक । खेळतां गोपाळीं वनीं हरिखें । पाहिलें तरी आतां असे ठाऊक । एवं करुनि सुखवाद ॥३५॥
स्वस्थळाप्रति गेले महाजन । पाठ पदें ते करिती उजळण । सिकविती सिकती करुनि नूतन । जे जे इच्छिलें खेळ पाहूं ॥३६॥
इकडे जाली हो पाकनिष्पत्ति । समुदाव मिळाला मांडल्या पंग्ती । पुजोनि ससांग यथापद्धति । वाढिते जाले चपळत्वें ॥३७॥
स्नानादि नेमाचा विस्तार कथितां । भोजनादिक पदार्थ वानितां । शक्ति हाताची न पुरे सर्वथा । ह्मणोन सारांश वदणें कीं ॥३८॥
सर्व भूयात्रा करुनि आला । ठळक ठोकवार्ता सांगे जनाला । नित्यकर्मादि सर्व स्थानलीळा । सांगतां यथापद्धति । वाढिले जाले चपळत्वें ॥३७॥
स्नानादि नेमाचा विस्तार कथितां । भोजनादिक पदार्थ वानितां । शक्ति हाताची न पुरे सर्वथा । ह्मणोन । ह्मणोन सारांश वदणें कीं ॥३८॥
सर्व भूयात्रा करुनि आला । ठळक ठोकवार्ता सांगे जनाला । नित्यकर्मादि सर्व स्थानलीळा । सांगतां व्यवहार पुढील खुंटे ॥३९॥
खबर कळवावी जालें लग्न । सोहळे वानावे ठळक जे मान्य । होमहवनादि सडासंमार्जन । न सांगतां शाहणे जाणिजेती ॥४०॥
तेवि श्रोतेनो उत्साहकौतुक । समजा संकेतीं विधान अस्क । प्रसन्न जालेति श्रीसमर्थ देशिक । वाटलें सौख्य सकळांसि ॥४१॥
वाढणें जालें यथाविध्युक्त । यथाक्रमानें जेविती विवरत । तांडव करुं लागे जगन्नाथ । दैववंतांतें विलोकुनी ॥४२॥

॥अभंग॥ भोजनाची चवी जाणें तो गोसावी । लाभेल पदवी जाणत्याला ॥१॥
कोण अन्न खातां कोण जाणे गोडी । निर्धारुनि काढी तो चि योगी ॥२॥
पोटांत सिरेल तें सर्व हि अन्न । वेगळाले गुण कां उठती ॥३॥
विवरविवरोन भोजन करीतां । वर्मासी जाणता धन्य जगीं ॥४॥
उत्पत्ति प्रळय स्थिती गुणागुण । तरणें बुडणें हेतु अन्न ॥५॥
प्रसाद भावितां प्रांतासी पाववी । अभाविका गोवी संदेहता ॥६॥
सर्व हि नासतां उरे अन्नब्रह्म । देव आत्माराम दाता भोक्ता ॥७॥

॥वोवी॥ हें असो सर्व हि जाणते ज्ञाते । दाविते सुपंथा भ्रमासि हर्ते । जेविती बोलती सांगती जे ते । सारमये चि सर्व हि ॥४३॥
करवट संसारीं होऊं बळें । संज्ञिती मुरडकानवले । येक हरिदृष्टी होऊं समेळ । दहिभातकाला मांडलासे ॥४४॥
सेवया गुरुपाद सेवाया सुचवी । घृतगोळा तो ऐक्यरस दावी । सर्वोपासना येक चि पदवी । लवण रुचिकर सत्व शुभ्र ॥४५॥

सर्व साधनें तीं लक्षूं येका । तेवि बहु मिष्ट सरमिसळशाखा । काळकर्माचा नसे चि धोका । ह्मणोन चित्रान्न वोप दे ॥४६॥
असार तक्रहि गोडील आलें । कर्म कचाट तें भजनी शोभलें । ससांग विवरणीं भोजन जालें । दिधले ढेंकरें प्रत्यय ॥४७॥
सत्य समाधान साजिरें जीवन । सर्वांग शोधनें निवविलें तेणें । जालें माघारी त्रिपुटी बोलणें । टाकिलें उच्छिष्ट विखक्रिय ॥४८॥
संशय संकल्पा आंचवले । बोधसुरंगी विडे सेविले । स्थितिसंपन्न विसावा घेऊनि उठिले । मग मिळाले कथारंगणीं ॥४९॥
कर्म ज्ञान विरक्ति त्रिगुणात्मक । मिळाले इतर त्रिविधलोक । हांसोन बोलिले दास मोक्षदायक । टिपर्‍या घालाव्या सप्रेमें ॥५०॥
ऐकोन यापरी प्रसन्नवाणी । संतोष पसरला सकळा मनीं । अपेक्षा सर्वांचें अंत:करणीं । दाविजे स्वामींनीं हे कळा ॥५१॥

पुरवावया मनोरथातें । टिपर्‍या घेतल्या स्वयें समर्थे । जोडीकर जाले जाणते भक्त । कोणी ह्मणताती पाहते आह्मी ॥५२॥
हांसोन तयांला पुसती सर्वज्ञ । श्रीकृष्ण गडी तुह्मी पुरातन । खेळला खेळ तो आठवा पूर्ण । तेणें गदगदा हांसती ते ॥५३॥
उत्तर देती हो योजुनी योग्य । केव्हां हि आह्मी पाहणार उगे । मग साज साजऊन यथासांग । धृपदी राहिले दो भागीं ॥५४॥
टाळघोळ वीणेमृदांग डमरु । मिळवोन ते स्वरीं मंजुळ स्वर । कटाव दाविले बावीस प्रकार । पद भजन येकेक ह्मणोनी ॥५५॥
गाइलें होतें जें साधुसंतांनीं । प्रस्तुत केलें जें कविराजयांनीं । तें साहित्य करिती धृवपदी यांनीं । नाचती तर्‍हेनें भावयुक्त ॥५६॥
कोडेंपद ते अर्थ बिकट । जेवि भारतीचे व्यासघाटकूट । भल्याचे मानसीं आर्त मोठें । भाव पुसायाकारणें ॥५७॥
पुसोन घेतील तें पुढें रहस्य । समजाऊन हरुषीं मिळविती दास । प्रस्तुत पदार्थीं मिळवोन मानस । श्रवण करा हो सद्वाक्य ॥५८॥

॥पद॥टि०॥ चिंचेच्या पानावरि देऊळ रचिलें । आधीं कळस मग पाया रे । पाहों गेलों तों देऊळ उडालें । परिसी सद्गुरुराया रे ॥१॥
मानेना मज मानेना । जीवासी बंधन करवेना ॥धृ०॥ पाषाणाच्या सांगडी मृगजळडोहीं । वांजेचा पुत्र पोव्हला रे । दुतोंडहरण येक पाणियासी आलें । मुखविणें पाणी प्याल रे ॥२॥
आंधळ्यानें देखिलेंख बहिर्‍यानें ऐकिलें । पांगळ्यान वाटलाग केलें रे । येकाजनार्दनी हें वर्म जाणिलें । अखंड रामनाम वदा रे ॥३॥

॥दासोपंताचें ॥ जळ नाहीं स्थळ तेथ कमळणी आहे चहुं श्रृंगाची गाय रे च० ॥ चेतुश्रृंगाची गाय रे ॥१॥
नवामाजी दाहावा मुनी जन वदती । कमळीं कमळीं सांग काय रे ॥२॥
अग्नीवीण जळताहे त्रिभुवनपोहळया । सिख पंच विधिताहे रे सीख ॥३॥
जाणसील जरी तरी सांगसी तें न घडे: । कळला भेदासी काय रे ॥४॥
सांग सांग सरोजे काय रे । मुन्यावरील बोल आहे रे । खेळिया मुन्या सावधान ॥धृ०॥ कमळ कमळी तेथें भ्रमर भ्रमर भ्रमती । पावती तें पद अविनाशा रे ॥०॥ नर सुर पावती तें पद:नाश रे ॥५॥
तयामाजीं पाहतां पुरत्रिया देखिला । ब्रह्माविष्णुमहेशा रे ॥५॥
तिन्ही देव ब्रह्मा०॥६॥
चंद्रसूर्य हे दोन्ही ग्रहण । सकळ चराचर बहुचरे चरा०॥७॥
दिगंबरविण कमळीं कळे तरि पाणी वाहिन साह मास रे ॥पा०॥८॥

॥दासकृत०॥ (राग शंकराभरण, धाटी दृश्य पा०॥) जागा रे जाग जागते चोरटे आहे वागते । साचोल जालिया निश्चितें राहणें खोटें ॥१॥
नागवले थोर थोर तुह्मी काय मजुर । लटिका चि धरुनि आधार । दुश्चित कां रे ॥२॥
पाहों जातां आडळेना । पासूनि दूरि होईना । लपोन बैसलें कळेना । जागतयासी ॥३॥
हातींचें हिरुनि नेतें । धनपीसें लावितें । जागेंपण पळोनि जातें । परी जवळीच ॥४॥
रामीरामदासापासी । आले होतें आनयासी । मरोन गेले तयांसी । ठाव चि नाहीं ॥५॥

॥(शंकाभरण) ॥खाणोरी घरभेद्या आला । दोर कापून खुंटा नेला । राहोसी ग्रहण लागला । खग्रास जाला ॥१॥
पांगुळ बहु खंगली । ब्रह्मांड भेदुनी गेली । पालट जालिया खुंटली । तयाची गती ॥२॥
आधारें दुमाल केला । प्रकाश लोपोनि गेला । आंधारी लपोनि राहिला । न दिसे कोणा ॥३॥
लस्केरी पारिखे जाले । तरवारेसि घाय केले । मृगजळी बुडोनि गेले । हत्तीचे भार ॥४॥
दिवस उगवला माहालरायांत गेला । उलकें कोठार खाउनि ठाव पाहिला ॥५॥
आपुली साउली ज्याली विक्राळरुपें धाविली । कितेकें बापुडीं खादली । संख्या ही नाहीं ॥६॥
विष हें खाउनि जिती । मज आहे प्रचिती । अमृतखाडान मरती बापुडे येक ॥७॥
पक्षीराज भ्रंगळले । उदक सेउं लागले । दुग्धाची परीक्षा नेणती । भुलोनि गेले ॥८॥
दिवस मावळला अत्यंत अंधार जाला । रायातुनि माहाल आला । मागुती सये ॥९॥
रामदासाचिये माये । पुत्राच्या पोटांत जाय । वंध्या येकली येकट । करील काय ॥१०॥

॥शंकाभरण॥ चोरटें होतें बैसले पाहों जातां आढळलें । अंतर जाणोनिया केलें सावध रामें ॥१॥
सावधान जागीनले । गलबल्यासि गुंतले । मागोनी भिंताड फोडिलें । चोरटियानें ॥२॥
देखोनिया रामदास हाकारिलें तयास । थोर नसतां विश्वास बाणोनि गेला ॥३॥

॥धाट टिपरी॥ जाणवेना जाणवेना । जाणसि तरि तें सांगवेना ॥धृ०॥ अंतराळी येक देउळ पाहे । पैल कळसावरुता देउं रे ॥१॥
देवासि पूजितां देउळ चि वाव । पुसे तयाचा ठावो रे ॥२॥
देवासि पुजितां देउळ चि पाडिलें । ऐकुनि धावलि माये रे ॥३॥
देउळाखालें द्डपलि तेणें । भक्ताचा जीव जाये रे ॥४॥
बागुलें बागुल मारियेला तेणें । लेंकुरासि आनंद जाला रे ॥५॥
अमृतसागरीं बुडोनि गेला । दास तो जीत ना मेला रे ॥६॥

॥टिपरी॥ ऐकरे खेळिया तुजला सांगतों । आपुलें स्वहीत करी रे । घडीनें घडी आयुष्य नेतो काळ लागला मापारी रे ॥धृ०॥
येक कोडें आसतां दुसरें केवि संसारकोडें उगवी रे । काळ हा कोणासि आवरेना तुं तयासि वेडा लावी रे ॥१॥
आतां चि कोडें उकलुनि पाहीं । मग रिकामा मिठीं नाहीं रे । विषयकामीं गुंतोनि जासी मग तुज नुमजे कांही रे ॥२॥
शरिर जायाचे मागोनि आणिलें । आपणासी हें भोगिना रे । आपुलें निजरुप ठाई न पडतां आक्षयसुख लाभेना रे ॥३॥
ऐसें चि खेळुनि उदंड गेले । आह्मातुह्मा पाड काई रे । रंग हा वोरंग होऊनि जाईल आपणासि वाईट ठाई रे ॥४॥
रामदास निरोप सांगोनि गेला । चला पाहुं आपणाला रे । टिपरी कर हे आपण घालिती सांडोनि जाऊं मनाला रे ॥५॥

॥भजन॥ श्रीरामा मंगळधामा रे । जय जय रामा॥ पावना रामा पतितपावना रामा ॥
॥पद॥ राम राम राम राम वदा गडया रे । राम राम राम राम वदा रे । नाहींच मग ते भवभय बाधा कां कष्ट नानाविधा गडया रे ॥धृ०॥ बहुत चि सिणतां कर्मकचाटीं न चुके ते यमबाधा रे । कापटयकरणी करितां जनिं या सवें चि होइल भदा ग०॥१॥
तीर्थाटण बहुवृतादि करितां न धाये चि मन कदां रे ॥ योगांत वाकता पार चि नपवे होये कि नव्हे हें शोधा ग० ॥२॥
आत्मारामपदि तनमनधन हें भावें करुनि नीवदा रे । जडमूढ पावन होतील झडकरी रामभजन प्या सुधा गडया रे०॥३॥

॥वोवी॥ कोणी अर्थात शोधून पाहती । अलोमविलोमा नाचणें देखती । धालों निवालों कोणी ह्मणती । कोणी वानिती कीर्तिमहिमा ॥५९॥
चौघे साहजण आठजण । बारा सोळा बत्तीस मिळोन । कळाते दाविती तर्‍हेतर्‍हेनें । करविती हेळणें स्वर्गासी ॥६०॥
दमासि येता थकता पतक । उभे करिती निवडोन आणिक । आरती गाउनि सेवटीं हरिखें । फळें मिठाया वाटिलें ॥६१॥
जाउनि आपुल्याल्या बिर्‍हाडस्थानीं । सायंसंध्यादि सुनेम सारुनि । न बाहतां मिळाले कथारंगणीं । साजसज्ज केले सेवकीं ॥६२॥
कीर्तनास ठाकले रामदास कवी । उल्हास पसरला सर्वाचे जीवीं । कारण हो याच सर्वत्रां हृदई । अपेक्षा होती कां ऐका ॥६३॥
सर्वज्ञलोका विदित भावना । निरोप देतील श्रीगुरुराणा । त्याचेनि सांगण भावीकजना । कळोन येरा सुचविलें ॥६४॥
तेणें संकल्पु सकळिका पोटीं । कथा गुरुमुखें ऐकिजे सेवटीं । मूर्ति अवलोकिजे भरुन दृष्टी । हारपरिमळु समर्पिजे ॥६५॥
मानिती हें चि सुलभ पूजन । येकत्र जाले असती सज्जन । तरि तोषविजे बुक्काहारानें । तेणें श्रीराम तुष्टेल ॥६६॥
सफळित यात्रा होणार येथुनी । दीपाराधना देवा समर्पुनी । साखरमिठाया वाटिजे घेउनी । शक्तिनुसार भक्तीनें ॥६७॥
हा वळखूनियां भाविकी भाव । कथा करुं उभेले महानुभाव । चहूंकडे होऊं लागला उत्साव । पंढरपुरांत ज्यापरीं ॥६८॥
प्रत्ययवाणीनें बिंबवित अर्थ । गाइलें दासांनीं सप्रेमयुक्त । सारामाजील सारांश मथित । येक दोन वाक्य अवधारा ॥६९॥

॥श्लोक॥ अक्रा अक्रा अक्र अक्रा अकक्रा । शक्रा शक्रा शक्रशक्रा शकक्रा । नक्रा नक्रा नक्र नक्रा नकक्रा । वक्रा वक्रा वक्र वक्रा वकक्रा ॥१॥

॥पद॥ धाट-फुट॥ बत्ती लागली दारुला । दारुसगट बुधला गेला । धूर असमानीं दाटला । नये तो पुढती ॥१॥
ती कसि रे विझऊं पाहति लागली बत्ती ॥ध्रु०॥ बत्ती लाविली तोफाला । पुढें धणी च उभा केला । काय भीड त्या तोफाला । उड उनि देती ॥२॥
बत्ती लाविली कर्पुरा । ज्योतिस्वरुप भरला सारा । आला मुळींचिया घरा । न राहे रती ॥३॥
ऐसी सद्गुरुमाउली । दासा बत्ती लाउन दिधली । निजवस्तु ते दाविली । स्वयंभज्योती ॥४॥

॥वोवी॥ पदवग्त्रुत्वीं फिरोन बुद्धि । बहु आर्तवंता गवसली समाधि । प्रश्न कराया नसे चि संधी । प्रेमाश्रुसमृत्धि जालीसे ॥७०॥
जव फुलेहाराचा जाला सुकाळ । तुष्टोन तेव्हां दासदयाळ । बोलिले पुष्पाचे तारीफ सकळ । वाक्य रसाळ ऐकिजे ॥७१॥

॥श्लोक॥ फुलें हार माळा बहुतापरीच्या । तुरे घोष जाळ्या बहु कूसरीच्या । दुधारे तिधारे चतुर्वीध धारे । कीती हार शृंगारिले वाड धारे ॥१॥
॥कळे गेंद पूर्ण बहु रंगवर्ण । किती गुंफिली रम्य रत्नें सुवर्ण । झबे झेल बासिंग बोली फुलाच्या । लघु कंचुक्या गोपो कुंच्या मुलाच्या ॥१॥

॥वोवी॥ मानवोन यापरी सकळिकांत । गाइले आरती विधानयुक्त । विश्रामस्छानीं पावोन समस्त । गात सत्कीर्ति विसावले ॥७२॥
भजन भोजन श्रवण प्रबोधु । हारपरिमळु मंजुळ शब्दु । भक्तिभाव प्रेमा गुरुसेवाछंदु । पूजन प्रसादु सुकाळ ॥७३॥
परोपकाराची अत्यंत आवडी । बुद्धिवाद जाणणें जाणती गोडी । स्वानंदसागरीं घालिती उडी । परमार्थसुकाळ जालासे ॥७४॥
नेमिष्ठ वृतस्छी विरक्त निस्पृही । दानधर्मकर्ते जाणते अन्वई । बहुतापरीनें विदित चतुराई । याचा सुकाळ जालासे ॥७५॥

॥अभंग॥ धन्य गुरुभक्त थोर कीर्तिवंत । दोषा दु:खा लातें हाणितलें ॥१॥
परस्त्री परधन पैशुन्य बोलणें । अन्याय हेळणें न जाणती ॥२॥
कामना ईषणा मद लोभ किंत । कापटय कुपंथ नाहीं ठावा ॥३॥
सत्संग आवडी कीर्तनाची गोडी । स्वात्मानंदी बुडी दिल्ही जिहीं ॥४॥

॥वोवी॥ कुटिळ काठिण्य निंदा द्वेष । दुर्भ्रम निर्दया पाशादि आस । अदेखणा अक्रिया साधनत्रास । याचा दुष्काळ ते ठाई ॥७६॥
हें असो मिळाले असती सदरि । सादरें तिष्ठती सित्ध साहुकार । वस्त्रभूषणादि शक्तिनुसार । वोपिती विनवोन दासासी ॥७७॥
स्वीकारुनियां परहितार्थ । योग्यतानुसारें देती तें उचित । निरोपसमई गलबला किंचित । करुं नेदिती सर्वज्ञ ॥७८॥
जाणता नृप तो गुरुभक्त भला । आळस अश्रत्धा थोरिवा वर्जिला । श्रीगुरुआज्ञाप्रमाण जयाला । तृणतुच्छ केला ऐश्वर्य ॥७९॥
खोबरेंखारिकादि मेवासहित । महाद्वारीं असती सद्भक्त । प्रसाद वोपिती जाणार्‍यातें । तो दंडक उत्सावीं आजु असे ॥८०॥
हें असो समूहामाजि गुरुमूर्ति । ते अवसरीं शोभले गुजगुह्य बोलती । तों सन्मुखी पातला कपटमती । वर्पांग योगी सोंगानें ॥८१॥
विषयार्तीचे दांभिक भजन । कार्पण्यकवळयाचें तत्वज्ञान । वारस्त्रियेचें वदन मंडण । दिसे चांगुलें ज्यापरी ॥८२॥
संगिकाप्रती बोलतु रोषें । भगलें सर्व हें केलेति दासें । न जाणते भोळे जालेति पिसे । राजा तो वेडा येकरोखी ॥८३॥
मजपुढें तें केवि टिकतील । मंत्रदैवताचें मज असे बळ । सर्वत्रासि हें कळवोन भगल । पूजा घेईन प्रतापी ॥८४॥
हे अधिक कळा असे मजपासीं । प्रेरितां दैवतु दुसर्‍या मानसीं । वर्तमान कळविती वश्य लोकांसी । करुनी आज्ञांत राबविती ॥८५॥
पेंचांत आणितां येक दासाला । जी सर्वांनीं ह्मणतील मजला । या हेतु लगबगा दुरोन पातला । सोंग बहु दाविला निकियावरी ॥८६॥
धन्य स्वामीचें अवतारकृत्य । सीक्षोन अभक्ता दाविजे सुपंथ । उत्धार कराया कुटिळ योगीत । ह्मणतिलें कल्याणा हो सावध ॥८७॥
पद येक लिहिविलें तये काळीं । तों कपटयोगी हि पातला जवळी । सन्मानूनि बसविलें सभामंडळीं । कृत्रिम करावा जंव त्यांनीं ॥८८॥
स्वामीराज वदती ह्मणे रे तें पद । गाऊं लागला अर्थ करित विशद । ऐकती भल्यांनीं होऊनि स्तब्ध । कपटिया वर्म लागतसे ॥८९॥

॥पद॥ धाटी फुट ॥ हरि हरि ध्यान रे । वरि वरि ध्यान रे ॥ध्रु०॥ सगळा आगळा बगळा मासा गठ करी गिळीतो कैसा । हालेना ना चालेना ध्यानीं कोण तमासा ॥१॥
मांजर उंदिर लक्षी तेव्हां तटस्त होउनि राहे । तैसा कपटी लोचन लाउनी विषईं वास पाहे ॥२॥
रुद्राक्षाच्या माळा सोळा आणिक वीस तीस । कांहीं स्फटिक कांहीं तुळसी । ह्मणवी शंकर उदास ॥३॥
उगी च आवघी खटपट केली परी हो वेषधारी । रामदास होसिल तरी तो राम रवरव वारी ॥४॥

॥पद॥ धाट फुट॥ तें काय योग काय भोग काय ॥ध्रु० ॥वरि वरि स्मरणी माळा काय । आंत हे चोढाळ काय ॥१॥
वरि वरि शाठीदंड काय । अंतरी हें भंड काय ॥२॥
वरि वरि ब्रह्मज्ञान काय । आंत मद्यपान काय ॥३॥
रामदासीं भगली काय । ज्याचेंझ्ख भगलें त्यासी खाय ॥४॥

॥वोवी॥ पदरुप तें होय स्वपदवी । दुर्रोगा कठीण वखद जेवि । संतोषले सर्व गोसावी । होय भगल्याचें दैवत ॥९०॥
जंव घेत गडनाम आला कपटी । जंव देखिला गुरुदेवा भरुनि दृष्टी । कल्याणकारीची वाक्यामृतवृष्टि । सरिता कर्णपुटीं जंव जाली ॥९१॥
तंव निरवोन गुरुदेवा गृहस्छातें । भूते पळालीं होऊनि मुक्त । भरवसा तुटला जाता भ्रांत । विसांवो पाहात गुरुपाई ॥९२॥
धन्य कल्याणमहाराज भोळा । गुरुहृद्गतींचें विदित जयाला । सिंतर्‍यास गुरुपदीं मिळवावयाला । शुद्ध करुं लागला सवर्मे ॥९३॥
जन्मापासोन येथपरियंत । वेषयोग्यानीं जें केलें कृत्य । कळवितां सर्व हि अर्थ सांगण्यात । तो लोटला श्रीगुरुपायांवरी ॥९४॥
अनुतापोन ह्मणे मी असे दुर्गुणी । मग आठवितां आपुल्या अधम करणी । जळप्रवाहो चालिल नयनीं । स्तवितसे तारी गुरुवर्या ॥९५॥
देखोन तयाचा पालटला भाव । कृपावंत जाले सद्गुरुराव । सस्वरुपानंदीं दिधला ठाव । मानिलें नवलाव सर्वहीं ॥९६॥
अनुतापबावा हा वदले संतांनीं । तापाजीनांवें बाहिलें जनीं । पुसोन समर्था नमन करुनि । राहिला जाऊनि केदारीं ॥९७॥
ऐशा लीळा ह्या दाऊनि समर्थ । कितेकीं होऊं नेदिती श्रुत । आतां ऐका हो पुढील वृत्तांत । निरोपा जालें सादर ॥९८॥
धन्य जगीं ह्या दाऊनि सोहळा । धरामरासी बहुमान जाला । सुखरुप ते ही पातले स्वस्छळा । थोरीव कीर्ति वानित ॥९९॥
आप्तवर्गा सांगती हरषुनी । धन्य दासाची अद्भुत करणी । स्वयें निस्पृही राहणार वनीं । उपकारास्तव गुंतलेति ॥१००॥
ऐसा न देखों जाणता दाता । समान सर्वत्रा केलें ममता । मजलपरियंतीं वाहिले चिंता । परामर्ष करविलें सर्वापरी ॥१॥
येवोत कोणी बंड पाषांडी । कृत्रिम वेषी चाहडी लंडी । प्रसाद सेवितां त्या अवगली प्रौढी । जाले परमार्थी सादर ॥२॥
सांगत असती हें देखिलें वृत्तांत । नूतन खबरीचे येती गृहस्छ । हें असो तिकडे कविराजयातें । सत्पुरुषजनीं प्रार्थिलें ॥३॥
हे समर्था आह्मां देवदेवानें । तुमचे स्वरुपीं ठेविलें गहाण । बदला ठेऊन घ्यावें जी मन । प्रीतिजामीन घेऊनि ॥४॥
जाऊनि आंपुल्या संस्छानाप्रती । भजनद्रव्य तें येथानुशक्ती । स्मरणसह चरणा वोपूनि मुक्ति । पावोन श्रीरामीं विसाऊं ॥५॥

येक ह्मणे तैं काय हें सांगता । जगद्गुरु हे आहेति स्वथा । वाहतील सर्व हि आपण चि चिंता । स्वेच्छा विहार करुं चला ॥६॥
येक ह्मणे हो आज्ञा प्रमाण । येक ह्मणे हो स्मरण कारण येक ह्मणे हो ऐसे सुदिन । बहुकाळ श्रमतां न मिळती ॥७॥

॥अभंग॥ करावी करुणा दाता गुरुराणा । पतितपावना दीनबंधु ॥१॥
जाऊं ह्मणावें तों पाई जडलें मन । नाहीं तुह्मावीण ठाव रिता ॥२॥
देहाचेनि योगें घडे येणेंजाणें । तें हि पराधीन सत्ता कोठें ॥३॥
न जाऊं ह्मणतां चालेना संसार । प्रारब्धा शरीर सोंपिलेंसे ॥४॥
मुकाटें न जातां राहतां गर्वधर । अधिक उत्तर तारतम्य  ॥५॥
जाऊनियां येतों बोल हा लौकिक । पणाचें हें वाक्य देवाकडे ॥६॥
करुणा भाकिजे द्या पुनर्दर्शन । हें हि भिन्नपण सिद्धभाव ॥७॥
लोभ असो द्यावा ह्मणणेझ्खं हि वर्पांग । जाल्यां हि नि:संग सौख्य नोहे ॥८॥
सिणल्यासी पाहुणे ह्मणती सीणला । सिणभाग हरला वदिले उगें ॥९॥
निरोपासवें चि विघडत्व वागे । आज्ञेसी उलंघे घडों नये ॥१०॥
आत्मारामसखा हे चि विनवणी । राहोनियां ध्यानीं सांभाळावें ॥११॥

॥वोवी॥ तंव तों येकानीं धरुनि चरण । ह्मणे मी असे बहुत चि दीन । तुह्मासी लागले जी मानाभिमान । करी समाधान दातारा ॥८॥
तंव तों येकाचा दाटला कंठ । पसरला प्रेमा तों वाचा न फुटे । अश्रुधारांचा लोटला लोट । विदेही होठेले कितेकी ॥९॥
तंव कळवळ वाटला दासासी थोर । आळंगिलें हृदईं प्रेमादरें । केला सर्वांनीं जयजयकार । प्रेमी च सावध होठेले ॥११०॥
रामदास ह्मणती श्रीरामदाता । तया सर्वांची लागली चिंता । मोडूं न देतां सद्भक्तिपंथा । तारुनि बहुता व्हा सुखी ॥११॥
करुनि यापरी समाधान । निजनिश्चयाची ठसाया । खूण कळविलें अभंगीं करा श्रवण । प्रसादवचन सद्य:फळ ॥१२॥

॥अभंग॥ स्वरुपाची भेटी तेथें नाहीं तुटी । वायां चि हिंपुटी ॥च०॥८॥
॥वोवी॥ बोलतां यापरी करुनि इक्षणे । सकळिकां वाटलें समाधान । उत्धवासी बोधितां जेवि श्रीकृष्ण । भिन्नभाव हरपला ॥१३॥
मग उचित वोपिलीं वस्त्रेंभूषणें । बुकाहारानें केलें पूजन । फराळसाहित्य सीधा सित्धात्र । धन वहन उचित जें वोपिलें ॥१४॥
करुनि सर्वांनीं जयकार घोष । जंव जिघो पाहती महापुरुष । अवस्छा वाटली स्वामीरायास । बोलिले कैसे अवधारा ॥११५॥

॥पद॥ धाटी च्यामरी । पावलों गति संतसंगति । सांगणें किती सदा प्रचिती ॥ध्रु०॥ भ्रांति हरली शांति थारली । खेप वारिली जन्म तो नसे ॥१॥
वीयोग तुटला राम भेटला । भवाब्धि आटला सुख विलसे ॥२॥
जीवन्मुक्त रे ऐक्य भक्त रे । रामदास रे भिन्न तो नसे ॥३॥

॥अभंग॥ बाळकालागीं जेवि न विसंबे जननी । आह्मा संतजनीं न विसंबिजे ॥१॥
तुह्मी कृपासिंधु मी तुमचें पोसण । ह्मणुनी निरुपण न विसंबिजे ॥२॥
रामदास ह्मणे मी लडिवाळ तुमचें । विसंबतां न वाचे क्षणभरी ॥३॥

॥वोवी॥ बोलोन यापरी करितां नमन । ते ह्मणती समर्था आह्मी दोन दीन । निघाले फिरफिरों करुनि वंदन । वानीत महिमान चालिले ॥१६॥
केशवस्वामी रंगनाथस्वामी । ब्रह्मानंदजी जयरामस्वामी । निंबराजबावा वामनस्वामी । भानभट्ट सोमा सोनगुंडा ॥१७॥
मौनीबावा तुकारामदेव । हरिदास गवाई योगी वैष्णव । घेऊनि आपुला पतक समुदाव । पातले स्वस्छानीं सुखरुप ॥१८॥
स्मरणास येतां दासगुरुराव । पुण्यवंताचा होतां आठव । स्मरणासि आला संतसमुदाव । ऐका हो नांवें तयांचीं ॥१९॥
देवभक्त जे गुरुसी ध्याती । लीळा तयाची तारक जगतीं । नांवें तयांचीं ऐकोन श्रोतीं । स्मरा हो व्हाल पावन ॥१२०॥

॥पद॥ (आत्म० धाट-गुरुतवमरीदाघ ॥) सुखकर नामें हें स्मरावें । स्वहित करुनि घ्यावें । भानविक सित्धादि ऋषि देव । वोळती करिती सदेव ॥ध्रु०॥
देव निरंजन । विधी शंभु । श्रीविष्णु भगवान । शचीवर कुबेर । यम वरुण । भास्कर प्रभंजन । पावक वाक्पती । निशिरमण । वैष्णव भगवज्जन । गणपती सरस्वती शिवगण । वैशिष्ट भगवान । पाराशर व्यास । वाल्मिक । गौतम विश्वामित्र । भार्गव आस्तीक । अगस्ती नारद सनकादिक । कपिल दालभ्य । शमिक । वृषभदेव शुक । कश्यप जडभरथ । पुंडलिक । दत्त याज्ञवल्क्य । भृगु भारद्वाज । शौनक । उपमन्यु कद्रयु । कवि हरि मुद्गल । अंतरिक्ष । वामदेव दृमिळ । अत्री मैत्रेय । देवळ । प्रबुत्ध अविरहोत्र । सुत मार्कंडेय । बृहद्स्व । चमस करभाजन । सुदेव देव द्विज । संजय । आसित पिपलायन । वैशंपायन । जयमिनी । दुर्वास पावन । तापसी ऋषीजन । भृषंडी । कवकवी जामदग्न लोमहर्षण । वंदोन गावे प्रेमभावें ॥१॥
पुण्यश्लोकी हे षण्मुख । हरिश्चंद्र ईश्वाक । अयल मनु नळ । अंबरीश सुदाम चंद्रहास्य । पृथु धृव मुचकुंद । लक्षुमण । गुहक रुक्मागंद । जनक बळी भरथ । प्रहराद । सुग्रीव अंगद । गरुड गजेंद्र । हणुमंत । जांबुवंत व्याध । बिभीषण गणिका । अजामेळ । पिंगळा विदुर । येदु भीष्म जर । अर्जुन । धर्म वृकोदर । नकुळ सहदेव । पांचाळी कुकुट । उड्डसमुदाव । पृथा सुभद्रा । गोपाळ गोपिका यशोदा । शेष श्रियाळ । जनकजा । उत्धव नंद कुबजा । वसुदेव देवकी । उग्रसेन । संदी संदीपन । परीक्षिती अक्रुर । रघु थोर । कंसल्या सुमित्र । यमुना सरस्वती । भागीरथी । अहिल्या अरुंधती । संध्यावळी राधा । देवहूती । जटायु शर्वाणी । शबरी अनुसय्या । रुक्मिणी । मैत्रेयी कमळजा । त्रिजटा ऋषिपत्न्या । चंद्रावळी । सर्व ही सदेव ॥२॥
जन्मसुखदाय अवतार । श्रीशंकराच्यार्य । श्रीधर मधुसूदन । ज्ञानी हे । हस्तामलकादिक । गौड मुकुंदराज । जयतपाळ । मछेंद्र सदानंद ज्योतिरानंद । गोरक्ष । गैनी भर्तृहरी । जयदेव कविराजा । चौरंगी मध्व परमहंसादि । कृष्णद्वयपान । श्रीनिवास । दामोदर अच्युत । महामुद्गलभट्ट । नारायण । निवृत्ति ज्ञानेश्वर । सोपान मुक्ताई । चांगय्या । रेवणसिद्धेश्वर । नरसिंहसरस्वती । मरळसित्ध । जालंधर सारंग । नवलक्ष साळय्या । सनतिदास । वडवाळ वटेश्वर । निपट चर्पट । विक्रम । मुक्ता मैनावती । चांद बोधला । मृत्युंजये । गोपीचंद कानिफा । मालो नरहरी । लतिफा । नरहरी सोनार । हरिवल्लभ दामा । परमानंद । हरिदास कान्हया । परिसा भागवत । गोविंद । वत्सा वोंका सखा । विसो खेचर । कूर्मदास । नामदेव हरिदेव ॥३॥
लीळा अपार वर्णिता । भवभयभेद हरे । सिद्धनागेश । अज्ञान । रेणुकानंदन । कान्हो पाठक । कनकदा । मौनी भानुदास । पुरंधर विठ्ठल । जनमित्र । अवधूत दिगंबर । गोराकुंभार । भैरापिसा । सावता चोखामेळ । नरसीमहंता । सेना नाहवी । रोहिदास तिरलोचन । पिपाजी सजणा । मलुकदास । नानक धनाजाट । यशवंत बाजीद । रामानंद कबीर । कमाल मुत्धैया । सुरदास । समशमना माखन । रमावल्लभ । शाहुसेन । जनार्दन येकनाथ । भोळा रामैय्या । पुरुषोत्तम । लीळा विश्वंभर । चिंतामणी हरि । मुक्तेश्वर । कृष्णदासमुद्गल । श्रीकृष्ण संयोगी । प्रेमानंद । लोलिंब दासोपंत । संतोष निंबया । शांतलिंग । गंगाधर कोनेर । मुरहर बाबाजी । मदळसा । कान्हा मीरा हरि । कृष्णा जनी बहिणी । करमाई । वश्य जयाला देव ॥४॥
न येउनि आले । जन्मासी । जन बहु पावन केले । केशव वामन । रघुपति । शेषे निरंजन । कृष्णदास जयराम । पोतराज । दास तुकाराम । रामदास आजम । अलमय्या । आनंदमूर्त मल्लारी । पूर्ण शिवराम । बोधला । विठ्ठलकवि कल्याण । विश्वनाथ रंगनाथ । हेगरस । मानपुरी रुक्मण्णा । चिद्धन चांद सखी । प्रहराद । वसुदेव माधव । मध्वमुनेश्वर । रामकृष्ण । कान्हा तुकाबंधु । सुत नारायेण । नरसपैया । निपटनिरंजन । हरिनारायेण । गणेशनाथ । गोसावीनंदन । जयराम कासी । तिप्पण्णा जखप्पा । कासप्पा । आनंदतनय । शिवलिंग । सहजा कोना कृष्णा । प्रगट प्रतापी । ठाऊक । गुप्त असती अनेक । हरि जाणे येक । सित्ध साधु । दाविती बहु कौतुक । त्यजिलें संसारा । पसारा । साधिलीं त्यांत चि सौख्यें । आत्मरामासी भजोनि । सांगती लोका भावें ॥५॥

॥वोवी॥ प्रसन्न होऊनि स्वयें देव । चालविला असे वरप्रभाव । जे प्रेमादरें घेती संतनांवें । मी त्यास न विसंबे कदापि ॥२१॥
नामें तयांची सौख्यकारक । पतितपावन मोक्षदायका सत्य त्रिसत्य होय तारक । बोलिला जनक मोरयाचा ॥२२॥
सज्जनगडीं राहिले देव । भोंवतें वागती सिष्यसमुदाय । स्वस्छळा मिरवत गेला राव । चरित्र अभिनव ऐका पुढें ॥२३॥
या प्रंसंगीं जाल्या इतुक्या कथा । भक्ताभिमानी श्रीराम दाता । वानितों चरित हें करुनि साह्यता । जेवि स्ववदन पाहे स्वयें ॥२४॥
॥अभंग॥ मी तों माहाराजाच्या प्रांतीं जिलेदार । संवे सरदार आसती त्याचे ॥१॥
संदेहसंशयदुर्मतीची गढी । बळकाऊनि खोडी करिताती ॥२॥
दंडूनी तयाला करुनी सपाट । नाहीं आटघाट ऐसें करुं ॥३॥
घतां गुरुनांव होऊनियां सांव । होती स्वयमेव राजा रुजु ॥४॥
चिल्लर चोरटे दृष्टी न पडती । निर्भय वागती भोळे भक्त ॥५॥
अकबर लिहोन समर्था तोषऊं । वेतन तें घेऊं कृपामात्रें ॥६॥
आत्मारामदेव यात्रा वाहतसे । धन्य हा संतोष भक्तभाग्य ॥७॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम उन्नत । चिदाकाशीं प्रकाशवंत । आत्माराम जो सद्भक्तसहित । अखंड जेथें नांदतु ॥१२५॥
इतिश्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । रामरुप रामचंद्रनाम । वर्णन । संतर्पण । टिपरी खेळ । कुटिळयोगीउद्धार । धरामरास निरोप । साधुसंतांस बोळवणें । प्रसंग । येकशे हे दोन ॥१०२॥ जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP