॥अध्याय॥ १०४
एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.
॥श्रीरामसमर्थ॥
(केदार धाट जाले सार्थक) ॥पद॥ मज अलभ्याचा लाभ जाला देवा रे देवा रे । तुझें भजन पूवं ठेवा रे ॥ध्रु०॥
काळकूटसंतप्त जाला रे । रामनामें शिव तो निवाला रे ॥१॥
शतकोटिमधें सार दोनी अक्षर रे । सार शोधून घेतलीं हरें ॥२॥
दोषदहननाम रामाचें रे । दास ह्मणे नाम योगीविश्रामाचें ॥३॥
॥वोवी॥ जयजया जी रामा राघवा । जय दीनबंधु करूणार्णवा । तोडूनि टाकिसी संसारगोवा । देशी विसावा भाविका ॥१॥
तव भजनाच लाभतां सौख्य । भवभ्रांति ते न दावी मुख । कहीं च न लागे भेदत्वकळंक । तुं चि होठाके वृत्ति मुरे ॥२॥
घर रिघोन मुक्ति ते लागे पाठीं । सदा विराजे तो स्वानंदपटीं । संदेहसंशया करुनि कुटी । तुज चि भेटी घे सर्व ॥३॥
अलभ्य लाभ हें तुमच भजन । जें तारक अनादिठेवानिधान । देवदेवा रे कृपा करुन । मज अनाथा अभर केला कीं ॥४॥
॥अभंग॥ काय पुण्य होत कांही च मी नेणें । भजनें चि धन्य केला जगीं ॥१॥
अलभ्य लाभ हा दुर्लभ त्रिलोकीं । जेणें जाले सुखी भक्तजन ॥२॥
हरे श्रमताप कष्टावें नलगे । भजनें सभाग्ये होती बहु ॥३॥
आत्मारामप्रभु वोवाळुनि जाव । नुरे मायामाव काय करुं ॥४॥
॥वोवी॥ अहो श्रोतेना हा लाभ होऊं । येरवीं साधनीं सीणतां बहु । न लभे न सकती आप्त ही देऊं । हें जाणेल तो चि गुणज्ञु ॥५॥
मायबाप ते करूणावंत । लालिती पाळिती शरीरात । गुणसंपन्नता लाभ जो अघटित । दाता तो येक देव चि ॥६॥
ऐकोन यापरी सुशांतवाणी । न मनी शाहणा तो पडला आडराणीं । बरळूं च लागला संसारस्वप्नीं । मायबाप चि गतीदाते ॥७॥
दृष्टांता आणि तो बहु श्रुति स्मृती । येकदोकाला योजितो संमती । रहस्य त्यांतिल न बिंबे चित्तीं । स्वयें अभक्तु इतरा पेचितसे ॥८॥
वक्ता उत्तर दे ऐस नव्हे । संसार असे कीं हा मायामय । जननीजनका वाण काय । तनुसौख्यविलासा झोंबती ॥९॥
मदनमस्तीचा हव्यासगून । होऊं प्रपंचीं दंभमानपोषण । पूर्वपक्षीं श्रुती च लाऊनि प्रमाण । स्वयें भ्रमोन बुडविती ॥१०॥
मायबाप नसतां जन्मती कीटक । कोणसमंधी खग पशु अनेक । तेवी नरदेहीं मूर्ख संसारिक । नेणती कर्म कीं जन्मांतर ॥११॥
अन्नाद्भवंति भूतानि वाक्य । कर्ता सर्व ही जगन्नायक । आपुल्या कर्मानें प्राप्तव्य आसक । निमित्यमात्रक ते मायबाप ॥१२॥
राहोन थोराश्रयीं अवसरनिमित्य । जातां ही ह्मणे होते पोटांत । उपकार मानितु तेवि पितरात । सेवा करुनी तोषविजे ॥१३॥
॥अभंग॥ संसार ह्मणीजे व्यापार माईक । कर्तृत्व आसक भ्रम भ्रांती ॥१॥
संसार संसरती ते सवें चि स्वार । वासनाविस्तार अविद्यता ॥२॥
इच्छाबेडी भवतम मूर्ख सौख्य । त्यांत स्वर्ग नर्क भीडभीण ॥३॥
मायबाप गोवा धर्म लालुचीचा । आधार विखाचा संदेहता ॥४॥
ईषणा भूषण मायच स्छापन । मिथ्या च साजण शोककारी ॥५॥
संसार हा मृषा जाणेल तो ज्ञानी । आत्मारामधणी भाळे तया ॥६॥
॥वोवी॥ ह्मणाल श्रुति शास्त्रा आसे मात । मायबाप तें दैवत सत्य । आराधिलेचा आणाल दृष्टांत । तरि त्याग ही केले की बहुतानी ॥१४॥
मुख्य संसारापासोन सोडवी । देउनी विरक्ती जो संदेह नुरवी । देउनी विरक्ती जो संदेह नुरवी । बळें चि वासनापासोन काढवी । हो कां कोणी गुरु चि ते ॥१५॥
सेख फरीद मौलाची आई । पुत्रास तारिलें करुन निस्पृही । गोपिचंदमाते चि धन्य नवाई । कां गुरु ह्मणो नये तशाला ॥१६॥
बोधोन विरक्ती बापें ही तारिले । कांतेचिनि कोणी पावन जाले । पुत्रीं बापाला उपदेश केले । एवं धन्य ते गतिदाते ॥१७॥
बोलणें आहे कीं हें प्रत्ययाचें । गतिदाय देणें सत्य देवाचें । वाक्य यदर्थी समर्थस्वामीचें । ऐकोन करा हो साह्य देवा ॥१८॥
॥पद॥ (धाट सामर्थ्यगाभा भीमभयानक०) ॥जनक जननी माया । करिती नाना उपाया । पाळिती सकळ काया । कृपाळुपणें स्वभावें ॥ध्रु०॥
सांगांवें नलगे कांही । मागावे नलगे कांहीं । बाळकाची चिंता नाहीं । रुदन बाळातें जाणें ॥१॥
श्रृंगार करिती लोभें । ह्मणति मारति क्षोभें । आवडिच्या लोभें लोभें जननीजनक सर्वै ॥२॥
जननीजनक जन । वाढताहे तनमन । दास ह्मणे गुणसंपन्न । देवाधिदेवाचें देणें ॥३॥
॥वोवी॥ हा तो कळला कीं अभिप्राव । आतां येकदेशी ते जीवशीव । त्याचेनि ही अलभ्यलाभ गौरव । न करवे उमजा अभंगीं ॥१९॥
॥अभंग॥ जीव येकदेशी शीव येकदेशी । त्याचेनि सायासीं कांहीं नव्हे ॥१॥
हीत करवेना आपुलें आपणा । त्यासी कर्तेपण घडे केवी ॥२॥एकू०च०८॥
॥वोवी॥ हा ही कळला कीं अनुभवशब्दु । सद्गुरुकृपेचा सारांशबोधु । आणीक ऐका हो कळेल विषदु । अलभ्य लाभाचा योग तो ॥२०॥
॥अभंग॥ अलभ्याचा लाभ अकस्मात जाला । देव हा वोळला ॥च०६॥
॥वोवी॥ ऐसीयापरीनें प्रत्ययवचनें । समाधान केलें बहुता सज्जन । शोधीतां बहुठाईं पाहतां विवरोन । सारांशसाधन भजनेंची ॥२१॥
॥अभंग॥ श्रीरामभजन भक्तिचे मंडण । लाभ हा चि पूर्ण अलभ्याचा ॥१॥
भवदु:खहर शतकोटिसार । निवाला शंकर तारी जना ॥२॥
दोषाचें दहन योग्याचें जीवन । पतीतपावन सुविद्या हे ॥३॥
नामसार भजनीं पाविजे विश्राम । देव आत्माराम वश्य होय ॥४॥
॥वोवी॥ भजनामृताचा घेत सुस्वादु । भावीकजनाला करीत बोधु । निरसूनि येणें भवभ्रांतिबाधु । रामदास राहिले गडावरी ॥२२॥
राहिले वाटती सज्जनगडीं । उदास होती घडीनें घडी । येकांतसेवेची धरुन आवडी । गिरींकाननी विहरती ॥२३॥
तेचगडाभोवतीं पाहत जात राहती । नदीतटाकीं तरुतळीं वसती । गडामाजीं ही विसावा घेती । लीळा दाविती विचित्र ॥२४॥
यापरी कर्मिलें बहुत दिवस । सेवटीं स्छिरोन गुंफेंत निवास । कोठें न जातां राहोन नवमास । मग गुप्तरुप होठेले ॥२५॥
सांगणें पुढारी घडेल हे कथा । गिरिवरी राहिले प्रस्तुत दाता । उपदेश करितां हो अधिकार न पाहतां । तेणें पावन बहुत जाले ॥२६॥
संतसहवासीं सौख्यता पूर्ण । काय बापुडें तें स्वर्गीच सांगणें । आदौ जावया कष्टिजे दारुण । पुन्हा अपटणें दुखावरी ॥२७॥
संतकृपेचा महिमा अगाध । वस्तुचि व्हावें जीव स्वतसित्ध । स्वर्गी पुण्याच होतसे छेद । पुन्हां प्रयत्न करवेना ॥२८॥
न सांगवें चि तेथिल बिबिछ । यास्तव संतांनीं तें केलें तुछ । कोल्हाशाहण्याच धरुनि पुछ । कोण भवनदी तरले हो ॥२९॥
दुष्ट लुटारे नार्या नाडिती । दु:ख भरेल हें भय नसे चित्तीं । ते ज्यारिणी तरी तेथें नुपजे प्रीती । विलासविधान कायसा ॥३०॥
किं नटांतील नरनारी देहसमंधु । प्रीति हावभावो दाविता खेदु । संतानवृत्धीचा नसे आनंदु । तेवि स्वर्गादि सुखदु:ख ॥३१॥
ऐकोन नृपकन्या सुंदरी सुमती । हरोन बळानें आणिल्या नृपती । पट्टराणी होऊन भोगी संपती । तेवि वैराग्य परमार्थ ॥३२॥
परमार्थ केला प्रपंचहव्यासीं । जेवि पट लाविल रांड स्त्रीयेसी । चांग चि दिसे परी पूजनासी । संततीसह योग्य न होती ॥३३॥
विकारामाजील विकारराहटी । आतां असो ह्या विकारगोष्टी । धन्य दासस्वामी कृपादृष्टी । करुन बहुतासी तारिलें ॥३४॥
सिष्यीण येक नव्यानें जाली बाई । अभिधान अम्माई दुज मनाई । संकल्प संचरला तियेचा जिवीं । भोजन स्वामीच अवलोकिजे ॥३५॥
संत सद्भक्त गेलियावरी । येकांती वसों लागले भवारी । कारण भोजना येतो वनारी । प्रीत जडलीसे पंइतीची ॥३६॥
वेणुबाईला आसे सूचना । पक्वान्नाजिनसु करुनि नाना । वाढोन वोपितां सद्गुरुराणा । घेऊनि कपाट लाविती ॥३७॥
भोजना बैसती पवननंदन । ससांग जालियावरी भोजन । प्रसादस्वीकारु करिती सज्जन । मग बोलत निजगुज सुखावती ॥३८॥
विदित आसे हें बहुतां हृदईं । कर्णोपकर्णी ऐकती सर्वही । भीमरुप पाहुं तेणें मनाई । येकांत ठाई पातली ॥३९॥
छिद्रद्वारांत घालितां मुख । दृष्टीस पडला कपिनायक । जेवविती अंत:करण । मूर्छित हो पडली तेणें उभ्यानें । समाधिसौख्य अनुभवित ॥४१॥
अंतर्धान पावला तिकडे मारुती । वळखोन करणी हे श्रीगुरुमूर्ति । सौख्य दृढ बैसो तियेचे चित्तीएं । ताडुनि पदानें पळाले ॥४२॥
ताडी लोखंडा परिसगोट । रोगिया हाणिलें संजीवनीकाष्टें । योगज्जोतीच लागल चपेट । लाभकर जालें पदताडण ॥४३॥
येकांत काननी राहिले समर्थ । त्यावरी लोटले दिवस सात । चिंता लागोनी सकळीकांत । कल्याणस्वामीतेप्रार्थिले ॥४४॥
॥अभंग॥ दाता दयानिधी होई सानकूळ । सद्गुरुदयाळ दावा दृष्टी ॥१॥
कीजे झडकरी मनोरथ पूर्ण करवी सुधापान दर्शनाचें ॥२॥
कल्याण हें नाम कल्याणकारक । घेतां व्हावें सौख्य बरें सत्य ॥३॥
तेणें आत्माराम होईल प्रसन्न । होउनी पावन क्रीडुं जगीं ॥४॥
॥वोवी॥ होउनि साहकारी आह्माकारण । हृद्गतीं ठेववी गुरुपदनिधान । प्रार्थितां यापरी होउनि प्रसन्न । सद्गुरुपासी पातला ॥४५॥
क्रूरव्याघ्रालानाभी च बाळ । बाळापराधा न क्षोभे नृपाळ । पूर्णशरण्या श्रीगुरुदयाळ । उग्र दावितां ही दया वसे ॥४६॥
नमोन कळवितां जाली अवस्छा । कां लबाडी केली रे ह्मणे दाता । तेणें कल्याणा लागता चिंता । भाळोन पातले गडावरी ॥४७॥
देतां कृपेनें पुन्हा पदप्रहर । जिरली वृत्ती ते तोषली फार । वंदोन सद्भावें जोडुनि कर । भजन करित सन्मुखी ठाकली ॥४८॥
लोखंडा ताडिल परिसगोटें । रोग्यासि हाटिल संज्जीवनीकाष्ट । कामधेनुस्तन दुग्धचपेट । जेवि क्षुधिस्छा लागली ॥४९॥
॥पद॥ धन्य श्रीगुरुचे ते पाये । दावी निजरुपसोय ॥ध्रु०॥ त्वंपद तत्पद असिपद । नुरवी कांहीं भेद ॥१॥
सौख्य सांगाया तन्मय । वाचा खुंटित होय ॥२॥
पाई जडतां ची सप्रेम । भाळे आत्माराम ॥३॥
॥वोवी॥ लागतां तनुला सद्गुरुपद । प्रपंचपरमार्थी जाली सावध । सकळिका वाटला थोर आनंद । वाढली वानिती सत्किर्ती ॥५०॥
आज्ञाउलंघणीं हें जालें सफळ । जडला हृत्कमळीं अंजनीबाळ । नेमधाम नुलंघुं पुढें दयाळ । सर्वा ही कथिले बुद्धिवाद ॥५१॥
वेणुबाईचें हें ह्मणती चरित्र । नव्हे हो जाणती ते परमपवित्र । किमपी गुरुवाक्या न करी अंतर । आसो पुढारी ऐका कथा ॥५२॥
रामनवमीचा आला उत्साव । तेणें येउनि भक्तसमुदाव । माहाराजास प्रार्थिती भावें । आगमन व्हावें जी क्षेत्रासी ॥५३॥
परि केवळ दासाचा उदास मन । करा जा ह्मणतिलें पत्धतीप्रमाण । आधीं च विदित त्या पुन्हां विधान । कळऊन ससांग धाडिलें ॥५४॥
दीपावळीचा भोगाया सण । सासुरवाडीस जातां पुत्र गुणवान । बुत्धिवाद सांगे पिता हरषोन । कीं प्रधानीस राजा युक्ति सांगें ॥५५॥
सासुरेस जातां मानस्छ दुहिता । येश योग सांगे स्वयें सुमाता । भक्तसमुदायाप्रती गुरुदाता । उपासनाविधी कथियलें ॥५६॥
साहित्य जालेंसें सर्व ही भारी । समूह पातला बहु मानकरी । दाटली जनयात्रा महाद्वारीं । झडकरी मार्ग फुटे ॥५७॥
प्रतिपदापासून आरंभ जाला । दिवसंदिवसी अधिक चि सोहळा । परंतु न शोभे श्रीराम सावळा । आठवोना दासाला चिंता करी ॥५८॥
सर्व ही वागती सावधानपणें । होतसे घमंडी भजनकीर्तन । कांहीं कशांत न पाडिती नुन्य । त्रास आळसाला दमदमों ॥५९॥
॥अभंग॥ नाहीं आळस निद्रा चिंता ममता शोक । धन्य ते साधक गुरुपुत्र ॥१॥
पडतां श्रमाधिक संतोष मानिती । बहुतां सेवें शब्दें ॥२॥
जे गुण उत्तम अभ्यासीति सदा । अधर्मासि कदां नातळती ॥३॥
गुरुबांधवासी देव चि भाविती । द्वेष अणु चित्तीं वसेचिना ॥४॥
हाचि भाव परब्रह्म तेणें आत्माराम जाला सखा ॥५॥
॥वोवी॥ परि मनांत सर्वाच्या हे ध्यासचिंता । समयासि पावावे समर्थदाता । प्रीत हे चि जडलीसे साधुसंता । भाविती मानसीं यापरी ॥६०॥
न शोभे नस्ता नृप सिंहासनीं । यजमान न वागतां जैसा यइनी । देऊळ नुघडता यात्रा उद्विइनीं । प्रजन्याविण पीक जैस ॥६१॥
घृतविण नैवेद्य वैश्वदेव । मांगल्यतंतुविण लग्नवैभव । कष्ट करि बहु परि नसे भाव । न भाळतां गुरुराव सर्व वृथा ॥६२॥
जणोन अवस्छा हे दास सर्वज्ञ । देऊळांत प्रगटले दयाघन । यात्रेंत फाकल वर्तमान । न समाय उल्हासु आनंदले ॥६३॥
चहुंकडोन धावले घेउं दर्शन । तवं नमोन श्रीरामा बंदकमीन । सभेमाजिं बैसले येऊन । जैसा माहादेव इंद्रभुवनीं ॥६४॥
भाविकी घालिती लोटांगण । कोणी सद्भावें करिती स्तवन । पुष्पहार घालिती परिमळ चर्चुन । फळें मिठाया ठेविती पुढें ॥६५॥
नवमीच्या दिवसीं प्रातसमई । प्रगटोन धीर दिल्हे निस्पृही । देवा पूजादि विधान सर्व ही । संपादून केले आरती ॥६६॥
श्रोते वक्ते समुदाव मिळाले । मानकरी ते उभे ठाकले । रामजन्मकथन प्रारंभ केलें । देउळांत आसती समर्थ ॥६७॥
दशरथरायाचे लग्नापासुनि । पिंडप्राशनादि कथा पावनी । आष्टमीपावतों ससांग वर्णुनि । नौमीस कथिलें जन्मकथा ॥६८॥
संकळीत सर्व ही सारांशकथन । श्रोतेहो सद्भावें करा श्रवण । कृपा करील सद्गुरु सज्जन । श्रीरघुनंदन तुष्टेल ॥६९॥
रामजन्म मागें कथिलें आसे । आतां ही अवलोका तें चि रहस्य । प्रेमें निरवा हो आपुलें मानस । श्रीरामदासचरित्रीं ॥७०॥
ऐश्यापरीन जालें हें कथन । वाद्यगजर होतसे चहुंकडोन । गुलाल बुका धुशर उडवोन । जयजयकारें गर्जीनले ॥७१॥
प्रेमभरें नाचती साधुसंत । नुन्य न पडे चि विधानांत । देव स्वर्गीचे पाहती तटस्छ । खिरापती वाटिलें ॥७२॥
वाद्यगजराचें शोभावर्णन । देवा स्तुति केलें लाडके वचनें । मागें दासानीं वदलेति श्रवण । ते करा हो कळो प्रेमविधी ॥७३॥
॥श्लोक॥ रामा तां जग मोहिलें निजगुणीं माया तुझी मोहनी । आह्मी तूज तूझेनि नामस्मरणें वस्य केले जपोनि । जो तुं देवास वंद्य वैकुंठभुवनीं भोगाष्टक्रा टाकुनी । दासाचेनिसमागमें चि फिरसी सगौरवावाचुनी ॥१॥
सबजोतनमे जगजोति बिराजे । तो संगीततालपखावज बाजे । चित चेत समेत भये सब राजे । तो देधड देधड दुदुंभी गाजे ॥१॥
य़ंत्रेंतालमृदांग श्रृतिमिळणी मिळोनिया जातसे । दासाचा समुदाव भाव गजरें रंगीं उभा गातसे । माळाहार आपार दिव्य सुमनें गुंफुनिया आदरें । गंध कुंकुम केशरें सुखकरें दिव्यांबरें दुशरें ॥१॥
तारमंद्रघोरथोर औघडु कळेचिना । तानमानमुर्छना प्रसंग तो दडेचिना । काळताळवेळसंधि आकळेचिना । निर्मळीं ध्वनि अनेक वाजती कळेचिना ॥१॥
वाद्य तडक तुफान तडक कडक भडक धडक धडाडी । कितियेक लंग तजुनि अलंघ धरुनि मलंग भडंग भडाडी ॥१॥
॥वोवी॥ सिंहासन शोभा सेजारती । धावा मागणें थोरीवस्तुती । गाइलेति प्रेमादरें दासमूर्ति । ते गाती ऐकती सुकृतीनरें ॥७४॥
॥पद॥ (जाल सार्थक०॥) बाळा मुग्धा योव्वना प्रहुडा सुंदरी । आरती घेउनी करीं आल्या त्या नारी ॥१॥
नवत्या इच्छिती देवा शामसुंदरा ॥२॥
दास ह्मणे सुमनसेज चला मंदिरीं । क्षण येक विश्रांति घ्यावे मंदिरीं ॥३॥
॥वोवी॥ सुकाळ जालासे भजन कीर्तन । ससांग होतसे अन्नसंतर्पण । दशमीस जालें येक विंदाण । ते संकेतवचनें अवधारा ॥७५॥
उत्साव विलोकुं दंपत्ययुक्त । विप्र येक आला दुखणाइत । लोटून द्वय घटिका गेली रात । पडली कुडी ते प्राणेविण ॥७६॥
आसे ते स्छानीं विप्रसमुदाव । सत्व पाहायाचा धरिला भाव । सतिप्रति सांगुनि कपट उपाव । सांग जा ह्मणतिलें या रितीं ॥७७॥
तेणें भार्या ते न करितां ग्लांती । झाकुनि कुणपात ठेऊनि येकांती । येऊनि बोलिली पारपत्याप्रती । उपवासी राहिला ग्रहस्छ कीं ॥७८॥
रुसोन निजेला आसे ब्राह्मण कवणाचें ही न मनी बोलणें । बोलाउं धाडितील जरि सज्जन । आज्ञा उलंघण न करील ॥७९॥
येरु तथास्तु वदोन तियेतें । माहराजाला कळविता वृतांत । न विचारितां कारण कोणत । भाविलें आहहा अधर्म ॥८०॥
प्रसाद देवाचा आहे मठांत । जेववा त्वरेन बाहुनि त्यांत । हें समर्थस्वामीच आज्ञासहित । पातले सिष्यांनीं जवळी त्या ॥८१॥
दुरोन ह्मणती हे ब्राह्मण देवता । भोजनासि बाहिलें समर्थदाता । अनुमान कांहीं न धरितां आतां । उसीर न लावितां चलावें ॥८२॥
दासाभिमानी श्रीरघुनंदन । देवाधिदेवाचें अघटित करणें । खडबडोनिया उठिला ब्राह्मण । कराया भोजन चालिला ॥८३॥
दुखण ना बाहण चालिला निर्भय । भार्यासह कृत्रिमा वाटलें आश्चिर्य । वर्तमान कळवितां श्रीगुरुराय । ह्मणतिलें कर्त्ता श्रीराम ॥८४॥
मानुनिया बहुत नवलाव । ऐक्यपद आत्मादेवभक्ति थोरिव । वदतां सर्वत्रा उमजला भाव । जाला घटाव आनंद ॥८५॥
भक्तितपाचें धन्य हें फळ । करितसे जेथें देव सानकूळ । नाम दासाचें घेतां प्रेमळ । संकटें तयाचीं परिहारितु ॥८६॥
तो अमानी भट्टाची मुरडली वृत्ती । करुणा भाकुनि सद्गुरुप्रती । जाले उपदेशी दोघे सतिपती । राहिले संसारीं भक्ति करित ॥८७॥
यात्रेकर कोणी चुकतां वाट । लावितो देवांनीं पंथासि नीट । सांभाळ कराया न मनी च वीट । आहे प्रचिती बहुतासी ॥८८॥
येकदां चाफळीं असतां समर्थ । विचित्र वर्तलें उत्सवांत । कोणीयेक परदेशी ग्रहस्छांत । भविष्य वदणारा भेटला ॥८९॥
मोहक फंदी तो असे ऐसा । न टळे वाक्य तो वदता सहसा । देवासन्निधीं उत्साव जैसा । झोंबती लोक त्यापरी ॥९०॥
कोणी सांगती वाढला अंश । काम फते जालें लागलों रोजिस । उत्तर केलेति जैसजैस । फळत्कार जाला तैसे चि ॥९१॥
॥अभंग॥ जळो कामीकाचे तोंडीं पडो बंडा । थोतांडपाषांडा मान देती ॥१॥
स्वहितीं न स्फुरे दृष्टी सार्थक न स्फुरे । होती हो बावरे करामती ॥२॥
काय हें नेणती निर्लज्ज लालची । संगती नीचाची सेवा किंवा ॥३॥
सेखीं स्वात्मानंद ना संसारफळ । दवडिती काळ भुलोनिया ॥४॥
॥वोवी॥ देखोन वदे तो परदेशियाला तुला गा मृत्यु समीप आला । मरसी अवचट चैत्रनवमीला । हें ऐकोन दचकला विप्र तो ॥९२॥
जाणोन न सुटे गती होणार । परि भावितु समर्थापासीं शरीर । पडावें दिवस ही असे सुंदर । पावला सत्वर क्षेत्रासि ॥९३॥
यात्रेंत वागतु भय नसे मनीं । विघ्नभग्नकर्ता दासाभिमानी । हरि अंतरात्मा भीमरायानीं । रक्षोन काळांत चुकविला ॥९४॥
परदेशियाचा चुकला मृत्य । मुकुंदसित्धांतीं जेवि कासीत । भविष्य सांगतां यति सिष्यांत । न दिल्हें मरुं गुरुंनीं ॥९५॥
असो हें आसती बहुत चरित । उत्साव करुनि तो निर्भय चित्त । भविष्य सांगत्या सुखें वृतांत । निवेदितां नवल मानिला ॥९६॥
ह्मणे ममजन्मु धिग मी बत्ध । आराधितों कीं देवतें क्षुद्र । वल्लि मंत्रशकुनावरुनी समुद । कार्यसंपादणें वृथा कीं ॥९७॥
पश्चात्ताप तो मानोन मानसीं । येउनि वेगीं सहित परदेशी । नमनस्तवन करुणा अतिशयेसी । करोन गुरुकृपा संपादिला ॥९८॥
मग दृष्टीस नाणी भवभयाला । जेवि स्वाधीन आस्तां गुरुबोधकिल्ला । नाभी च संशये शून्य बेदडयाला । मा चोरफौज वाद्या काय गणी ॥९९॥
अंत:करणीं ठसतां सुबोध । माईकपणाचा टाकूनि छंद । परमार्थव्यवहारीं होऊनि सावध । केला जन्माच सार्थक तो ॥१००॥
॥अभंग॥ धन्य ऐसा व्हावा भाव । न बाहतां धावे देव ॥१॥
जयापरी कृपादृष्टी । देव घालावे घरटीं ॥२॥
न सांगतां काम कीजे । अपेक्षित पुरवीजे ॥३॥
होइय साचा साभिमानी । कीर्ति तयाची वाखाणी ॥४॥
नाचे नावरतां प्रेम । तो मी न ह्मणे आत्माराम ॥५॥
॥वोवी॥ हें असो रात्रीं मांडिलें कीर्तन । सैंवरादि सिंहासनारुढ वर्णन । वर्णिलें वर्णितां असाधारण । होईल संज्ञेनें विलोका ॥१॥
॥श्लोक॥ आला राजा महीचा दिनकरकुळिचा ख्यात वौंशावळीचा । आला आत्मा जगाचा मुनिजन ऋषिचा प्राण त्या साधकाचा । आला दाता दिनाचा जप पशुपतिचा ध्यास त्या वाल्मिकाचा । आला सिंधु सुखाचा सुरवर ह्मणती काळ हा राक्षसाचा ॥१॥
जो शोभे शरयुतिरीं तदुपरी वेष्टीत ऋषेश्वरी । जो शोभे नृपसर्वैरीं तदुपरी ऊदास गोदातिरीं । जो शोभे रिसनावरीं वनचरीं वेष्टित सिंधूतिरी । जो शोभे रणकेशरी रिपुवरीं वेष्टीत लंकापुरी ॥२॥
जो शोभे बहुसाल राज्य करितां राक्षेस वीभांडितां । जो शोभे दशमूख शत्रु बाधितां विभीषणा स्थापितां । जो शोभे सुर सोडितां सकळिका देवास आळंगितां । जो शोभे सुरपुष्पकीं अरुढतां पुष्पें बहु वर्षतां ॥३॥
जो शोभे परि पावतां चि भरता अत्यादरें भेटतां । जो शोभे रिसवानरा निरवितां सर्वास संमोखितां । जो शोभे रघुनाथ राज्य करितां लोभे प्रजा पाळितां । जो शोभे निजदासनाम स्मरतां भक्तासि सांभाळितां ॥४॥
ज्याचें नाम विषा विराम सिव तो प्रीतीन कंठीं धरी । ज्याचें नाम सुखैकधाम विलसे वाल्मीक अभ्यांतरीं । ज्याचें नाम समस्तकाम पुरवी विख्यात लोकोत्तरीं । ज्याचे नाम समस्त जीवउत्धरी नामें चि कासीपुरी ॥५॥
॥वोवी॥ मग सहसंपादनीं केलें लळित । कतबा वाचोन कथिलें अर्थ । श्वानसंवाद सप्रेमयुक्त । बोलतां सर्व ही आनंदले ॥२॥
॥कतबा ल्याहवें ॥श्वानसंवाद॥ ये रे कुत्तु ये । भाकर आपुली ने । विटाळ करु नको आह्माला । विटाळ तुझ्या बोच्यात सिरला । दे रे धण्या दे । अवरुन आपुल घे । आतां हे कुतर मातलें । देह मी ह्मणतां गुंतलें । उपासी मारितो पाहा बरें । अमृताच आंग सार । फार गडया मोटी केली । जिव्हा तुझी थोटी जाली । जिव्हेवरी आहे ह्मणती वोघ । त्यानें चि भरती परी योग । तुला हें ज्ञान जालें कोठें संत गुरुचें देणें मोटं । तुला गुरु आहे काय रे । सर्वाघटीं तो चि कीं रे । आह्मि तरि कुतर ह्मणतों तुला । अविद्येनें दतुरा दिल्हा । ब्राह्मणास तुं अविद्या ह्मणसी । देह ब्राह्मण कैसा होसी । श्रेष्ठ जन्म वेद बोले । यवढें भले तर का मेले । ब्रह्मादिक मरोन जाती । हरीभक्त अमर होती । अमर तो जाला नाहीं कोणी । व्यासादिक नारदमुनी । जाले ऐसे कळे कैसें । आपण व्हावें तगे तैसे । तर कां आतां जाईनास । जातो राहतो पाहीनास । आता विचार कैसा करावा । श्रीरामराम ह्मणत जावा । निजबोधाचे कुत्तर दास । उत्तम आधम येक चि ग्रास ॥१॥
॥वोवी॥ दासासि बुची पुसों आली । जैसी आली तैसी च गेली । हे बुच्ची आशंका कथा कल्लोळी । गदगदां हासत बुचकळले ॥३॥
(बुच्चीकथा) कोठें ग बाई तुझा दारवंटा । बग कीं गे नव्या भोकावाटा ॥ दिसनास की गे बाई मला । कां गे गडद पडली तुला । इकडे कधीं आले नाहीं । तरि कां गे पुसतीस बाई ॥ कळलें तरी सांगावेना । दिवसराती जागावें ना । बाई मला झोंप येती । तर तुला बाई ते च खाती । घेऊन जाय जसीतसी । येवढी मोटी कसी मासी । तुझी वाट दाव कीं ग । लाहण होउन लव कीं ग । ते तर मला होतां नये । तर तुला येतां नये । कैशा आहेत तुझ्या वाटा । मोड कीं ग देह ताठा । अगड बगड तुझी बोली । समुद्राहून ऊंच खोली । मला वाटतें कठीण बहु । विचारितां दगड मउं । सांगनास तरी बला गेली । तुं च कष्टी होसिल मुली । दासाबुच्ची पुसुं आली । जसी आली तसी गेली ॥१॥
आगे बाई ॥ पाप थोर कीं पुण्य थोर । दोन्ही बाई बरोचबर । पाप ह्मणजे स्वर्ग पुण्य त्यावरी दिसे । फिरुन त्याच्याच उरावरी बसे । आगे बाई । पापपुण्य़ दोन्ही झगडती । त्या दोहीसवी योगीं च रगडती । योग्याचा जीव तरी कसला ग असतो । आग बाई । त्याला मुळीं च जीव नसतो । खातें पितें हागतें मुततें । काय गे सांगती । मृगजळाचेंपाणी देखूनि मृग चि हागती । तेभी मानुस आह्मीभीमानुस । आह्मास भाव तसला असावा ना । आगे रांडे गुरुस जाऊन पुसावा ना । आग बाई । गुरु तरी कोणता करावा । भाव बळकट तरी दगड वरावा । तर तीथ काय आढळल याच बोलाच नांव पडळल । आसे बाई कोण करीत आस जे ह्मणत त्याच्या च बोच्यांत सिरत । उर्हाटवाणी बोलसी आंग माझें कांपत । फणसावरे कांटे माशाची गोंगाण आंत पाव्हे तर चोखट दर्पत । तुझा ठाव ठिकाणा गाउं ग । खालत डोक वरत पाय उदकांत आह्मी राहुं ग । चाल गा आस बोलुं नको तुला हसतील लोक । सार्या लोकाच उत्पन्नमूळ बगानास कां ग ते भोक । शास्त्रीं नाही पुराणीं नाही काय गे सांगती कथा । शास्त्रांवाचुन अधिक बोलुं तर कोटपाप माथा । आमच शास्त्र आस नाहीं तर तुझें कोणतें कळलें । तें तूं ह्मण कीं । हरि: ॐ ॥कोठ ग बाई उमटल । तरि हें लै दिसा सांगतो ब्रह्माजोसी । प्रत्यक्ष इथ बोलसी आतां कां ग तिकडे कोलसी । आसो बाई आह्मास आसे कंटाळा । अशथ्रा यजमाना हा धांढ मन्या हो खटयाळा । बोलीभाषा दासा गोड । सद्गुरुमाय करी कोड ॥१॥
॥वोवी॥ दंड चूर्णिकाधाटीवरुन । वाखाणिलें श्रीराम स्तवन । संपादिलें रुसणे भिक्षा मागणें । धूशर उडवणें जयकार ॥४॥
सगजरें वोदूनि परतला रथ । सुखावले गेले राहिले भक्त । अंतर्धान पावले तेथें समर्थ । प्रार्थुनि देवातें ऐका कसे ॥५॥
॥पद॥ राग कारवा॥ शरीराचा पांग आतां नको रे रामा । देहबुत्धीबेडी तोडी नेई निजधामा ॥१॥
रामा ये रामराया रे ॥धृ०॥
इछेचें बंधन माझें तोडुनि टाकावें । मन हें प्रपंची रामा गुंतों चि नेदावें ॥२॥
प्रपंचाचा रंग माझा वोरंगोनि गेला । मानसीं सखया तुझा वेधु लागला ॥३॥
सवें तां लाविली आतां सांडी कां रे केली । वृत्ती हे निघेना तुझे स्वरुपी गुंतली ॥४॥
तुझिया वियोगें जिणें नलगे आह्मासी । लागलीसे तुझी सवें रामीरामदासीं ॥५॥
(कधी बा रिकामा०) माझे मागणें तें किती । रमावल्लभा रघुपती ॥धृ०॥ लक्ष्मी मागूं रे ते तो माये । तिचा महिमा सांगूं काये ॥१॥
नलगे वैकुंठकैलास । नाहीं त्रिभुवनाची आस ॥२॥
रामदास ह्मणे द्यावें । जन्म मरणासी न यावें ॥३॥
॥वोवी॥ रामघळीं प्रगटले मोक्षदानी । संरक्षूं पातला श्रीचापपाणी । कल्याणबावा सत्सिष्य सद्गुणी । क्षेत्रांत राहिला स्वल्पवेळ ॥६॥
लक्षीं लक्षोन सद्गुरुपाय । उपासनेचें जें सांगिजे कार्य । सांगतां वर्तणें तेवि होत आहे । गुरुप्रतिमा बोलणें गुरु आज्ञा ॥७॥
धन्य गुरुकृपा निष्काम काम । गुरुबंधुत्वीं न पाहती विशम । किती पडो कां न मानितीश्रम । ह्मणोन श्रीराम वश्य तया ॥८॥
उपासना चालती सहजीं सहज । अंतर्धान पावले जंव माहराज । अल्पबुत्धिनें गजबजिती द्विज । ह्मणती हें स्छळ उग्र मोटें ॥९॥
मठ केल्यावरी इये ठाई । उदास अति जडला समर्थहृदई । लोक ते सन्निधीं यावया पाहीं । थरथराट कांपती ॥११०॥
कारण हे आहे मसणवटी । आणि उग्रदेवता केले कुटाकुटी । विधिप्रायश्चितीं नसे चि दृष्टी । केलें हो कष्टी बहुतासी ॥११॥
स्मशानावरी केलिया स्छान । विघ्न भय वाटे स्वभावें दारुण । चित्त व्यग्र होय पडती सुस्वप्न । तें टाळिलें देवांनीं सर्वाचें ॥१२॥
निग्रह दासाचा जाणोन भारी । वोझें तयाचें पडलें त्यावरी । बोलणें ऐकोन नानापरी । कल्याण माहराज सरसावले ॥१३॥
नम्रभावनेनें जोडुनि हस्तक । बोलिले जैसे ब्रहस्पतीवाक्य । विश्वासला आसे जेथें त्रिंबक । सौख्य अनुपम्य असतां कीं ॥१४॥
विशेष विरक्ती दाऊं जनांत । दास होठेला तो चि विश्वनाथ । कां न करिती सांगा स्वभावकृत्य । हरीहरधाम येथें येक केलें ॥१५॥
जे स्मरतील सद्भावें या पुण्यस्छाना । न होये चि तयाला नरकादि यातना । श्रीहरमित्र जो श्रीरामराणा । महारुद्रासहित जे स्छानीं ॥१६॥
तें स्छान प्रपंचिका न वाटे नीट । जेवि ज्वरिताला घृत दुग्ध वाईट । द्विज पूर्णिमेचा तस्करा वीट । व्यकंटगिरी अविंध्धा न मने परी ॥१७॥
मागे भल्यानीं तुह्मासारिखे । समर्थापासीं बोलतां वाक्य । तोषून कळाया तेथें काळांतक । त्रिपुरारी नांदतो ह्मणतिलें ॥१८॥
अभंग येक लिहविलें नूतन । ममहातीं तयातें करविलें श्रवण । तो चि तुह्मि ही सांग परिसोन । समाधान पावले नमियले ॥१९॥
॥अभंग॥ कराळे विक्राळे भुत नानापरी । तेथें क्रीडा करी महादेव॥च०१२॥
॥वोवी॥ प्रसादवाक्याचेनि प्रभाव । तयास उपजला कीं ऐसा भाव । भेटतील केव्हां सद्गरुराव । कृपा करितील केधवां ॥१२०॥
मग कल्याणकारी कल्याण वचनें । करुनि तयाचें समाधान । धाडितां निघाले करीत स्तवन । पावले स्वस्छाना सुखरुप ॥२१॥
मठामाजील करुनि बंधान । सद्गुरुपासीं पातले कल्याण । निवेदून वार्ता करुन स्तवन । सेवेंत सादर राहिला ॥२२॥
पुढील कथाअनुसंधान । रामीरामदासाचें ऐकोन स्तवन । प्रसन्न होतिल श्रीरघुनंदन । आदरें श्रवण करावें ॥२३॥
॥अभंग॥ समर्थाचे नांव माया देशांतरीं । लुटारे पेंढारी जालो बळें ॥१॥
नामाधारी चोर दर्शन दुर्लभ । लोकावरी दाब पडतसे ॥२॥
अविद्या सुविद्या ईषणा कामना । सगट अभिमाना नास करुं ॥३॥
कोठुनीया येतो कोण्यापरी राहतो । कळूं च न देतो दुजयासी ॥४॥
गुरुकृपा गढीं भजनसाहित्य । वंदुनीया तेथ जाऊं पुढें ॥५॥
साधनविहीन मोकळीक पेट । मारहाण लूट तेथें करुं ॥६॥
भय न धरीतां घेऊं देऊं प्राण । मान आपमान समानची ॥७॥
वार्ता घालूं माग यजमान येती । धैर्य आशा चित्ती ठासो नेदूं ॥८॥
लुब्धकासि नाना पीडा ते दारूण । करुनी कुधन वस्ता हरुं ॥९॥
सगट सारिखे दिसती या हेतु । पंथ सर्वातीतु चालूं काढूं ॥१०॥
स्वात्मानंदघळीं होऊनियां गुप्त । गुरुनाम स्मरत राहूं सुखें ॥११॥
॥वोवी॥ दासविश्रामधाम सुगड । पीरवलियाच राहत पाहड । स्वात्मामृताचे भरलेति आड । सद्भक्तयात्रा निववावया ॥१२४॥
इतिश्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । नामप्रशांश । देवदयाथोरीव । स्वर्गनिंदा मनाईचरित्र । रामनौमीउत्साव । उपासना बळ । मृतद्विज जीवला । स्मशानमहत्व । दास रामघळीं राहिले आध्यायेकसेहेचार ॥१०४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2019
TOP