मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८९१ ते ५९००

जनांस शिक्षा अभंग - ५८९१ ते ५९००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८९१॥
विकी कन्या गाई कथा स्नान जप । तेथें बसे पापसदा काळीं ॥१॥
भरे पोट वरी मोलाचे मजूर । वेंचती साचार भाडेकरी ॥२॥
भाडेकरी कष्ट करितां श्रमेना । शिणतां जोडेना पुण्य लेश ॥३॥
पुण्य गांठीं कांहीं न पडेचि लेश । अंतीं नर्कवास कल्पवरी ॥४॥
तुका ह्मणे त्यासी नये कांहीं हातीं । तोंडीं घेतो माती पाडोनियां ॥५॥

॥५८९२॥
रामकृष्ण नये वाणी । नर्क खाणी त्या वस्ती ॥१॥
नाम नवजे ज्या वाचा । तोचि साचा राक्षस ॥२॥
नये देवाचा विश्वास । कोण त्यास रक्षील ॥३॥
तुका ह्मणे संतसेवा । घडे जिवा विश्रांति ॥४॥

॥५८९३॥
भाव नाहीं तीर्थी ॥ केले नेम वायां जाती ॥१॥
आपुल्या आपण । काय करी प्रदक्षणा ॥२॥
नित्यानित्य गाळी । भक्ति दुषिली चांडाळीं ॥३॥
तुका ह्मणे मोठें । त्यांचें प्रारब्धही खोटें ॥४॥

॥५८९४॥
झाले घरीं कवी । नेणे प्रसादाची चवी ॥१॥
लंडा भुषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥२॥
काढावें आइतें । तेचि जोडावें स्वहितें ॥३॥
तुका ह्मणे कळे । परी होताती आंधळे ॥४॥

॥५८९५॥
घरचिया लोकां सदा खाय दांढां । बाहेरी बापुडा दीनरुप ॥१॥
शक्तिविण करी व्यर्थ बडबड । ज्याचें मुखीं भंड बाजागारी ॥२॥
कामी कामनिक काळसे कपाळीं । पोंचट जवळी चिंध्याभार ॥३॥
तुका ह्मणे सत्य तोचि एक मुर्ख । हित ते पारिख विषतुल्य ॥४॥

॥५८९६॥
लागे बळकट पाठीं । लज्जा मोठी म्हणतां ॥१॥
नेतां दर्पण सन्मुख । दिसे नाक नकटें ॥२॥
जळो ऐसें जिणें काय । जेणें होय मरण ॥३॥
तुका ह्मणे धिग ऐशीं । सुख त्यांसीं संसारीं ॥४॥

॥५८९७॥
वांयां ऐसा जन्म जावा । ऐशा हांवा वर्तवी ॥१॥
हांव संसाराची भारी । डरडरी सरेना ॥२॥
भय न धरितां कष्ट । चित्तीं विट ने गेंची ॥३॥
तुका ह्मणे बळव्यथा । भोग देतां कळेल ॥४॥

॥५८९८॥
नाहीं संतांसीं समान । राजद्वारीं उभा सुन ॥१॥
काय करावें धोविलें । थोरपण वांयां गेलें ॥२॥
करी पोटाचे आर्जव । नाहीं खाया जाय जीव ॥३॥
तुका ह्मणे विद्या । कां बा बुडविली नद्या ॥४॥

॥५८९९॥
जितां आटीतो संसार । मेल्या यमाचा किंकर ॥१॥
शेखी हें ना तैसें झालें । बोल तेही वांयां गेले ॥२॥
जिता भोगी दु:ख । अंतीं भोगी कुंभपाक ॥३॥
तुका ह्मणे त्याला । व्यर्थ तुजा जन्म झाला ॥४॥

॥५९००॥
थोडाचि वेव्हार । सदा हिंडे दारोदार ॥१॥
काय म्हणावे त्या मुर्खा । जोडी जोडीतसे पैका ॥२॥
कोणां करणें हें ध्यान । सांचीतसे दीनपण ॥३॥
काय उणें तुज मागे ॥ देतां भागे पांडुरंग ॥४॥
नाईके सांगतां । मुख नाहीं दिनानाथा ॥५॥
तुका ह्मणे पाही । देतो बैस लिये ठायीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP