एका बागेतील एका क्षुद्र काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'
तात्पर्य - एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली.