बहुतां जीवांचा केलासे उद्धार । बहुतां आधार नाम तुझे ॥१॥
करितांही वेंच सरलेंचि नाहीं । आहे तें अक्षयी जैसें तैसें ॥२॥
घेतां नलगेचि अंतपार कोणा । वसे अंतःकरणीं अणुरेणु ॥३॥
ठाकी होय जीवा तैसा गाऊं गीतीं । मना उपरति होय तेथें ॥४॥
तुका म्हणे प्राणासवें साठी नेम । धूप दीप नाम कृष्ण हरि ॥५॥