मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह २|
होउनी निश्चित हरुनियां चि...

संत तुकाराम - होउनी निश्चित हरुनियां चि...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


होउनी निश्चित हरुनियां चिंता । मग जाईं एकांता भजन करीं ॥१॥

संसार संभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साठी होइल तुझ्या ॥२॥

सेखीं विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील विषयडोहीं ॥३॥

शरीर सकळ मायेचाचि बांधा । यासी नाहीं कदा आराणूक ॥४॥

करिती तडातोडी अंतर्बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥५॥

मोलाची ते घडी अजते वायांवीण । न मिळे मोल धन देतां कुडी ॥६॥

जागा होईं करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 20, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP