नव्हों नरनारी संसारा आतलों । निर्लज्ज निष्काम जनीं वेगळेच ठेलों ॥१॥
चाल रघुरामा आपुलिया ग्रामा । तुजवीण आम्हा कोण सुख सांगाती ॥ध्रु०॥
जनवाद लोकनिंदा पिसुणाचें चोरें । साहीं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥
बहुतां हातीं हा निरोप पाठविला तुज । तुका म्हणे फुका सांडुनियां लोकलाज ॥३॥