मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
आनंदु रे कीं परमानंदु रे ...

संत तुकाराम - आनंदु रे कीं परमानंदु रे ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


आनंदु रे कीं परमानंदु रे । जया श्रति नेती म्हणती गोविंदु ॥ध्रु०॥

आम्हीं विठोबाचीं वेडीं आनंदी सदां । गाऊं नाचूं वाजवूं टाळी रिझवूं गोविंदा ॥१॥

सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी । आनंद निर्भर आमुचा कैवारी बळी ॥२॥

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक करिती आमुचें कौतुक ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP