काय पुण्य आहे ऐसें मजपाशीं । तांतडी पावसी पांडुरंगा ॥१॥
काय कष्टें माझी देखिली चाकरी । तूतें झडकरी पाचारितां ॥२॥
कोणता मी गुणी ऐसा थोर मोठा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥
स्वल्प मज तुझी घडली नाहीं भक्ति । पुसावी विरक्ति कोठोनियां ॥४॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्में हित नसे केलें ॥५॥