मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|अष्टावक्र गीता| अध्याय ५ अष्टावक्र गीता अध्याय २१ वा अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अष्टावक्र गीता - अध्याय ५ अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे. Ashtavakra gita is a perfect moral of life. Tags : ashtavakragitaअष्टावक्रगीता अध्याय ५ Translation - भाषांतर अष्टावक्र म्हणाला तुझा कोणाशींही संबंध नाहीं, त्यामुळें तूं शुद्ध आहेस. तूं कशाचा त्याग करुं इच्छितोस ? अशा रीतीनें देहाभिमान नाहींसा करुन तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥१॥ अशीच भावना कर कीं, माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे; जसा समुद्राच्या पाण्यांत बुडबुडा उत्पन्न होतो--आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून, तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥२॥ दृश्यमान जगत् प्रत्यक्ष दिसत असलें तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसें आभासरुप आहे. तुला शुद्धाला----मलरहिताला तें नाहीं, असें जाणून तूं लयाला----निर्वाणाला प्राप्त हो. ॥३॥ दुःख व सुख, आशा आणि निराशा, जीवन व मृत्यु जो समान मानतो असा पूर्ण होऊन तूं लयाला----मोक्षाला प्राप्त हो. N/A References : N/A Last Updated : May 31, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP