यदा स्वनिगमेनोक्तं, द्विजत्वं प्राप्य पूरुषः ।
यथा यजेत मां भक्त्या, श्रद्धया तं निबोध मे ॥८॥
द्विजन्मे जे तिन्ही वर्ण । त्यांचें आधिकारलक्षण ।
गर्भाष्टमीं उपनयन । तैं अधिकार पूर्ण ब्राह्मणा ॥६४॥;
क्षत्रियांचा अधिकार शुद्ध । बारा वर्षां व्रतबंध ।;
सोळा वर्षां प्रसिद्ध । व्रतबंध वैश्यासी ॥६५॥;
गायत्री उपदेश पावोन । दुसरें जन्म उपनयन ।
या लागीं ’सवित्र’ जन्म जाण । द्विजन्मे त्रिवर्ण वेदोक्तविधी ॥६६॥
वेदोक्त अधिकारलक्षण । या नांव उद्धवा जाण ।;
आतां माझें पूजाविधिस्थान । ऐक संपूर्ण निजभक्ता ॥६७॥