दुर्गां विनायकं व्यासं, विष्वक्सेनं गुरुन् सुरान् ।
स्वे स्वे स्थाने त्वभिमुखान्, पूजयेत्प्रोक्षणादिभिः ॥२९॥
दुर्गा विनायक जाण । व्यास आणि विष्वक्सेन ।
चहूं कोनीं चारी स्थापून । करावें पूजन देवाभिमुख ॥६६॥
मूळमूर्तीसी अभिन्नाकारु । गुरु आणि परमगुरु ।
परमेष्ठिगुरुसी एकाकारु । पूजाप्रकारु करावा ॥६७॥
इंद्रादि अष्टौ लोकपाळ । आह्वानूनियां सकळ।
स्थापूनि अष्टौ दिशा केवळ । तेही तत्काळ पूजावे ॥६८॥
गुरु-दुर्गादिक लोकपाळ । पूजावे सांगोपांग सकळ ।
प्रोक्षणपाद्यादि अविकळ । पूजा निश्चळ करावी ॥६९॥
तेचि पूजेचे पूजोपचार । कोण कोण पैं प्रकार ।
साही श्लोकीं शार्ङगधर । संक्षेपाकार सांगत ॥२७०॥