॥श्रीगणेशाय नम : ॥
धृतराष्ट्र ह्मणे गा संजया ॥ त्वन्मुखें अपूर्व ऐकिलें म्यां ॥ कीं कृष्णें कर्णा नेवोनियां ॥ कथिलें कांहीं ॥१॥
तरी तूं सर्वज्ञ भला ॥ आहेसि सामर्थ्ये आथिला ॥ह्मणोनि सागें वहिला ॥ कां कर्ण नेला गोविंदें ॥२॥
संजय ह्मणे कर्णाकारणें ॥ कृष्ण बोलिला मधुरवचनें ॥ तीं ऐकावीं सावधानें ॥ प्रश्र्नानुसार ॥३॥
कर्णासि ह्मणे नारायण ॥ तूं गा धर्मशास्त्रीं निपुण ॥ तरी कन्येचा भ्रतार जाण ॥ पिता निश्र्वयें पुत्राचा ॥४॥
ऐसा असे शास्त्राचार ॥ तरी तूं कुंतीचा कुमर ॥ ह्मणोनि पंडु होय निर्धार ॥ पिता तुजलागीं ॥५॥
तूं वडील बंधु धर्मासी ॥ राज्यासना योग्य आहेसी ॥चाल मजसवें धर्मापाशीं ॥ देतों राज्य तुजलागीं ॥६॥
पांडव तुझे पाय धरिती ॥ह्मणतील होई आमुचा भूपती ॥तुज राज्याभिषेक करिती ॥ ओळंगती सर्वदा ॥७॥
येरु ह्मणे कृष्णनाथा ॥ धर्मशास्त्र अवलेकितां ॥ पंडु होय माझा पिता ॥ येथ नाहीं संदेह ॥८॥
परि मज आदित्यांपासाव ॥ जाहला कन्येच्या ठांई उध्दव ॥ तैं कुंतियें सांडोनि स्त्रेहभाव ॥ सोडिलें जळीं मजलागीं ॥९॥
मातेनें मम मरणाची कांहीं ॥ मनीं आशंका धरिली नाहीं ॥ असो यावरी सूत पाहीं ॥ घेवोनियां गेलामज ॥१०॥
तयाची पत्नी राधा नावें ॥ तियें वाढविलें पुत्रभावें ॥ कष्ट सोशिले आघवे ॥ पाजिलें स्तनपान ॥११॥
सूतें जातकादि केलें ॥ संस्कारांहीं नाम ठेविलें ॥ विवाह केलिया जाहले ॥ पुत्रपौत्र ॥१२॥
तरी मी सूतपुत्र नव्हे ॥ ऐसें केवीं ह्मणों ये ॥ आणि राज्यभोग आघवे ॥ दीधले दुर्थोधनें ॥१३॥
माझा भरंवसा गांधारें धरिला ॥ पांडवांसी विग्रंह केला ॥ तरी तो जाईल सांडिला ॥ आजि केवीं ॥१४॥
आतां मी वधाबंधाभया पासोनी ॥ न सांडीं दुर्योधना निर्वाणीं ॥ ह्मणितलें पार्थासि झुंजेन रणीं ॥ ते मिथ्या वाणी केविं करुं ॥१५॥
मज बंधु जाणोनि वडिल ॥ धर्मराजा कांहीं देईल तरीं तेंही दुर्थोधना सकळ ॥ समर्पणें मज ॥१६॥
यास्तवधर्माचि राज्य पावो ॥ माझा नव्हे अन्य भावो ॥ जिकडे भीनार्जुन कृष्णदेवो ॥ तिकडे जय हें जाणें मी ॥१७॥
यावरी कृष्ण ह्मणे कर्णासी ॥ भला गा अंगिकारिया होसी ॥ असो आतां भीष्मादिकांसी ॥ सांगावें तुवां ॥१८॥
कीं युध्द्काळ आलाआतां ॥ आजिहुनि दिवसां सातां ॥ मग सन्मानोनि सूर्यसुता ॥ पाठविला देवें ॥१९॥
तो येवोनि भीष्मादिकां भेटला ॥ समागमें नगरीं आला ॥ वृत्तांत सकळां सांगीतला ॥ युध्द सातवे दिवशीं कीं ॥२०॥
मग कृष्ण्कर्णाचा वृत्तांत ॥ विदुरें कुंतिये केला श्रुत ॥ यावरी कुंती जावोनि त्वरित ॥ भेटली कर्णा एकांतीं ॥२१॥
जे तरी कृष्णें कर्णाप्रती ॥ सांगीतली होती स्थिती ॥ तेचि कर्णाप्रति कुंती ॥ कथिती जाहली ॥२२॥
परि तेणें तव्देत बोलिलें ॥ कीं मी सर्वथा धर्मासि नटळें ॥ तंव कुतियें ह्मणितलें ऐकें कर्णा ॥२३॥
या कौरवां आणि रायांचें ॥ आयुष्य पुरलें असेसाचें ॥ तरी त्वां बुध्दीं पांडवांचें ॥ कीजे रक्षण ॥२४॥
येरु ह्मणे वांचोनि अर्जुन ॥ चौघांसही न मारीं जाण ॥ यावरी कुंति आणि कर्ण ॥ गेलीं स्वस्थानीं ॥२५॥
मुनि ह्मणे राया अवधारीं ॥ ऐसें वर्तलें हस्तनापुरीं ॥ इकडे पांडवां भेटोनि श्रीहरी ॥ गेला आपुले बिढारा ॥२६॥
मग एकांती मागुतें॥पांडवीं पाचारिलें कृष्णातें ॥ ह्मणती कीं भीष्मादिक तेथें ॥ बोलिले काय ॥२७॥
यावरी कौरवांचीं वचनें ॥ देवें कथिलीं पृथकपणें ॥ आणि राग करोनि ॥ दुर्योधनें बोलिलें जें जें ॥२८॥
ह्मणितलें कीं आपुले लोकां॥ आजि पुष्ययोग असे देखा ॥ तरी सन्नध्द करोनि कटका ॥ चला कुरुक्षेत्रीं ॥२९॥
अकाराक्षोणी दळ मिळालें ॥ गांधारें भीष्मा विनविलें कीं ॥ आपणेया असे दिलें॥ सेनापतित्व ॥३०॥
ऐसें जाणोनि युधिष्ठिरा ॥ आतां तुह्मी युक्त आचरा ॥ अवघे आले कुरुक्षेत्रीं ॥ विनाशार्थ ॥३१॥
हें कौरवसभेचें वृत्त ॥ म्यां सर्वज्ञत्वें केलें श्रुत ॥ ऐसें बोलिला कृष्ण्नाथ ॥धर्मप्रती ॥३२॥
श्रीकृष्ण्वाक्य ऐकोनि पुढती ॥ धर्म बोलिलाबंधुवांप्रती ॥ कीं सैन्याची विभागस्थिती ॥ करा आतां ॥३३॥
सातक्षोणींचे सात नायक ॥ करा द्रुपद विराट सम्यक ॥ धृष्टद्युम्न शिखंडि सात्विक ॥ भीम आणि चेकितान ॥३४॥
हे सातही दळाधिपती ॥ ऐसा विचार केला रातीं ॥ तंव उगवला गभस्ती ॥ संसारले सैनिक ॥३५॥
वाजंत्रांच्या महानदीं ॥ चालिले कुरुक्षेत्रीं युध्दीं ॥ पावले हिरण्यनामकनदी ॥ तीरीं उतरलें सर्वदळ ॥३६॥
उत्तमभूमी चिये ठायीं ॥ बिढारें केलीं लवलाहीं ॥ केली सामुग्री सर्वही ॥ बिढारांत ॥३७॥
दुर्योधनाचेंही दळ ॥ कुरुक्षेत्रीं पातलें सकळ ॥ रण वाद्यांचा होत कल्लोळ ॥ तये ठायीं ॥३८॥
दुसें मंडप वाखाणितां ॥विस्तार फार होईल ग्रंथा ॥ ह्मणोनि संक्षेपें भारता ॥ कथणें लागे ॥३९॥
असो दुर्योधनें अवधारा ॥ अकराही क्षोणींचे अकरा ॥ स्वामी केले सत्वरा ॥ पृथकत्वें पैं ॥ ४०॥
कृपाचार्य आणि द्रोण ॥ शल्य जयद्र्थ सुदक्षिण ॥ कृतवर्मा अश्र्वत्थामा विकर्ण ॥ भूरिश्रवा शकुनीया ॥४१॥
आणि बाल्हिक अकारावा ॥ ऐसा अक्षौहिणीचा मेळावा ॥ आतां गणितभाग ऐकावा ॥ सेनेपासोनी ॥४२॥
सेना ऐसें काय ह्मणिजे ॥ जेथें पांच रथ देखिजे ॥ एकैका रथाप्रति दीजे ॥ हस्ती पांच पांच ॥४३॥
एकैका हस्तीप्रती ॥ राउत सातसात देइजती ॥ एकैका राउता पदाती ॥ द्यावे सातसात ॥४४॥
येणें गणितप्रमाणें ॥ सेना येकी बोलणें ॥ ते सेनादशगुण करणें ॥ ते पृतनायेकी ॥४५॥
दशपृतना ते वाहिनी ॥ दश वाहिनी ते ध्वजिनी ॥ दश ध्वजिनी ते सादिनी ॥ जाणावी पैं ॥४६॥
दश सादिनी ते वरुथिनी ॥ दश वरुनथिनी ते अक्षौहिणी ॥ ऐसें अक्षौहिणीमान जाणीं ॥ गणितमतें ॥४७॥
असो दुर्योधनें दळभारा सर्वा ॥ स्वामी केलें भीष्मदेवा ॥ प्रथम कर्णाचा होता वानवा ॥ तंव तो बोलिला दुर्योधना ॥४८॥
जंव परियंत भीष्म आहे ॥ तंव मी दळाधिपती नोहें ॥ ह्मणोनि स्तवूनि नाना उपायें ॥ प्रतिष्ठिला भीष्म ॥४९॥
भीष्में प्रतिज्ञा केली ऐसी ॥ कीं मी दहाहजार प्रतिदिवशीं ॥ योध्दे मारावे निश्र्वयेंसीं ॥ रणमंडळांत ॥५०॥
राया सहस्त्र राहतां वरी ॥ जो एकला झुंजे समरीं ॥ निपुण असोनि शस्त्रास्त्रीं ॥ तो योध्दा बोलिजे ॥५१॥
एकशत योध्दयांप्रती ॥ झगडे तो बोलिजे रथी ॥ झुंजे सहस्त्र योध्यांप्रती ॥ तो अतिरथिया ॥५२॥
दशसहस्त्र योध्यांशीं झुंजे ॥ तो महारथिया बोलिजे ॥ आतां अग्रकथा ऐकिजे ॥ भारता गा ॥५३॥
मग कौरवपांडवीं प्रकट ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ ॥ सैन्यांग निवडिले श्रेष्ठ ॥ वीरांमाजी ॥५४॥
असो ऐकें येकी कथा ॥ देवशिष्टाईस आला होता ॥ तैं सभेंत बोलिला निरुता ॥ विदुर धृतराष्ट्रासी ॥५५॥
कीं तूं पुत्रांचा त्याग करीं ॥ आणि पांडवां अंगिकारीं ॥ हें ऐकोनि तिये अवसरीं ॥ कोपला दुर्योधन ॥५६॥
ह्मणे हादासीपुत्र आह्मी पोशिला ॥ आणि परपक्षियां सांदर जाहला ॥ येथें कवणें हा आणिला ॥ काढा देशांतुनी ॥५७॥
ऐसें सकळांदेखतां बोलिलें ॥ विदुरें मनीं विचारलें ॥ कीं आतां येथें राहतां भलें ॥ नाहीं आपणा ॥५८॥
व्दारीं धनुष्यभाता ठेविला ॥ स्वयें तीर्थयात्रेसि गेला ॥ याउपरी बळभद्र आला॥ कुरुक्षेत्रीं ॥५९॥
तेणें दळभार सन्नध्द देखिला ॥ मग धर्मशिबिरीं प्रवेशला ॥ एकांतीं ह्मणों लागला ॥ कृष्णादिकांसीं ॥६०॥
जिकडे कृष्ण तिकडे जय ॥ मज तरी कृष्णावेगळें होतां नयें ॥ यास्तवतुह्मां पुसोनि लवलाहें ॥ तीर्थयात्रे जातो मी ॥६२॥
तुमची भेटी मागुती ॥ कुशळत्वें व्हावी पुढती ॥ ऐसें ह्मणोनि रेवतीपती ॥ गेला तीर्थयात्रेसी ॥६३॥
यावरी भीमकाचा कुमर ॥ बहुत घेवोनि सैन्यभार ॥ रुक्मिया नामें आला शीघ्र ॥ पांडवांपाशी ॥६४॥
तो साभिमानें पांडवा ह्मणे ॥ तुह्मी भीत असाल मनें ॥ तरीं तुमचा पक्ष धरणें ॥ लागले मज ॥६५॥
ऐकोनि अर्जुन बोलिला ॥ अरे म्यां रुद्रासीं संग्राम केला ॥ निवातकवचांचा ठाय मोडिला ॥ आणि पराभविलें गंधंर्वा ॥६६॥
तेथें भय पावलों नाहीं ॥ तरी भय तें सांग काई ॥ त्वन्मनीं येईल तरी राहीं ॥ नातरी जाई मागुता ॥६७॥
या ऐकोनि पार्थबोला ॥ मग दुर्योधनाजवळी गेला ॥ ह्मणे भीत असशील तरी वहिला ॥ धरीन पक्ष तुझा मी ॥६८॥
तंव बोलिलें दुर्योधनें ॥ भितों ऐसें क्षत्रिय न ह्मणे ॥ तुज मागले तरी राहणें ॥ नातरी जाणें सत्वर ॥६९॥
हें दुर्योधनोत्क ऐकोनि ॥ गेला स्वदेशीं सैन्य घेउनी ॥ ऐसियापरी दोघांजणीं ॥ सांडिलें युध्द कंदन ॥७०॥
असो यावरी मागुते ॥ पांडव बैसले विचारणेतें ॥ तंव धर्म ह्मणे श्रीकृष्णातें ॥ कौरवीं काय केलेंसे ॥७१॥
मग बोलिलें यदुरायें ॥ जेवीं आपुले कटाकीं पाहें ॥ धनधान्य समृध्दि आहे ॥ सर्वत्रपणें ॥७२॥
तैशीच शिबिरांच्या ठायीं ॥ सामुग्री सिध्द केली त्यांहीं ॥ परि तूं निश्र्विंतमनें राहीं ॥ जय असे आपुला ॥७३॥
आतांअसो हें तेचि अवसरीं ॥ इकडे धृतराष्ट्रें हस्तनापुरीं ॥ संजयासी सुष्टोत्तरीं ॥ पुसिलें देखा ॥७४॥
ह्मणे धिक् माझें जियाळें ॥ म्यां दुष्टपुत्रां नाहीं त्यागिलें ॥ कांहींच आत्महित केळें ॥ नाहीं यांत ॥७५॥
तरी आतां मज यथार्थ ॥ सांगें कुरुक्षेत्रींचा वृत्तांत ॥ यावरी संजय बोलत ॥ धृतराष्ट्राप्रती ॥७६॥
कीं दुष्टचतुष्टंई विचार केला ॥ राजा उलूक संबोखिला ॥ तो कैतव्यें पाठविला ॥ पांडवांजवळी ॥७७॥
ह्मणे पंडुपुत्र हो ऐकणें ॥ माझेनि मुखें तुह्मांकारणें ॥ ह्मणितलें असे दुर्योधनें ॥ पाठलेती कुरुक्षेत्रीं ॥७८॥
आतां मागील वैर स्मरोनी ॥ वीखतू झुंजा समरंगणीं ॥ क्षत्रियांमाजी त्या वांचोनी ॥ नव्हे गणना तूनचे ॥७९॥
द्रौपदीक्केश आठवावे ॥ वनवासदु:ख स्मरा आघवें ॥ भीमें दु:शासनाचें करावें ॥ रक्तपान ॥८०॥
वैर आठविल्या वांचून ॥ करुं नका युध्द दारुण ॥ ऐकोनि ह्मणती कृष्णार्जुन ॥ उलूकासी ॥८१॥
जारे तया सांगें वहिलें ॥ तूं उडतोसि ज्यांचे बळें ॥ त्यांसी रणीं मारोनि पहिलें ॥ पुरवूं तुझे मनोरथ ॥८२॥
मग त३णें कृष्णार्जुनोक्त ॥ येवोनि गांधारा केलें श्रुत ॥ यावरी दुर्योधनें त्वरित ॥ केला विचारु ॥८३॥
कीं उदयीक युध्द करुं ॥ ऐसें ह्मणोनि गांधारु ॥ सन्नध्द केला दळभारु ॥ कुरुक्षेत्रीं ॥८४॥
धुरेसि धुरा मिळविती ॥ तेथ भीष्में दुर्योधनाप्रती ॥ रथी अर्धरथी महारथी ॥ यांची संरव्या सांगीतली ॥८५।
त्यांत कर्ण अर्धरथी ह्मणितला ॥ तेणें कर्णासी त्र्कोध आला ॥ ह्मणे भीष्म जंव नाहीं पडला ॥ तंव युध्द न करीं मी ॥८६॥
कां जे म्यां वैरी जिकंणें ॥ आणि भीष्मासि यश देणें ॥ ऐकोनि भीष्म ह्मणे ॥ सकळां देखतां ॥८७॥
मी येकालाचि जाण ॥ समस्तांसी युध्द करीन ॥ हें दीधलेंसे वरदान ॥ गंगामातेनें मजलागीं ॥८८॥
परि स्त्रीपूर्वक पुरुषासी ॥ मी शस्त्रास्त्रीं हात नवशीं ॥ प्रतिज्ञा असे माझी ऐसी ॥ ब्रह्मचर्यणें ॥८९॥
स्त्रीपूर्वक हा शिखंडिया ॥ यासी झुंजें मी ह्मणोनियां ॥ तंव दुर्योनधन ह्मणे गांगेया ॥ सांगा याचा वृत्तांत ॥९०॥
येरु ह्मणे अंबा अंबिका अंबालिका ॥ काशीश्र्वराच्या कन्यका ॥ स्वयंवरीं हरिल्या ऐका ॥ म्यां विचित्रार्थी ॥९१॥
परि अंबा ह्मणे मातें ॥ म्यां वरिलें असे शाल्वातें ॥ ह्मणोनि पाठविलें तियेतें ॥ शाल्वाप्रती ॥९२॥
तियेनें आमुचा वृत्तांतु ॥ शाल्वालागीं केला श्रुतु ॥ येरु ह्मणे भीष्माई स्त्री तूं ॥ मजमातृवत् पैं ॥९३॥
मग ते काशीश्र्वराच्या घरीं ॥ रुदत चालिली नगराबाहेरी ॥ मार्गी जातां विचार करी ॥ कीं भीष्में केला पराभव ॥९४॥
तरी पुरुषत्व साधूं तप करोनी ॥ मग भीष्म निर्दाळूं रणीं ॥ ह्मणोनि तापसांजवळी जावोनि ॥ सांगीतला वृत्तांत ॥९५॥
ते वैखानस मुनीसि ह्मणे ॥ स्वामी मज संन्यास देणें ॥ तपें आचरीन दारुणें ॥ जेणें लाभे पुरुषत्व ॥९६॥
ऐसें ह्मणे तंव तेथें ॥ वनवास करावयातें ॥ होत्रवाहन राजयातें ॥ जाहलें येणें ॥९७॥
तो अंबेचा मातृपिता ॥ तेणें ओळखिली ते सुता ॥ ह्मणोनि जाहला पुसता ॥ येरियें वृत्तांत सांगीतला ॥९८॥
राव प्रीति वचनेम ह्मणे ॥ तुवां परशुरामाजवळी जाणें ॥ तयासी हा वृत्तांत सांगणें ॥ तो प्रयत्न करील ॥९९॥
तो असे महेंद्रपर्वतीं ॥ शीघ्र जाई तयाप्रती ॥ तंव अकृतव्रण वेदमूर्ती ॥ आला तेथें अविनाशशिष्य ॥१००॥
तो होत्रवाहनें पूजोनी ॥ ह्मणे अविनाश कोणे स्थानीं ॥ तंव ह्मणे अकृतव्रणमुनी ॥ आजि येथें येईल ॥१॥
ऋषीश्र्वर पुसे रायासी ॥ हे कन्या येथें कायसी ॥ रायें श्रुत केला ॥ वृत्तांत अंबेचा ॥२॥
असो परशुराम तेथ आला ॥ तो रायें ऋषीश्र्वरीं पूजिला ॥ मग अंबावृत्तांत कथिला ॥ होत्रवाहनें ॥ ३॥
तो ऐकोनि रेणुकात्मजें ॥ अंबेसि आश्र्वासिलें वोजें ॥ मग आह्मांजवळी बिजें ॥ केलें रामें तियेसहित ॥४॥
म्यां करोनि पूजा आदर ॥ ह्मणितलें स्वामीं कीजे उपहार ॥ येरु ह्मणे करींअंबांगिकार ॥ केलें रामें तियेसहित ॥५॥
म्यां ह्मणितलें जी श्रीगुरु ॥ इये परस्त्रीचा अंगिकारु ॥ मज सर्वथा नये करुं ॥ ह्मणोनि वृत्तांत कथियेला ॥६॥
परि आग्रहो घेतला तेणें ॥ ह्मणे मव्दाक्य अंगिकारणें ॥ म्यां ह्मणितलें मज न करणें ॥ सर्वथा निंद्यकर्म ॥७॥
गंगेसमान सर्व नारी ॥ मियां मानिल्या समग्री ॥ ऐसें ऐकोनियां भारी ॥ रागेजला राम ॥८॥
ह्मणे युध्द करीं मातें ॥ हारी आलिया वरीं इयेतें ॥ म्यां ह्मणितलें कीं सद्रुरुतें ॥ युध्द करुंचि नये ॥९॥
जरी गुरु नष्ट असला ॥ तरी परित्यजावा वहिला ॥ आणि जरी शस्त्र घेवोनि आला ॥ मारावयासी ॥११०॥
तरी तो जाणावा आततायी ॥ गुरु अथवा विप्र पाहीं ॥ ह्मणोनि त्याची हत्या नाहीं ॥ हें धर्मशास्त्र ॥११॥
यास्तव मी युध्द न करीं ॥ ऐसाही आग्रह धराल तरी ॥ चला शस्त्रें घेवोनि कुरुक्षेत्रीं ॥ मग दोघे आलों तेथें ॥१२॥
पुढें बावीस दिवसवरी ॥ दोघां युध्द जाहलें शस्त्रास्त्रीं परि कोणासीही हारी ॥ नव्हे जयाजय ॥१३॥
तेथें देवपितृगण आले ॥ त्यांहीं अवि नाशासांगीतलें ॥ कीं शस्त्र सांडीं गा वहिलें ॥ ब्राह्मण ह्मणोवोनी ॥१४॥
आपुला तरी क्षात्रधर्म ॥ सांडों न शके हा भीष्म ॥ हें ऐकोनियां राम ॥ संतोषला अंतरीं ॥१५॥
माझी स्तुति करोनि भेटले ॥ मग युध्द निवारलों ॥ तेव्हां अंबेसि राम बोले ॥ माझेंनचले भीष्मासी ॥१६॥
तरी तूं आतां तप करोनी ॥ प्रसन्न करीं शूळपाणी ॥ तया जवळी वर मागोनी ॥ करीं आपुलें कार्य ॥१७॥
मग ते यमुनातीरीं गेली ॥ तेथें तप करिती जाहली ॥ पंचाग्निसाधना साधिली ॥ शुष्कपर्णाशनें ॥१८॥
वरुषांदिवसां पारणें ॥ उदकांमध्यें बैसणें ॥ तंण रुद्र तपें तेणें ॥ प्रसन्न जाहला ॥१९॥
शंकर ह्मणे मागें वर ॥ येरी ह्मणे स्त्रीचा होवोनि नर ॥ करीन भीष्माचा संहार ॥ ऐसें देंई जाश्र्वनीळा ॥ १२०॥
महेश्र्वर ह्मणे तथास्तु ॥ तरी ऐकें येक वृत्तांतु ॥ द्रुपदराजा माझा भक्तु॥ करीतसे जपहोम ॥२१॥
मी वर देतों तयासी ॥ मग तूं द्रु पदाचे स्त्रीयेसी ॥ कन्या उपजोनि पुत्र होसी ॥ पावशी शिखंडया नाम ॥२२॥
यावरी पुढें पांडवां अर्थी ॥ तूं करिशील भीष्मशांती ॥ ऐसा वर देवोनि अंबेप्रती ॥ रुद्र अदृश्य जाहला ॥२३॥
मग त्या अरण्यामाझारी ॥ अंबा अग्निप्रवेश करी ॥ देह त्यजिला ऐशियापरी ॥ ऐकें दुर्योधना ॥२४॥
इकडे तियेचि अवसरीं ॥ द्रुपदा प्रसन्न जाहला त्रिपुरारी ॥ तंव गरोदरा जाहली नारी ॥ द्रुपदरायाची ॥२५॥
ते शीलदेवी नामें कामिनी ॥ कन्या प्रसवली शिखंडिनी ॥ तो रायासि पुत्र ह्मणोनी ॥ प्रकट केलें लटिकेंचीं ॥२६॥
ते मावकन्या जाहली थोर ॥ नकळे कवणासी चरित्र ॥ वाढविली प्रयत्नपर ॥ शीलदेवीनें ॥२७॥
तें दुर्योधना परियेसीं ॥ नारदें श्रुत केलें मजसी ॥ तोपुत्र ह्मणोनि द्रोणापाशीं ॥ पढूं घातला द्रुपदरायें ॥२८॥
सकळ्विद्या आल्या तया ॥ मग शीलदेवी ह्मणे राया ॥ कीं रुद्रवतदा पुत्रा यया ॥ मेळ्वावी नोवरी ॥२९॥
दशार्णदेशींचा नृपवर ॥ हिरण्यावर्मा नामें थोर ॥ तयाची कन्या रुपसुंदर ॥ मेळविली द्रुपदरायें ॥१३०॥
शिखंडीची वर्हाडिका जाहली ॥ मग स्त्रुषा सासुरीं आणिली ॥ परि कवणी येही काळीं ॥ नव्हे पुरुषसंग ॥३१॥
मग ती दाईस ह्मणे ऐसें ॥ कीं माझा भ्रतार स्त्री असे ॥ तें श्रुत जाहले सविशेषें ॥ हिरण्यावर्मयासी ॥३२॥
येरु ह्मने कैसें सितरिलें ॥ कन्येसि बंदिखानां घातलें ॥ ह्मणोनि दूत पाठविले ॥ द्रुपदाजवळी ॥३३॥
दूतीं रायासि जाणविलें ॥ कीं त्वां हिरण्यवेमया नाडिलें ॥ तरी युध्द करीं वहिंले ॥ तयासीं गा ॥३४॥
दूत आश्र्वासोनि पामकिले ॥ द्रुपदाचें मन चिंतावलें ॥ स्त्रियेसहित भजन मांडिलें ॥ नानादेवतांचें ॥३५॥
माझी कन्या पुत्र करा ॥ ऐसें विनवी समग्रां ॥ परि तें न घेडेचि गांधारा ॥ बहुतांपरी ॥३६॥
तें कळलें शिखंडिनी ॥ कीं माझेनि कष्ट पितयासी ॥ उपद्रव होऊंपाहे देशासी ॥ मजनिमित्त ॥३७॥
तरी देहत्याग करुं वनीं ॥ ह्मणोनि निघाली शिखंडिनी ॥ तंव मंदिर देखिलें नयनीं ॥ स्थूणयक्षाचें ॥३८॥
अनशनव्रतें बैसली तेथें ॥ मग तोह्मणे तियेतें ॥ कवण वर देऊं तूतें ॥ तें सांगें वो तापसी ॥३९॥
यावरी आपुला वृत्तांत ॥ तियें स्थूणयक्षा केला श्रुत ॥ तरी हिरण्यवर्मा जंव देशांत ॥ येवोनि जाय माघारा ॥१४०॥
तोकाळप्रियंत स्वामी ॥ मज पुरुषत्व द्यावें तुह्मीं कार्यातीं तुमचें तुह्मास मी ॥ देईन पुरुषत्व ॥४१॥
ह्मतो ह्मणे शिखंडिनी ॥ माझें पुरुषलिंग घेउनी ॥ करीं संकटनिवारणी ॥ मग देई माझे मज ॥४२॥
ऐसा भाषानिश्र्वय करोनी ॥ शिखंडी आला पुरुष होवोनी ॥ स्थूणयक्ष होवोनि कामिनी ॥ बैसलासे गृहांत ॥४३॥
तंव इकडे द्रुपदाचें नगर ॥ पांचाळपुर समग्र ॥ हिरण्यवर्मायानें शीघ्र ॥ वेढिलें देखा ॥४४॥
तेव्हां बहुश्रुत ब्राम्हण ॥ द्रुपदें शिकवोनियां प्रयत्न ॥ हिरण्यवर्म्याप्रति धाडोन ॥ शिष्टपणें आदरिला ॥४५॥
येरु हिरणुवर्मया बोलिला ॥ रायें अपराध नाहीं केला ॥ पुत्र पुरुषत्वें आथिला ॥ असे जाणा ॥४६॥
आपण दासी पाठवोनी ॥ याची प्रचीती आणावी मनीं ॥ ऐसें भाषण ऐकिलें कानीं ॥ हिरण्यवर्मयानें ॥४७॥
मग दासी पाठवोनि पाहिलें ॥ तंव पुरुष ऐसें कळों आलें ॥ वैरभाव टाकोनि वहिले ॥ भेटले परस्परें ॥४८॥
यावरी वस्त्रालंकार दासी ॥ अश्र्वगजरथ द्रव्यराशी ॥ देवोनियां जामातासी ॥ केली बोळवण श्र्वशुरें ॥४९॥
असो इकडे तेचि अवसरीं ॥ कुबेरयक्षपती परिवारीं ॥ येवोनि स्थूणयक्षाचे घरीं ॥ भेटीलागीं बैसला ॥१५०॥
परि तो स्त्रीत्व असे पावला ॥ भेटी नेघे लज्जित जाहला ॥ तंव कुबरे सेवकां बिलिला ॥ कां पां नये स्थूणयक्ष ॥५१॥
मग येवोनि त्याची कांता ॥ कुबेरा श्रुत केली वार्ता ॥ येरें बोलावोनि शीघ्रता ॥ आणविला जवळी ॥५२॥
त्याचा स्त्रीवेष देखिला ॥ कुबेर अत्यंत क्षोभला ॥ मग शापिता जाहला ॥ स्थूणयक्षासी ॥५३॥
ह्मणे माझी सेवा सांडोन ॥ बैसलासी स्त्री होऊन ॥ तरी स्त्रीवेषचि धारण ॥ करीं निरंतर ॥ ५४॥
तंव तो करी विनवणी ॥ स्वामी तुझे चरण सांडोनी ॥ मी कैसा राहुं ह्मणोनी ॥ फेडिजे स्त्रीत्व माझें ॥५५॥
यावरी कुबेर ह्मणे पाहें ॥ जोंवरी शिखंडी जीवंत आहे ॥ तोंवरी तुज प्राप्त नोहे ॥ पुरुष पण ॥५६॥
तो कौरवयुध्दीं भीष्मासी ॥ मारोनि मरले परियेसीं ॥ मग तूं आपुलें पावसी ॥ पुरुषपण ॥५७॥
ऐसा अनुग्रहो केला ॥ स्थूणयक्ष संतोषला ॥ तंव व्यसन दूरी करोनि गेला ॥ शिखंडिया स्वसैन्ये ॥५८॥
कुबेर स्वस्थानीं पातला ॥ इकडे शिखंडिया भेटला ॥ ह्मणे मनोरथ सफळ जाहला ॥ तवप्रसादें ॥५९॥
आतां तुझें पुरुषत्व घेंई ॥ माझें स्त्रीपण मज देई ॥ तंव कुबेरवृत्तांत सर्वही ॥ सांगीतला स्थूणयक्षें ॥१६०॥
ह्मणे शिखंडिय भलाभला ॥ तुवां सत्य बोल राखिला ॥ तरी शब्द ये क वहिला ॥ ऐकें माझा ॥६१॥
जंव तूं जीवंत आहेसी ॥ तंव मी नेघें पुरुषत्वासी मग मी माझें परियेसीं ॥ घेईन अंतीं ॥६२॥
यावरी त्याची आज्ञा घेउनी ॥ शिखंडिया गेला स्वस्थानीं ॥ सुख मानिलें सर्वजनीं ॥ पिताजननी आनंदलीं ॥६३॥
जेंजें देवा होतें नवसिलें ॥ तें तें सर्व विधान केलें ॥ हें मज नारदें सांगीतलें ॥ दुर्योधना गा ॥६४॥
तरी गा द्रुपदपुत्र शिखंडिया ॥ पूर्वरुप स्त्री ह्मणोनियां ॥ संग्राम न करावा मियां ॥ ऐसियासी ॥६५॥
हे माझी प्रतिज्ञा सत्य ॥ ऐसें ह्मणे देवव्रत ॥ तया वांचोनि समस्त ॥ खंडविखंड करिन मी ॥६६॥
मग नानास्तुति सन्मानें ॥ भीष्म स्तवि लां दुर्योधनें ॥ असो सेनापतित्व तेणें ॥ अंगिकारिलें यावरी ॥६७॥
उभय सैन्यें येरा दिवशीं ॥ नेहटलीं झुंजावयासी ॥ ते अग्रकथा परियेसीं ॥ पुढील पर्वी ॥६८॥
प्रतिपर्वी एकैक ब्राह्मण ॥ उठोनियां तेजगहन ॥ बोलत असे आशीर्वचन ॥ रायाप्रती ॥६९॥
यापरि उठलिया विप्रपंचक ॥ राव आनंदला देख ॥ ह्मणे पुढील कथा सम्यक ॥ सांगा स्वामिया ॥१७०॥
मुनि ह्मणे राया भारता ॥ पांच फिटल्या ब्रह्महत्या ॥ तैशाचि पर्वापर्वाप्रति समस्ता ॥ फिटतील जाण ॥७१॥
श्रीहरीचे वर्णितां गुण ॥ महादोषां होय दहन ॥ तेथें ब्रह्महत्येचें कारण ॥ उरे केवीं ॥७२॥
आतां उद्योगपर्व संपलें ॥ संकलोनि विस्तारलें ॥ पुढें भीष्म्पर्व मांडिलें ॥ दशमस्तबकीं ॥७३॥
संरव्या वाढेल कल्पतरुची ॥ ह्मणोनि कथिलें सारसारची ॥ उपजावया श्रोतयां रुची ॥ केला संग्रहो ॥ ७४॥
तरी ऐका श्रोताजनीं ॥ महाराष्ट्रभाषा ह्मणोनी ॥ न संडावें अवगणोनी ॥ प्राकृतत्वें ॥७५॥
कांजें क्षीरमध्यगत ॥ निवडणार निवडी घृत ॥ तैसें संस्कृत आणि प्राकृत ॥ साजात्य दोनी ॥७६॥
गंगायमुना ओघ दोनी ॥ अथवा गंगा सरस्वती मिळणी ॥ कीं यमुना सरस्वती जीवनीं ॥ भेड करितां नयेची ॥७७॥
ताम्रगोळा संस्कृत ॥ त्याचें पात्र घडिलें प्राकृत ॥ कीं संसारसमुद्रतरणार्थ ॥ नामनौका जयापरी ॥७८॥
आतां असो हें स्तवन ॥ नवमस्तबक जाहला संपूर्ण ॥ पुढें दशमाचें अनुसंधान ॥ गीतार्थबोध ॥७९॥
प्रद्युम्नाचे ज्येष्ठ कुमरें ॥ बहिरामश्याह नृपवरें ॥ आज्ञा केली ह्मणोनि आधारें ॥ रचिला ग्रंथ ॥१८०॥
त्या रायाचे सभेआंत ॥चतु:शास्त्रवेत्ते पंडित ॥ पुराणचर्चा अखंडित ॥ असे जयांसी ॥८१॥
म्यां तयांचे आज्ञाधारें ॥ ग्रंथ रचिला मतांतरें ॥ हें करविलें सर्वेश्र्वरें ॥ मज रंकाकरवीं ॥८२॥
माझी केतुलीती मती ॥ कीं साभिमानें बोलावें ग्रंथीं ॥ प रि श्रवणमात्रें हरिभक्ती ॥ उपजे ज्ञानवैराग्य ॥८३॥
अनंतशास्त्रें पुराणमतें ॥ वेदाधारें ऋषिप्रणितें ॥ त्या सकळांचे आद्यंतातें ॥ पावे ऐसा कोणी नसे ॥ ८४॥
कृष्ण याज्ञवल्कीयें मार्ग दाविला ॥तेचि म्यां पुढें चालविला ॥ अष्टमस्तबकापासोनि मांडिला ॥ कथाकल्पतरु ॥८५॥
कवि मधुकरें कृपाळा ॥ प्रेमें स्तवोनि श्रीगोपाळा ॥ नवमस्तबक संपविला ॥ ह्मणे मधुकरकवी ॥८६॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु॥ उद्योगपर्वसंपूर्णप्रकारु ॥ षोडशाध्यायीं कथियेला ॥१८७॥
॥ स्तबकओंव्यासंरव्या ॥२१२४॥
॥ श्रीराधाकृष्णार्पणमस्तु ॥