Dictionaries | References
अं

अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद

   
Script: Devanagari

अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद     

अंधळ्यास दिसत नाहीं व बहिर्‍यास ऐकूं येत नाहीं
त्यामुळें दोघांचाहि नेहमीं घोटाळा होतो. एक अंधळा व एक बहिरा दोघे फिरत असतां त्यांस वाटेंत एक इमारत लागली. अंधळ्यानें चाचपून पाहिलें तों त्याच्या हातास भिंत लागली तेव्हां तो म्हणाला, वाटेंत भिंत आहे. बहिर्‍यास तो काय म्हणत होता तें ऐकूं येत नव्हतें. पण त्यास समोर मशीद दिसत होती. म्हणून तो म्हणाला, मशीद लागली. याप्रमाणें दोघेहि एकाच गोष्टीचा निर्देश निरनिराळ्या तर्‍हेनें करीत होते पण परस्परांचें परस्परांस कळत नव्हतें
त्यामुळें त्यांचा घोटाळा होत होता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP