Dictionaries | References

आपला

   
Script: Devanagari

आपला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Used of a greedy or selfish person. तूं आपला ऐस Go to; mind your own business.

आपला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 pro   One's own. It corresponds to आपण throughout its various meanings. It is often used as a pillowword for the careless speaker as, मी आपला येथून निघालों. आपली वाढवून खाणें To selfishly advance one's own interests.
आपलीशी करणें   To establish one's own (will, side); to carry one's own point. To act like one's self.
आपलासा म्हणणें-समजणें   To call or suppose one's own or well-disposed to one's self.
आपल्या चेपया दुसऱ्या फुल्या   Pressing down in the measure when helping himself filling the measure loosely when helping others. Used of a greedy person.
आपला तो बाब्या दुसऱ्याचें तें कारटें   All his geese are swans.
आपला हात आणि जगन्नाथ   Liberty to appropriate to one's own satisfaction.
आपली पाठ आपणास दिसत नाहीं   One is not alive to one's own faults. He is not aware of the good or evil spoken of him behind his back.
आपलेच दांत आणि आपलेच ओंठ   Used when one who inflicts punishment and one who receives it are closely connected.
आपलें नाक कापून दुसऱ्याला अपशकून   Cut off your nose to spite your face. To injure oneself in order to injure others.
आपल्या कानी सात वाळ्या   To profess total ignorance of.
आपल्या पोळीवर तूप ओढणें   To usurp all benefit.
तूं आपला ऐस   Go to; mind your own business.

आपला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : खाजगी, स्वकीय, स्वकीय

आपला

   सना . ( आपण षष्ठी ).
   स्वत : चा ; मालकीचा ; आपण या शब्दाप्रमाणें याचाहि प्रयोग तिन्ही पुरुषी , दोन्हीं वचनांत करतात . आपण पहा .
   भ्रांतिष्ट किंवा अनिश्चयी मनुष्याच्या बोलण्यांत हा शब्द निरर्थक , वाक्यपूरणार्थक येतो . उ० मी आपला येथून उठलों ; तो आपला त्याच्या घरीं गेला . काय मेलीं अलीकडचीं कार्टी तरी ! ... ... लहान नाहीं , मोठं नाहीं , आपलं उठ घोड्या पाणी पी ! - सुंदरची संक्रांत . आपला हा शब्द पुष्कळ वेळा सुशिक्षित लोकांकडूनहि आपण या अर्थी वापरण्यांत येतो ; जसें - आपल्यास किंवा आपल्याला = आपणांस . [ आपण षष्ठी ; सं . आत्मीय ; प्रा . अपुल्ल ; गु . आपणु ] आपली वाढवून खाणें - आपमतलबीपणानें आपलेंच घोडें पुढें ढकलणें ; आपल्या हिताकडेच पाहणें . - आपलीशी करणें -
   आपलें म्हणणें ( पक्ष , मत ) सिध्द करणें , प्रस्थापित करणें ; आपली सरशी करणें .
   वश करणें ; ताब्यांत आणणें . प्रपंच वैरी मारावा । अथवा आपलासा करावा । विपू . ७ . १४४ .
   स्वत : च्या मनाप्रमाणें वागणें . आपला , आपलासा म्हणणें , समजणें - एखाद्यास आत्मीय भावनेनें किंवा मित्रत्वाच्या भावनेनें वागविणें ; मित्र समजणें . ज्यास मीं एकदां आपलासा म्हटलें त्याच्यासाठीं मीं हवी तितकी घस सोशीन . तूं आपला ऐस - तूं आपलें स्वत : चें काम पहा , दुसर्‍याची उठाठेव करुं नको म्ह०
   आपल्या ( ला ) चेप्या , दुसर्‍या ( ला ) फुल्या = आपल्यास घ्यावयाचें असलें म्हणजे माप दाबून भरणें व दुसर्‍यास द्यावयाचें असलें म्हणजे माप पोकळ भरणें . ही म्हण लोभी किंवा आपमतलबी माणसास लावतात .
   आपलें तें मापलें व दुसर्‍याचें तें दुपायलें .
   आपला कान पिळून घेणें = एखादी गोष्ट करुन ती बिघडली म्हणजे पुन्हां तशी न करण्याचा निश्चय करणें ; अद्दल घडणें
   आपला हात आणि जगन्नाथ = एखादें कार्य स्वत : च्या हातांत असलें म्हणजे त्यांत स्वत : चा स्वार्थ साधणें . ( जगन्नाथपुरी येथील प्रसाद एका ठिकाणीं ठेवलेला असतो व त्यांतून यात्रेकरुनें हवा तितका ( पुष्कळ सुध्दां ) घ्यावयाचा असतो ; किंवा जगन्नाथ म्हणजे सर्व सत्ताधीश - हात . ) विपुलता व हवें तेवढें घेण्याची मुभा याअर्थी ही म्हण रुढ झाली असावी .
०तुपला वि.  माझा तुझा ; स्वत : चा व परक्याचा ; आपपर .
   आपली मालकीची ; आपली म्हटलेली ( मिळकत , जिन्नस वगैरे ). आपपर किंवा आपअपर याच्यासारखेच आपला तुपला यापासून सामसिक शब्द बनतात .
०माणूस   मनुष्य - पुन . प्रीतीचा मनुष्य . आपल्या मनुष्याला कोणी कमी कां करतो ? - करंज्याचा फार्स २२ . आपलाला - वि . आपआपला ; ज्याचा त्याचा स्वत : चा ; आपलाले कपडे सांभाळा ! आपलूक आपलुकी - स्त्री . ( चि . ) आपलेपणा ; स्वकीयता . आपले आपण आपल्याआपण - क्रिवि . आपखुषीनें ; स्वयंप्रेरणेनें ; आपण होऊन . आपलें उगीच - विनाकारण ; निरर्थक . आपला अर्थ २ पहा . आपलें उगीच कारागिराची कुशलता पाहून माझी दृष्टि तिकडे वळली . - मृ ५८ . - आपल्या अंगीं अंगें अंगानें - स्वत :; खुद्द . आपल्या आपण - दुसर्‍याच्या मदतीवांचून ; स्वत : च ; आपसूक . आपल्या घरचा थोर राजा - वि .
   हट्टी , हेकेखोर मनुष्य .
   स्वत : च्या घरीं जबरदस्तीनें वागणारा व बाहेर लोकांत थंड - नरमपणानें वागणारा ; गांवचा गांड्या आणि बायकोचा देशपांड्या .
   दुसर्‍यावर विनाकारण वर्चस्व गाजविणारा . तो असेल आपल्या घरचा थोर , मला काय ? आपल्यांत - स्वगत ( भाषण ) जुन्या नाटकांतून स्वगत या अर्थी आपल्यांत हा शब्द योजीत असत . भीमराव :-( थांबून आपल्यांत ) - रत्नकांता नाटक २४ .

Related Words

आपला   आपला तुपला   आपला हात जगन्नाथ   आपला तो बाब्या, लोकांचे तें कारटें   आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा   आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा   जो ईश्र्वरें विहीलाः तो स्वधर्मु आपला   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे   आपला तो कंढीचा दोरा, दुसर्‍याला म्हणावे पडखाड्यांत   आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग   आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्‍याचे ते कारटे   आपला तो माणला दुसर्‍याचा तो भिकार डेंग   आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे   चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आप आपला   आपला माणूस   आपला म्हणणें   आपला समजणें   आपला बा गे? आपला बा झों?   आपला कान पिळून घेणें   आपला कोप परिहार, रिपुसंहार   आपला टेंभा चालविणें   आपला टेंभा मिरविणें   आपला देश घेणें   आपला भात आखडला हात   आपला भोग्या शिवणें   आपल्याच पायावर आपला धोंडा   आपला अन्याय आपणांस दिसत नाहीं   आपला गू आपणांस घाणत नाहीं   आपला नाश आपण न करावा   आपला पदर मोडून गुजराण करणें   आपले हातानें आपला नाश करणें   लोकांचा थुंका आणि आपला बुक्का   मोहोरा लक्ष आणि आपला भक्ष   देवाचें नांव आणि आपला गांव   पडला कामाला, तोच खरा आपला   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   आपला नाश संतोषानें कोणीच न करिती   आपला वेडगळ हेका पुढे ढकलणें धरून बसणें   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   घ्‍यावा दुसर्‍याचा सद्‌गुण, त्‍यागावा आपला दुर्गुण   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   दुसर्‍याचा वरवंटा घेऊन आपला काथ्या कुटणें   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा   truely yours   yours faithfully   yours sincerely   yours truly   sincerely yours   अपला   आपलीं ती पोरटीं, आणि दुसर्‍याची ती कारटीं   पदरचा   शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   लाटया कारभारी   लाटया गंगाजी   लाटया गोमाजी   लाटया पाटील   correspondence resting with your memo no.   आपना वही जो आपने काम आवे   आपापला   आपुण मवन् आन दुसर्‍याकय् व्हरन्   गोटगीळ   वेड घेऊन पेडगांवास जाणें   सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा   दुसर्‍याचा तो भोसडा, आपली ती चीर   दुसर्‍याचें नांव, आपलें गांव   मारवाडी कावा आणि आपलपोटेपणा   नमने घेणें   पागोटें देणें   पायलीची पिठी पोटांत   स्वयंशासन   कान द्यावा पण कानु देऊं नये   कान द्यावा पण कानु न द्यावा   रान पारखें होणें   रान बदलणें   रान सोडणें   १८००   आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ   आपली पोळी पिकविणें   उघडपणे   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   अंगीकारणे   वाडतलो आपलो आसल्यारि कोटग्यांतु जेंवयेत   विश्र्वास की खूणगांठ   शिक्का मारणे   in compliance with your memo no.   गर्भाचें करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP