|
न. एक शाक भाजी ; याच्या निरनिराळ्या जाती - राजाळूं धांवअळूं , काळेंअळूं , पानअळूं , रुखअळूं , मुंडलेंअळूं , रानअळूं ( तेरी ). काळेंअळूं उत्तम असून अग्निदीपक , रक्तपित्तीचा नाश करणारें , बलवृध्दिकारक आहे . म्ह० अळवाची खाज अळवास ठाऊक = ज्याची चिंता त्यास ठाऊक . अळवाची देंठी - स्त्री . अळवाच्या देंठ्यांचें दह्यांतील रायतें . अळूवडी - स्त्री . अळवाच्या पानांची तळून केलेली भाजी . शिवाय गाठी , कोरडी भाजी , ताकाचें अळूं इ० पदार्थ अळवाचे करतात . अळवावर अंचविणें - उपकाराची जाणीव नसलेल्या माणसावर उपकार करणें ( अळवाच्या पानावर पाणी ठरत नाहीं यावरुन ल . ) क्षणभंगुर ; अशाश्वत ; चंचल ; अस्थिर ( लक्ष्मी - देह - वस्तु - मन इ० ) [ सं . अळुक ; गुज . अळवी , अळू , हिं . आळु , व . धोपा ]
|