Dictionaries | References

खोत

   
Script: Devanagari

खोत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khōta m A renter of a village; a farmer of land or revenue; a farmer of the customs: also a contractor or monopolist gen. 2 In some provinces. An hereditary officer whose duty it is to collect for Government the revenue of the village: also an officer appointed for this office. 3 A tribe, or an individual of it, of Bráhmans in the Southern Konkan̤: otherwise called जवळ.

खोत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A village officer who collects revenues for Government. A tribe of Brahmans in Konkan.

खोत

  पु. १ गांव सार्‍यानें घेणारा अधिकारी गांवाचा सारा भरणारा वतनदार ; वसुलाचा इजारदार ; जकातीचा इजारदार ; ( सामा .) मक्तेदार ; सरकारांतुन नफा - तोटा आपले अंगावर पतकरुन जकात किंवा कांहीं एक जिन्नस सर्व आपण घ्यावा , मग आपण विकणें तर विकावा अशा रीतीनें काम करणारा इजार दार . २ ( कांहीं ठिकाणी ) सरकारासाठीं गांवचा वसुल जमा करणारा पिढीजाद कामदार ; तसेंच या कामासाठीं तात्पुरता नेमलेला कामगार .' ( याचे अधिकार , हक्क यासाठी रत्‍नागिरी ग्याझेटियर पृ . २०४ . पहा .) कोंकणांत जुन्या वतनी हक्कामुळें किंवा पिढीजाद मुलकी अधिकारामुळें खोत हा जमिनदार बनलेला असतो व कुळांकडुन वाटेल तितका वसुल घेत राहातो .' ३ दक्षिण कोंकणांतील एक ब्राह्मण जात ; जवळ जात . ' गोविंद खोत .' ( खेत ?) समाशब्द -
०करी  पु. जमिनींचा किंवा जमिनींच्या उप्तन्नांचा मक्तेदार किंवा इजारदार , खोत . खोतकी - गी - उप्तन्नांचा मक्तेदार किंवा इजारदार , खोत . खोतकी - गी - स्त्री . खोतांचें काम , हुद्दा .
०खराबा  पु. १ ज्या गांवाची ज्यास खोती सांगितली त्या गांवच्या खराब जमीनी कांहीं एक ठराव करुन ( सरकारणें ) खोताच्या माथीं मारणेम ; खराबा मक्त्यानें देणें . २ अशा खराब जमिनी .
०धारा  पु. जमिनीबद्दल कुलांकडुन जमीनदाराला मिळावयाचा खंड . ०पट्टी - स्त्री . खोताच्या नफ्याकरितां बसविलेला फळा , कर .
०बाकी  स्त्री. खोताच्या येण्याची बाकी .
०वार वि.  खोताकडे लावुन दिलेला ( गांव ).
०वेठ  स्त्री. खोतानें मजुरी दिल्याशिवाय कुळांपासुन घेतलेली चाकरी , वेठ किंवा जिन्नस . याचें पुढील प्रकार आहेत ; - वरडी - गवत , पान - पेंढा , शाकारणी माणुस , रवळी , पाटी , सूप , शिंपली , हवसा , वाढवण , हतरी , तट्ट्या , हातर , नागरजोत , भार्‍यलांकडे , मानासंबंधी नारळसुपारी , बाबभाडें , अर्धेंली , तिर्धेलीं इ० या बाबींहुन कारसाईची बाब भिन्न आहे . ' हे प्रकार दक्षिण कोंकणांतील आहेत .
०सजा   ज्जा ) - पु . खोतापासुन सार्‍यानें , भाडेपट्यानें घेतलेल्या जमिनी . यांच्या उलट रक्मी जमीन ( सरकाराकडुन ठराविक रकमेनें घेतलेली जमीन ) खोती - स्त्री . १ खोताचा व्यापार , काम , अधिकार . २ इजार्‍यानें , खंडानें , मक्त्यानें देणें घेणें ; इजार पहा . ३ उभ्या पिकाचा , जंगलांतील लांकडाचा , बागाइती उप्तन्नाचा मक्ता . ४ वाढीदिढीनें शेंतकर्‍यास पेरण्यासाठीं वगैरे आगाऊ धान्य देण्याचा धंदा . ५ गांवची मुखत्यारी . ( खोत )
(   ज्जा ) - पु . खोतापासुन सार्‍यानें , भाडेपट्यानें घेतलेल्या जमिनी . यांच्या उलट रक्मी जमीन ( सरकाराकडुन ठराविक रकमेनें घेतलेली जमीन ) खोती - स्त्री . १ खोताचा व्यापार , काम , अधिकार . २ इजार्‍यानें , खंडानें , मक्त्यानें देणें घेणें ; इजार पहा . ३ उभ्या पिकाचा , जंगलांतील लांकडाचा , बागाइती उप्तन्नाचा मक्ता . ४ वाढीदिढीनें शेंतकर्‍यास पेरण्यासाठीं वगैरे आगाऊ धान्य देण्याचा धंदा . ५ गांवची मुखत्यारी . ( खोत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP