Dictionaries | References ज ज्याच्या हातीं ससा तो पारधी Script: Devanagari Meaning Related Words ज्याच्या हातीं ससा तो पारधी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्यानें ससा मारला असेल तोच त्याला उंचलून घेतो. यावरुन सामान्यतः ज्यांच्या हातांत ससा दिसेल त्यासच आपण पारधी समजतों, जेथें एखाद्या गोष्टीचा पुरावा अथवा अवशेष सांपडेल तेथेंच ती असली पाहिजे अशी सामान्य मनुष्य कल्पना करतात, मग मागें कोणी पाहात नाहीं किंवा मागच्या खर्या गोष्टीची चौकशी कोणी करीत नाहीं. जें समोर डोळ्यानें दिसेल त्यावरच विश्वास ठेवण्याची सामान्य जगाची प्रवृत्ति असते. दोन गृहस्थ रानांत शिकारीला गेले. त्यापैकीं एकानें एक ससा मारला, दुसर्यास कांहींच सांपडलें नाहीं-परंतु गांवांत परत येतांना ज्यानें ससा मारला तो रिकाम्याच हातानें येत होता व ससा दुसर्याच्याच हातांत होता. तेव्हां लोक ज्याच्या हातांत ससा होता त्यानेंच शिकार केली असें म्हणू लागले व खर्याशिकार्यास कांहींच मिळालें नाहीं असें मानूं लागले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP